Total Pageviews

Saturday, 12 November 2016

मी नोटा कशा बदलल्या? - - सकाळ वृत्तसेवा


शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 05:54 PM IST पुण्यातली बातमी होती, नोटांचे गठ्ठे कचरापेटीत सापडले. हिंगोलीत नगरपालिका निवडणुकीतल्या उमेदवाराच्या दारात मतदार गेले आणि हजाराच्या नोटा बदलून मागितल्या. मुंबईत कचरा गोळा करणाऱयाला नोटांचे गठ्ठे सापडले. सोन्या-चांदीचे भाव रातोरात वाढले. पाचशे-हजाराच्या नोटा रातोरात रद्द झाल्याने खरंच ज्यांच्याकडं काळा पैसा होता, त्यांच्या ‘अनुभवा‘च्या बातम्या झाल्या. टीव्हीवर झळकल्या. आपणही चवीनं वाचल्या. आपले अनुभव यापेक्षा वेगळे नक्कीच होते. खिशात पाचशेची एकच नोट आणि पेट्रोल नको असताना पाचशेचंच भरावं लागलं. महिन्याची बिलं भागविण्यासाठी बँकांच्या दारात लांबच लांब रांगेत उभं राहावं लागलं. कामं बाजूला ठेवून पाचशे-हजाराच्या नोटा शोधून शोधून त्या जमेल तिथं भरून नव्या नोटा घ्याव्या लागल्या... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याच्या निर्णयावर झडणाऱया राजकीय चर्चा आपण रोजच एेकतोय आणि वाचतोय. अर्थतज्ज्ञही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अॅनॅलिसिस करताहेत. हा धुरळा बसायचा खाली तेव्हा बसू दे. हे सारं बाजूला ठेवूया. आजची मोठी पिढी 1978 च्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेची भागीदार नव्हती. या पिढीसाठी नोटा बदलण्याचा अनुभवच अगदी नवा कोराकरीत आहे. तो गंमतीशीर असेल; यातनादायी असेल; साधासुधा असेल. तो शेअर करूया... कदाचित तुमचा अनुभव दुसऱयाला उपयोगी पडेल. त्याची यातायात वाचेल. साऱयांना सांगूया. मी नोटा कशा बदलल्या? तपशील जास्त असेल, तर ई मेल करा webeditor@esakal.com वर आणि Subject मध्ये लिहाः #IChangedNote अमोल अणोकर - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 06:12 PM IST मी नोटा नाही बदलल्या अद्याप, कारण बँकांमध्ये गर्दी भरपूर होती व माझ्याकडे थोडे सुट्टे पैसे आहेत जे मी पुढील ४-५ दिवस चालवणार आहे. जे घेणे खूप गरजेचे आहे ते मी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ने विकत घेतो आहे. मोठे खर्च टाळतो आहे. हि परिस्तिथी ४-८ दिवसात निवडेल हि आशा आहे. अजून ३० डिसेंबर पर्यंत वेळ आहे, त्या आधी नोटा बदलून घेईल. शिवराम गोपाळ वैद्य - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 06:25 PM IST परवा मी एटीएम मध्ये गेलो होतो. तेथे एक गंमतच झाली. एक माणूस होता. त्याला शंभराच्या नोटा हव्या होत्या. म्हणून त्याने चारशेच रुपये काढायचे ठरवले. पण त्याच्याकडून ४००च्या पूढे एक शुन्य चुकून जास्त दाबला गेला. तेव्हा त्याला पाचशेच्या सात आणि शंभराच्या पाच नोटा मिळाल्या तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला. आम्ही तेथे आलेल्या प्रत्येकाला विचारले मोदींच्या निर्णयावर. मात्र एकानेही या निर्णयाविरुद्ध मत दिले नाही. थोडासा त्रास सहन करायला प्रत्येकाचीच तयारी होती आणि आहे. काळ्या पैशांचे क्षेत्र समूळ नष्ट करण्यास प्रत्येक नागरिक उत्सुक आहे, राजकारणी नेते आणि काळ्या पैशांचे धनी सोडून ! निरंजन - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 06:41 PM IST सर्व सामान्य नागरिकांना मुळात रोजच्या खर्च साठी फार फार तर १००-२०० रुपये खूप होतात. बाकी सगळे खर्च तुम्ही डेबिट कार्ड नि / ऑनलाईन होऊ शकतात. ४ दिवसात मला तरी अजून नवीन नोटांची गरज भासलीच त्यामुळे नोटा बदलायचा अनुभव नाहीये. जुन्या नोटा आहेत खिशात पण आत्ता उगाच येडेपणा करत लाईन मध्ये थांबून वाया घालवणार नाही कराडचा पिंट्या - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 06:52 PM IST मी अजून गेलोच नाही बँकेत ,सर्व सुरळीत झाल्यावर जाईन.तशी गरजच नाही पडली.आज सर्व ऑनलाईन किंवा डेबिट कार्ड ने पे होत आहे,का लोक उगाचच रांगेत उभे राहत आहेत कुणास ठाऊक.५० दिवस आहेत अजून पैसे डिपौझिट करायला. अनंत थोरात - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 06:59 PM IST मी पहिले २ दिवस बँकेत जाण्याचे टाळले आणि आज तिसऱ्या दिवशी प्रथम आमच्या बिल्डिंग मधील बँक अधिकाऱ्याला भेटून माहिती घेतली. त्याने सांगितले कि atm मशीन मध्ये सॉफ्ट वेअर बदल केल्याशिवाय त्यात नवीन नोटा भरता येत नाहीत आणि हा बदल बँक किंवा पैसे भरणारी संस्था करू शकत नाही,तर ज्यांनी atm मशीन बनविले त्या कंपनीचा अभियंता सॉफ्ट वेअर मध्ये बदल करेल तेंव्हाच नव्या नोटा ते ओळखू शकेल, त्यामुळे साऱ्या यंत्रणा मध्ये बदल करणे हा वेळ खाणारा प्रकार आहे आणि हा अगोदर पासून करता येत नव्हता. हे झाल्यावर प्रत्यक्ष atm मध्ये मला अनुभव असा आला कि रांगेत उभे असलेले लोक ३-३ कार्डे घेऊन पैसे काढत होते आणि प्रत्येक कार्डात २ हजार असे ६-६ हजार घेऊन बाहेर येत होते त्यामुळे एका तासातच पैसे रिकामे झाले. असे करून कसे चालेल ? सुदैवाने जवळच्या बँकेत गर्दी बरीच कमी झालेली दिसली त्यामुळे उद्या मी तेथून पैसे मिळविणार आहे. या काळात मी जवळच्या वाण्याला ऑन लाईन ट्रान्स्फर करून ५००० रुपायर ट्रान्स्फर केले आणि त्याची डायरी करून आता मी पुढील ४-५ दिवस निवांत व्यवहार करणार आहे. संदीप भगत - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 07:05 PM IST खरंच मला टीका करणाऱ्या लोकांची कीव येते. २ -४ दिवस त्रास होतोय म्हणून लगेच बोंबाबोंब. सगळी सिस्टिम व्यवस्थित व्हायला पण पाहिजे पण कठोर निर्णय नको, त्रास नको. अरे ज्या मुलांवर तुम्ही प्रेम करता आणि जे तुमचे भविष्य बनतात त्या मुलांना जन्म देण्यासाठी पण आईला प्रसववेदना सहन कराव्या लागतात, त्रास घेतल्याशिवाय काहीच चांगले होत नसते. हीच लोक जेंव्हा देव दर्शनासाठी आणि फालतू सिनेमाच्या तिकिटांसाठी तासंतास रांगेत उभे राहतात त्यावेळी टीका का करत नाहीत. जे चाललंय ते तुमच्या चांगल्यासाठीच. टीका करण्यापेक्षा आर्थिक साक्षर बना म्हणजे लक्षात येईल कि ह्या निर्णयाचे पुढे किती चांगले परिणाम होऊ शकतात. जे २००० (टीप : ह्या नोटेत कुठलीही GPS चिप नाही) च्या नोटेवर टीका करत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे कि आज जे ५००/१००० च्या नोटांबाबत झाले ते उद्या २००० च्या नोटांबरोबर करता येईल त्या पण गरज पडल्यास एका रात्रीत रद्द करता येतील. काळाबाजारी लोकांना चाप बसणे महत्वाचे जे कि आज होत आहे. अनिलसावंत - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 07:14 PM IST थँक फॉर आस्क, मी मुळात या निरायचा बाजूने आहे , आपल्याला थोडा त्रास होणारेय पण देशया साठी सिमेवर असणाऱ्या सेनिक पेक्षा कमी असणाऱ्या , मी पेट्रोल भरण्या साठी atm डेबिट कार्ड वापरल्या जे मी या आधी कधीच यासाठी वापरला नव्हतं.म्हणजी aapan रिचार्जे आणि बऱ्याच ठिकाणी ओंलीने सिस्टिम असे करू शकतो. राकेश पाटील - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 07:16 PM IST मी दुसऱ्या दिवशी नोटा बदलुइन घेतल्या बँक मध्ये ४०००च्या बदली २००० ची १ आणि १०० च्या २० घेतल्या .२००० ची नोट थोडी वेगळी आहै . इचलकरंजी मध्ये बँक चे काम चांगले चालू है संदीप पाटील - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 07:41 PM IST नोटा कशा बदलाव्या व इतर गोष्टी बद्दल खूप प्रचार करणे जरुरी आहे. ग्रामीण भागात खूप गोंधळ माजला आहे. ATM मशीन मध्ये कॅश केव्हा जमा करता येईल ? २००० चे सुट्टे कसे करणार ? इतर खूप प्रश्न चे उत्तर लवकर सगळ्या जनतेला लवकर माहित पाहिजे. किशोर - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 07:44 PM IST अनेक व्यापाऱ्यांचा धंदा मंदा झाल्यामुळे ते आता नेहमीच्या गिऱ्हाहीकाना उधारीवर वस्तू देत आहेत. क्रेडिट कार्ड वर व्याज भरण्या पेक्षा मी वाणी, पेट्रोल पंप, दूधवाला, कामवाली बाई यांच्या कडे उधार खाते सुरु केले आहे. तेवढ्या नोटा बाजूला मी बाजूला काढतो. मी पुढच्या आठवड्यात बँकेतील गर्दी कमी झाली आणि लिमिट वाढले कि तिकडे जाणार आणि आरामात पैसे काढणार. उगीच डोक्याला ताप करून घेणार नाही. अनिल waditake - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 08:37 PM IST कोणताही उद्योगपती, बिल्डर, सरकारी कर्मचारी रांगेत नाही, आहे ते फक्त्त सामान्य नागरिक. कोणाचे भले होणार माहित नाही पण सामान्य जनता मात्र खूपच होरपळीआहे. बर परत नवीन पाचशे आणि २ हजार ची नोट बाजारात आली म्हणजे परत तीच सायकल चालू होणार. देवा तू बुद्धी दे या सरकारला. का बर गरीब लोकांच्या मागे लागले. प्रतिक्रिया शापित - शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 - 08:41 PM IST माझे बरेचसे व्यवहार online आहेत त्यामुळे बँकेत जाण्याची आजपर्यंत वेळ आलेली नव्हती, पण रोजच्या ब्रेकफास्ट, स्नॅक्स आणि गाडीचे पेट्रोल संपल्याने संध्याकाळी ATM च्या लाईनीत दीड तास उभा राहिलो...पण दुर्दैवाने माझा नंबर लागताच ATM मधील रक्कम संपून गेली. Sorry...Unable to Process Your Transaction...स्क्रीनवर असा Message डिस्प्ले झाला...आणि माझ्यासहीत मागे उभ्या असलेल्या ग्राहकांचा हिरमोड पाहण्यासारखा झाला होता.😂 पण त्या दीड तासात अनोळखी लोकांसोबत चर्चा करताना इतकंच कळलं कि केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयाचे बहुतेकांनी स्वागत केले तर काहींनी नाराजी व्यक्त केली...पण PM म्हणून मोदीच पाहिजेत अशी भावनाही बोलून दाखवली. थोडासा त्रास होतोय लोकांना पण पुढच्या दोनचार दिवसात बरेचसे नवे चलन मार्केटमध्ये आल्याने बॅंकेतली गर्दी निवळेल...आणि एकमेकांना या कठीण प्रसंगी मदत अथवा सांभाळून घेतलं तर खूप बरं होईल. मी स्वतः माझं क्रेडिट कार्ड मित्रांना आणि रूम मालकाला या कठीण प्रसंगी वापरण्यासाठी दिलं.

No comments:

Post a Comment