Total Pageviews

Monday, 14 November 2016

नोटबंदीचे फायदे : दुप्पट झाली होती नोटांची संख्या, गृहकर्ज 1.5%-घरे 25% स्वस्त होण्याची चिन्हे

RBI ने 500-1000 च्या जेवढ्या नोटा छापल्या होत्या, त्यामध्ये गेल्या पाच वर्षांत देशात दुपटीने वाढ झाली होती. बाजारातील बनावट नोटांमुळे तसे झाले होते. सरकारने जुन्या मोठ्या नोटा बंद केल्याने त्यावरच बऱ्याच अंशी आळा येईल अशी अपेक्षा आहे. काही काळ मंदी राहिल्यानंतर बाजारातील महागाई त्यामुळे खाली येऊ शकेल. घरे 20 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. पुढच्या महिन्यात आरबीआय जेव्हा पतधोरणाचा आढावा घेईल तेव्हा गृहकर्जाचे दरही 1 ते 1.5 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. द फाइनांशियल प्लानर्स गिल्ड ऑफ इंडियाचे मेंबर जितेंद्र सोलंकी, पॉलिटिकल एक्सपर्ट्स रहीस सिंह आणि गुरचरन दास यांच्याकडून या निर्णयाचे फायदे तोटे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरकार आणि पक्षाचा एकच सूर.. - सरकार आणि संपूर्ण भाजप पक्ष एकाच सुरात बोलत आहे. काहीही विरोधाभास दिसत नाही. मोदींना चांगले काम दाखवण्याची संधी मिळत आहे. पक्षात त्यांच्या निर्णयाला विरोध करणारे कोणीही नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे मोदी जे बोलत आहेत तेच पक्षाकडून सांगितले जात आहे. - मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी एक अध्यादेश काढला होता. राहुल गांधी विरोधात होते. त्यांनी पत्रकार परिषदेतच तो अध्यादेश फाडला. असे भाजप किंवा सरकारमध्ये शक्य नाही. - अमित शहांनी मोदींचा निर्णय देशहिताचा म्हटले आहे. ज्यांचा याला विरोध आहे ते हवाला व्यावसायिकांचे मित्र असतील असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेश निवडणुकीवर परिणाम - याचा परिणाम नक्कीच हईल. पार्ट्या थेट कार्यकर्त्यांना पैसा देऊ शकतात. - निवडणुकांत ब्लॅकमनीचा वापर होतो, यात काहीही शंका नाही. इलेक्शन कमिशन त्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत असते. - यूपी निवडणुकीत धर्म आणि जातीचा प्रभाव सर्वाधिक असतो, त्यामुळे पैशाचा मुद्दा मोठा बनेल अशी शक्यता वाटत नाही. - काही पार्ट्यांवर कमी तर काहींवर अधिक परिणाम

No comments:

Post a Comment