Total Pageviews

Tuesday, 8 November 2016

खोट्या व बनावट नोटांवर मोदी सरकारचा सर्जिकल स्ट्राइक-ज्यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती असेल ते सामान्य नागरिकांमार्फत बदलण्याचा प्रयत्न करतील म्हणजे त्यांच्याकडे नोटा देऊन त्यांना बदलण्यास सांगतील. या प्रकारापासून लोकांनी सावधान राहावे. नोटा बदलण्याचे सर्व व्यवहार हे देखरेखीखाली असतील व त्यासाठी बॅंकांमध्ये विशेष कॅमेरे बसविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली

खोट्या व बनावट नोटांवर मोदी सरकारचा सर्जिकल स्ट्राइक कराची, लाहोर व पेशावर येथील पाकिस्तानच्या प्रेसमधे भारतीय चलनाच्या ५००व १००० रुपयाच्या बनावट नोटा छापल्या जातात. "पकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स',समझोता एक्सप्रेस,हवाला,कोरियरच्या मार्फत बनावट भारतीय नोटा नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथे धाडण्यात येतात. बनावट नोटा भारतात चोरट्या मार्गाने आणण्यासाठी शेजारी राष्ट्रांच्या भूमीचा वापर करण्यात येतो. ढाक्यात पाकिस्ताचा एक राजनैतिक अधिकारीच बनावट नोटा वितरित करताना सापडला. मैत्री व सद्भाव यासाठी सुरू करण्यात आलेल्या थर एक्स्प्रेसमधूनच बनावट नोटा भारतात आणल्या जात होत्या. गेल्या वर्षी बनावट नोटा भारतात घुसविणारे अनेक जा्ळी उघडकीस आली. काही महिलांना व मुलांना हे काम सोपविले जाते व जितक्या रकमेच्या बनावट नोटा ते भारतात आणतील त्याच्या दोन टक्के रक्क्म त्यांना बक्षीस म्हणून द्यायची, असे हे कारस्थान चालू अस्ते .भारताच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायची, हा आयएसआयचा डाव आहे. त्यासाठीही बनावट नोटांच्या शस्त्राचा उपयोग करण्यात आला; अशा प्रकारच्या कारवायांत दाऊद टोळीही गुंतली आहे. या नोटांची छपाई, कागदाचा दर्जा व त्यावरील गव्हर्नरची स्वाक्षरी हे सर्व इतके तंतोतंत असते, की खोटी व खरी नोट यातील फरक कळणे अवघड होते. बनावट नोटांचा सुळसुळाट आणि दहशतवादी कारवायातील त्यांची भूमिका, तसेच काळा पैसा यांना आळा घालण्याच्या हेतूने सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केला. नव्या 500 व 2000 रुपयांच्या नोटा दहा नोव्हेंबर रोजी चलनात येतील. बॅंकांमधील केवळ चलनविषयक व्यवहार बंद राहतील; परंतु इलेक्ट्रॉ निक पद्धतीने होणाऱ्या व्यवहारात खंड पडणार नाही. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या असल्या, तरी त्यावरील सुरक्षाविषयक चिन्हांचा भंग करण्यात शत्रंना ला यश आले नव्हते. 2011 ते 2016 या काळात नोटांचे चलन 11 टक्यां्र नी वाढले. मात्र त्यात 500 रुपयांच्या नोटांचे प्रचलन (सर्क्युालेशन) 76 टक्यां्र नी, तर 1000 रुपयांच्या नोटांचे प्रचलन 109 टक्यांाव नी वाढल्याचे आढळून आल्यानंतर सरकार सावध झाले. या काळात अर्थव्यवस्थेची एकंदर वाढ 30 टक्के इतकी नोंदली गेली होती. त्यामुळे नोटांचे प्रचलन वाजवीपेक्षा अधिक (डिसप्रपोर्शनेट) असल्याचे आढळून आल्यानेही सरकारने या उपायाचा विचार सुरू केला. अर्थ सचिवांनी सर्वसामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा देताना सांगितले, की ज्यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती असेल ते सामान्य नागरिकांमार्फत बदलण्याचा प्रयत्न करतील म्हणजे त्यांच्याकडे नोटा देऊन त्यांना बदलण्यास सांगतील. या प्रकारापासून लोकांनी सावधान राहावे. नोटा बदलण्याचे सर्व व्यवहार हे देखरेखीखाली असतील व त्यासाठी बॅंकांमध्ये विशेष कॅमेरे बसविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. नव्या नोटांची नक्कल करणे शक्य नाही पाचशे आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांवरही सुरक्षाचिन्हे अशा रीतीने छापण्यात आली आहेत, की त्यामुळे त्याची नक्कल करणे शक्यअ होणार नाही. एका प्रश्नाणच्या उत्तरात या अधिकाऱ्यांनी 500 रुपयांच्या 16.5 अब्ज, तर 1000 रुपयांच्या 6.7 अब्ज नोटा प्रचलनात असल्याची माहिती दिली. येत्या दोन महिन्यांत हे व्यवहार सुरळीत होतील, 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्याने काळ्या पैशास मदत होणार नाही का? नाही,नोटांच्या व्यवहारावर रिझर्व्ह बॅंकेतर्फे विशेष देखरेख आणि निगराणी ठेवली जाणार आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे या नोटा जारी करण्यामागील तर्क सांगताना ते म्हणाले, की 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांची संख्या एवढी प्रचंड आहे, की त्या बदलून लोकांना दुसऱ्या नोटा देण्यासाठी अधिक किमतीची नोट जारी करणे क्रमप्राप्त ठरले. आता कमी नोटांमध्ये सरकार लोकांच्या नोटा बदलून देऊ शकणार आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार २००० रुपयाची नोट दोन हजार रुपयाच्या नोटेमध्ये नॅनो जीपीएस चीप असणार.लवकरच २ हजार रुपयांच्या नोटा आणल्या जाणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाईदेखील पूर्ण झाली आहे. मात्र या नोटांची रचना अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे खोट्या नोटांच्या निर्मितीला आणि काळ्या पैशाला आळा बसणार आहे.२ हजार रुपयांच्या नोटांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. या नोटांची निर्मिती करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. लवकरच व्यवहारात येणाऱ्या २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये एनजीसी (नॅनो जीपीएस चीप) असेल. नॅनो जीपीएस चीप तंत्रज्ञान कसे काम करणार ? या नव्या तंत्रज्ञानाला काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उर्जेची आवश्यकता असणार नाही. एनजीसी फक्त सिग्नल परावर्तनाचे काम करेल. जेव्हा उपग्रहाकडून एनजीसीकडे त्याचे स्थान जाणून घेण्यासाठी संदेश पाठवला जाईल, तेव्हा दोन हजाराच्या नोटमध्ये असणारी एनजीसी उपग्रहाला सिग्नल पाठवेल. यामुळे नोट नेमकी कुठे आहे, तिचा सिरीअल नंबर नेमका काय आहे, याची माहिती मिळू शकेल. विशेष म्हणजे ही नोट जमिनीखाली १२० मीटर असेल तरी ती शोधून काढता येणे शक्य असेल. एनजीसी यंत्रणा नोटमधून काढता येणार नाही. यामुळे काळा पैसा कसा रोखला जाणार ? दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये एनजीसी असेल. त्यामुळे प्रत्येक नोट नेमकी कुठे आहे, हे शोधता येईल. शिवाय या नोटेच्या आजूबाजूला नेमकी किती रक्कम साठवून ठेवण्यात आली आहे, याची माहितीदेखील मिळू शकणार आहे. एखाद्या दोन हजार रुपयाच्या नोटेच्या जवळ जर मोठी रक्कम बऱ्याच कालावधीपासून असल्याचे आढळून आले, तर त्याची माहिती आयकर विभागाला दिली जाईल आणि याचा तपास सुरू होईल. पाचशे तसेच हजार रुपयांच्या १० नोटा बदलून घेऊ इच्छिणा-यांना नोटा बदलून घेताना आपले ओळखपत्र दाखवावे लागेल. देशात नोटांविषयी काही तरी कठोर निर्णय घेऊन काळ्या पैशाला आळा घालावा, अशी सूचना अनेक अर्थतज्ज्ञ अधूनमधून करत असतात. अर्थक्रांती नावाच्या संघटनेने मोठ्या नोटा एकदम बाद करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर ५० रुपयांवरील नोटा अस्तित्वातच असू नयेत, असेही त्यांनी म्हटले आहे. म्हणजे मोठे आर्थिक व्यवहार करताना ते व्यवहार नगदी नोटांमध्ये न होता बँकद्वारा ऑनलाइन पद्धतीने होतील. किंबहुना ते तसे करावे लागतील आणि बहुसंख्य आर्थिक व्यवहाराची लेखी नोंद होऊन दोन नंबरचे व्यवहार कमीत कमी होतील.

No comments:

Post a Comment