Total Pageviews

Saturday 26 November 2016

नोटाबंदीमुळे 'अंडरवर्ल्ड' झाले 'अंडरग्राऊंड'

First Published :26-November-2016 : 11:59:58 Last Updated at: 26-November-2016 : 12:48:47 ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 26 - नोटाबंदीचा फटका फक्त सर्वसामान्यांना बसला नसून अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यात सरकारला यश आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोटाबंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून अंडरवर्ल्डच्या हालचाली बंद झाल्या आहेत. मटका, शस्त्रांची तस्करी, सुपारी घेऊन हत्या करणे, चोरी आणि अंमली पदार्थांच्या बाजाराला नोटाबंदीचा फटका बसला असून हवालाच्या मार्फत येणारा पैसाच बंद झाला असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. हवाला किंवा अवैध मार्गाने येणा-या पैशांचा व्यवहार हा काळ्या पैशाचा मुख्य स्त्रोत आहे. अशामध्ये चलनाचा तुटवडा झाल्याने तसंच जुन्या नोटा असल्याने अंडरवर्ल्डची नाकेबंदी झाली आहे. 'गेल्या 20 दिवसांमध्ये खंडणीसाठी एकाही उद्योजकाला अंडरवर्ल्डकडून फोन किंवा धमकी आलेली नाही यावरुन आपण त्यांना किती फटका बसला आहे याचा अंदाज लावू शकतो', असं एका पोलीस अधिका-याने सांगितल आहे. 'मुंबईत शस्त्रांची तस्करी नेहमी होत असते, मात्र गेल्या दोन आठवड्यांमध्ये एकदाही देशी बनावटीच्या शस्त्रांची तस्करी झालेली नाही', अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे. (गोल्डफिंगर उद्योजकांना नोटाबंदीचा कोट्यवधींचा फटका) (५00 रुपयांत विवाह समारंभ; नोटाबंदीचा परिणाम) 'अंमली पदार्थांच्या तस्करीला नोटाबंदीची छळ लागली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणा-यांना ग्राहकच मिळत नसल्याचं कळत आहे. बाजार पुन्हा एकदा स्थिर होण्याची वाट ते पाहत आहेत', असं नार्कोटिक्स नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक संजय झा यांनी सांगितलं आहे. (नोटाबंदीचा रिअल इस्टेट, वाहन उद्योगावर परिणाम) गुंडांनीदेखील नोटाबंदीचा धसका घेतला असून अटक झाली तर सोडवण्यासाठी वकिल मिळत नाही आहेत. कारण वकिलदेखील फी देताना नव्या नोटा देण्यास सांगत आहेत. 'न्यायालयदेखील जुन्या नोटा स्विकारत नाही आहे, त्यामुळे जामीन मिळण्यात अडचण होत असल्याची', माहिती छोटा राजन गॅगमधील सदस्याच्या वकिलाने दिली आहे. 'हवालामध्ये सहभागी असलेले तात्पुरच्या स्वरुपासाठी मनी चेंजिंग करत आहेत. त्यांनी सोनार, बँकर्स आणि व्यवसायिकांशी हातमिळवणी केली असून जुन्या नोटांच्या बदली नव्या नोटा बदलून घेत आहेत. यासाठी 25 ते 40 टक्के कमिशन देत आहेत', अशी माहिती क्राईम ब्रांच अधिका-याने दिली आहे

No comments:

Post a Comment