Total Pageviews

Tuesday, 8 November 2016

बनावट नोटांचा सुळसुळाट आणि दहशतवादी कारवायातील त्यांची भूमिका, तसेच काळा पैसा यांना आळा घालण्याच्या हेतूने सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केला


बनावट नोटांचा सुळसुळाट आणि दहशतवादी कारवायातील त्यांची भूमिका, तसेच काळा पैसा यांना आळा घालण्याच्या हेतूने सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केला. नव्या 500 व 2000 रुपयांच्या नोटा दहा नोव्हेंबर रोजी चलनात येतील, असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. बॅंकांमधील केवळ चलनविषयक व्यवहार बंद राहतील; परंतु इलेक्ट्रॉिनिक पद्धतीने होणाऱ्या व्यवहारात खंड पडणार नाही, असे अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले. नव्या नोटा अंध लोकांनाही समजतील अशा स्वरूपाच्या असतील, अशी माहितीही त्यांनी दिली. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या असल्या, तरी त्यावरील सुरक्षाविषयक चिन्हांचा भंग करण्यात कोणाला यश आले नव्हते, असा दावा पटेल व दास या दोघांनी केला. या नोटा रद्द करण्यामागील तर्क स्पष्ट करताना हे अधिकारी म्हणाले, की 2011 ते 2016 या काळात नोटांचे चलन 11 टक्यांस् नी वाढले असल्याचे सरकारच्या निदर्शनाला आले होते. त्यात 500 रुपयांच्या नोटांचे प्रचलन (सर्क्युनलेशन) 76 टक्यांहो नी, तर 1000 रुपयांच्या नोटांचे प्रचलन 109 टक्यांपय नी वाढल्याचे आढळून आल्यानंतर सरकार सावध झाले. या काळात अर्थव्यवस्थेची एकंदर वाढ 30 टक्के इतकी नोंदली गेली होती. त्यामुळे नोटांचे प्रचलन वाजवीपेक्षा अधिक (डिसप्रपोर्शनेट) असल्याचे आढळून आल्यानेही सरकारने या उपायाचा विचार सुरू केला, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थ सचिवांनी सर्वसामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा देताना सांगितले, की कदाचित ज्यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती असेल ते सामान्य नागरिकांमार्फत बदलण्याचा प्रयत्न करतील म्हणजे त्यांच्याकडे नोटा देऊन त्यांना बदलण्यास सांगतील. या प्रकारापासून लोकांनी सावधान राहावे. नोटा बदलण्याचे सर्व व्यवहार हे देखरेखीखाली असतील व त्यासाठी बॅंकांमध्ये विशेष कॅमेरे बसविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पाचशे आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्याबाबत माहिती देताना त्यांनी या नोटांवरही सुरक्षाचिन्हे अशा रीतीने छापण्यात आली आहेत, की त्यामुळे त्याची नक्कल करणे शक्या होणार नाही, असा दावा केला. 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्याने काळ्या पैशास मदत होणार नाही का, असे विचारले असता दास यांनी या नोटांच्या व्यवहारावर रिझर्व्ह बॅंकेतर्फे विशेष देखरेख आणि निगराणी ठेवली जाणार आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे या नोटा जारी करण्यामागील तर्क सांगताना ते म्हणाले, की 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांची संख्या एवढी प्रचंड आहे, की त्या बदलून लोकांना दुसऱ्या नोटा देण्यासाठी अधिक किमतीची नोट जारी करणे क्रमप्राप्त ठरले. आता कमी नोटांमध्ये सरकार लोकांच्या नोटा बदलून देऊ शकणार आहे. एका प्रश्ना्च्या उत्तरात या अधिकाऱ्यांनी 500 रुपयांच्या 16.5 अब्ज, तर 1000 रुपयांच्या 6.7 अब्ज नोटा प्रचलनात असल्याची माहिती दिली. येत्या दोन महिन्यांत हे व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वापसही त्यांनी व्यक्त केला. नोटांचे "सर्क्यु्लेशन‘ 16.5 अब्ज प्रचलनातील 500च्या नोटा 6.7 अब्ज प्रचलनातील 1000च्या नोटा

No comments:

Post a Comment