Total Pageviews

Friday, 11 November 2016

बंद नोटांचे किस्से : 13 पट वाढले रेल्वे बुकींग, एवढी सोने खरेदी की 600 ज्वेलर्सला सरकारची नोटीसपाचशे आणि हजाराच्या नोटा खिशात असूनही सामान्यांना वणवण करावी लागत असतानाच या नोटांच्या बदल्यात १००च्या नोटा द्यायच्या मात्र त्या देताना २० ते ३० टक्के कमिशन उकळायचे, असा काळा बाजार सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील कृषिमालाच्या काही घाऊक बाजारांत मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे.


• • 500-1000 च्या जुन्या नोटा बंद झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी लोक आता विविध प्रकारचे मार्ग शोधत असल्याचे समोर आले आहे. कोणी या पैशातून सोने खरेदी करत आहे तर कोणी महागडी तिकिटे बूक करत आहेत. काही लोक लग्नाच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर याचा दबाव निर्माण करत आहे. तर काळा पैसा बाळगणारे काही लोक भितीपोटी पैसे फेकून देत आङेत. मात्र मोठे खर्च किंवा खरेदी करणाऱ्यांवर सरकारची नजर राहणार आहे. देशातील 25 शहरांमध्ये नोटांच्या मोबदल्यात 250 किलो सोने विकलेल्या 600 ज्वेलर्सना डायरेक्टरेट जनरल ऑफ सेंट्रल एक्साइज इंटलिजन्सने नोटिस पाठवून उत्तर मागितले आहे. 13-14 पटीने वाढले एसी-1 कोचचे बुकींग - रेल्वेच्या फर्स्ट क्लासचे तिकिटबूक करुनही जुन्या नोटा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोक तिकिट बूक करून नंतर पुन्हा ते कँसल करत आहेत. त्यामुळे त्यांच्या नोटा एक्सचेंज होत आहेत. - रेल्वेने कॅश रिफंड न करता अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणार असल्याचे म्हटले आहे, मात्र लोकांना तेही मान्य आहे. - मुंबईत इंडियन रेल्वेचे स्पोक्सपर्सन अनिल सक्सेना यांनी सांगितले की, पूर्वी एसी फर्स्ट क्लासच्या 2000 तिकिटांचे बुकींग व्हायचे. हाच आकडा आता 27000 वर आहे. यात 13 पटींनी वाढ झाली आहे. 3 कोटींच्या पेमेंटसाठी जुन्या नोटांची ऑफर - मुंबईत मोठ्या लग्नांचे आयोजन करणाऱ्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या सिनियर मार्केटींग एक्झिक्युटिव्हने सांगितले की, त्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. - नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, लग्नाच्या क्लाइंट्सना वेड लागले आहे. मला एकाने फोन करून तीन कोटींचे पेमेंट करतो पण जुन्या हजाराच्या नोटा आहेत, असे सांगितले. • काही तासांत विकले अडीच क्विंटल सोने, 600 ज्वेलर्स चौकशीच्या फेऱ्यात - सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 500-1000 च्या नोटा बंद होण्याची घोषणा होताच बुधवारी मुंबईत 75 कोटी रुपयांचे सुमारे अडीच क्विंटल सोने विकले गेले. - सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्वेलर्स जुन्या नोटांच्या मोबदल्यात 20 ते 65 टक्के अधिक किमतीवर सोने विकत आहेत. 600 ज्वेलर्सना सरकारची नोटीस - जुन्या नोटाच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर सोने विक्री झाल्याचे वृत्त आहे. - त्यामुळे एक्साइज डिपार्टमेंटने 25 शहरांतील सुमारे 600 ज्वेलर्सला नोटीस दिली आहे. - सुत्रांच्या मते, नोटीस डायरेक्टोरेट जनरल ऑफ सेंट्रल एक्साइज इंटलिजन्सकडून पाठवण्यात आले आहे. - त्यात 7 नोव्हेंबरनंतरपासून 4 दिवसांत विक्री केलेल्या सोन्याची माहिती मागवली आहे नोकरांच्या खात्यात टाकली रक्कम - मुंबईच्या एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, त्यांच्याकडे 5 लाख रुपये अघोषित उत्पन्न होते. - त्याने चार नोकरांना वाटून त्यांचे बँकेत अकाऊंट ओपन केले. गंगेत तरंगत होत्या नोटा - उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये 500 आणि 1000 च्या अनेक नोटा गंगेत आढळून आल्या. - शुक्रवारी काही लोक नदीत अंघोळ करत होते तेव्हा त्यांना या नोटा आढळल्या. - यापूर्वी बुधवारी बरेलीच्या एका शाळेत 500-1000 च्या नोटा आढळल्या होत्या. जुने बिल भरून ब्लॅक मनी होतोय व्हाइट - सरकारने 14 नोव्हेंबरपर्यंत जुन्या 500-1000 च्या नोटांद्वारे बिल भरून वीज बिल, पालिकेची थकीत रक्कम भरण्यास हिरवा कंदील दिला आहे. - त्यामुळे सरकारने वर्षांपासूनची थकबाकी, पाणी, वीज आणि नगर पालिकेचे कर भरले आहेत. - उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये नगरपालिका आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये तासन तास रांगेत उभे राहून लोक बिल भरत आहेत. पाचशे-हजाराच्या नोटांच्या बदल्यात कमिशन आकारणी पाचशे आणि हजाराच्या नोटा खिशात असूनही सामान्यांना वणवण करावी लागत असतानाच या नोटांच्या बदल्यात १००च्या नोटा द्यायच्या मात्र त्या देताना २० ते ३० टक्के कमिशन उकळायचे, असा काळा बाजार सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील कृषिमालाच्या काही घाऊक बाजारांत मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. जुन्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून १०० रुपये तसेच सुटय़ा पैशांना मोठे महत्त्व प्राप्त झाले असून बँक तसेच एटीएममधूनही पुरेशा प्रमाणात या नोटा उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा मिळत असल्या तरी सुटय़ा पैशांच्या टंचाईमुळे त्या वटत नसल्याने या त्रासात अधिकच भर पडताना दिसत आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांपेक्षा पूर्वीपासून चलनात असलेल्या १०० रुपयांना बाजारात भलतीच मागणी आली आहे. बाजारातील या टंचाईसदृश परिस्थितीमुळे १०० रुपयांचा एकगठ्ठा साठा असणारी काही मंडळी भलतीच सक्रिय झाली असून दलालांकरवी या नोटांच्या माध्यमातून जुन्या नोटा वटविण्याचे उद्योगही जोरात सुरू झाल्याची चर्चा आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील कृषी मालाच्या काही घाऊक तसेच किरकोळ व्यापारी या धंद्यात सक्रिय झाले असून कोणत्याही अधिकृत पुराव्याशिवाय जुन्या नोटांच्या बदल्यात १०० रुपयांचा काळा बाजार जोरकसपणे सुरू झाला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचशे आणि हजार रुपयांच्या बदल्यास २० ते ३० टक्के इतक्या कमिशनच्या बदल्यात ताबडतोब १०० रुपयांचे चलन उपलब्ध करून दिले जात आहे. जुन्या नोटा वटविण्यासाठी तोळ्यामागे ५० ते ६० हजार रुपयांचा दर मोजून सोने खरेदी करण्यासाठी मुंबई, ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून रांगा लागल्या आहेत. मात्र, या व्यवहारांवर तपास यंत्रणांचे बारीक लक्ष असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिल्यामुळे १०० रुपयांचा हा काळा बाजार तेजीत आला आहे. काही ठरावीक व्यापारी आणि दलालांची मोठी साखळी यामध्ये सक्रिय झाली असून हा व्यवहार अर्थातच लाखोंच्या घरात सुरू आहे, अशी माहिती वाशी येथील घाऊक बाजारातील एका बडय़ा सूत्राने दिली.

No comments:

Post a Comment