वीरपुत्रांची कुर्बानी! Monday, October 31st, 2016 देशभरात दिवाळी साजरी होत असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात आपले चार जवान शहीद झाले. महाराष्ट्राचा वीरपुत्र नितीन कोळीदेखील देशाच्या रक्षणासाठी शहीद झाला असून संदीप सिंह रावत, जितेंद्र सिंह, मनदीप सिंह हे जवानही बलिदानाच्या वेदीवर चढले आहेत. तरुण पत्नी, वडील, भाऊ, आई या सगळ्यांना सोडून नितीनसारखे असंख्य तरुण वीरपुत्र रोज कुर्बान होत आहेत. हे किती काळ चालणार? शहीदांच्या कुटुंबांची मन की बात जरा समजून घ्या! वीरपुत्रांची कुर्बानी! हिंदुस्थानच्या सीमेवर अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जो काही सर्जिकल स्ट्राइक झाला त्यानंतरही पाकिस्तानचे बरळणे व शेपूट वळवळणे थांबलेले नाही. उलट वळवळते शेपूट भीतीने आत घालण्याऐवजी त्या शेपटाने फटके मारण्याचे काम सुरू आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर पाकिस्तानचे हल्ले सुरूच आहेत व आमचे जवान पाकड्यांच्या हल्ल्यात रोजच शहीद होऊ लागले आहेत. देशभरात दिवाळी साजरी होत असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात आपले चार जवान शहीद झाले. महाराष्ट्राचा वीरपुत्र नितीन कोळीदेखील देशाच्या रक्षणासाठी शहीद झाला असून संदीप सिंह रावत, जितेंद्र सिंह, मनदीप सिंह हे जवानही बलिदानाच्या वेदीवर चढले आहेत. संतापजनक आणि निर्घृण बाब अशी की, दहशतवाद्यांनी पळून जाताना शहीद मनदीपच्या पार्थिवाची विटंबना केली. त्याचे शीर कापून छिन्नविच्छिन्न केले. त्याच्या शरीराची क्रूर विटंबना केली. जवानांच्या बाबतीत विशेषत: युद्धकैदी व शहीद जवानांच्या पार्थिवाच्या बाबतीत कसे वागावे, काय करावे याचे आंतरराष्ट्रीय नियम ठरलेले आहेत; पण इतकी साधी माणुसकी दाखवील ते पाकिस्तान कसले? मुळात सैनिकांच्या वेशात जे लोक घुसतात ते दहशतवादीच असतात, त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करता येणार नाही. पाकिस्तानची खरी ताकद त्यांचे सैन्य दल नसून दहशतवादी आहे. सर्जिकल हल्ल्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची राजकीय माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर जाहीर सभांतून देत असतात, पण पाकिस्तानचे जे शेपूट वळवळताना फटके मारीत आहे त्या शेपटाचा सर्जिकल स्ट्राइक कधी करणार? याचे उत्तर जाहीर सभांतून नव्हे तर कृतीतूनच मिळायला हवे. मागील काही दिवसांत आपले सैन्य जरूर पाकिस्तानच्या या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देत आहे. सीमारेषेपलीकडील पाकिस्तानच्या लष्करी चौक्या उद्ध्वस्त करीत आहे. आपण केलेल्या गोळीबारात दहशतवादी आणि घुसखोरांबरोबरच अनेक पाकडे सैनिकही ठार झाले आहेत. आताही शनिवारी हिंदुस्थानी लष्कराने जोरदार प्रतिहल्ला करून कुपवाडा जिल्ह्यातील केरान क्षेत्रात नियंत्रण रेषेपलीकडील चार पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या. या हल्ल्यात पाकिस्तानी जवान मोठ्या संख्येने मारल्याची माहिती हिंदुस्थानी लष्करातर्फे दिली गेली. त्याआधी शक्करगढ भागात आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या जोरदार कारवाईत जवळजवळ १५ पाकिस्तानी रेंजर्सचा खात्मा केला होता. तेथील तळही उद्ध्वस्त केला गेला. हे सगळं ठीक असले तरी त्यामुळे ठोस काही होण्याची शक्यता नाहीच. मुळात पाकिस्तानी शेपटाची ‘वळवळ’ कायमची थांबवली पाहिजे. अन्यथा सीमा भागात आमच्या जवानांचे रक्त सांडतच राहील. आमचा हा जवान सीमेवर लढतो, स्वत:चे रक्त सांडतो, हौतात्म्य पत्करतो म्हणून देशात दिवाळी आनंदात साजरी होऊ शकते. आताही सीमेवर चार जवान शहीद झाले. अर्थात त्यांच्या या हौतात्म्याचे मोल पाकड्या कलाकारांना घेऊन सिनेमे बनविणार्यांना कधीच समजणार नाही. कुपवाडा जिल्ह्यात नितीन कोळी शहीद झाला. त्याच्या हौतात्म्याची बातमी येताच फक्त सांगलीवरच नाही तर महाराष्ट्रावर शोककळा पसरली. २०१० मध्ये त्याचा विवाह झाला. फक्त सहा वर्षांचे वैवाहिक आयुष्य, चार आणि दोन वर्षांची मुले. तरुण पत्नी, वडील, भाऊ, आई या सगळ्यांना सोडून नितीनसारखे असंख्य तरुण वीरपुत्र रोज कुर्बान होत आहेत. हे किती काळ चालणार? शहीदांच्या कुटुंबांची मन की बात जरा समजून घ्या! - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/veerputranchi-kurbani#sthash.vaRcnC4U.dpuf
No comments:
Post a Comment