-
April
29, 2018 |
37 माओवादी नक्सली दहशतवादी मारतांना ‘पोलिसांना कशी ईजा झाली नाही?’ असा प्रश्न काही तथाकथित ‘बुद्धिवादी?’ संशयात्मा विचारताहेत, त्यांना ‘घट्ट व मठ्ठ’ सामान्यजनांचे प्रतिप्रश्न…
या आधी माओवाद्यांच्या हल्ल्यात जे अनेक पोलीस किंवा
सुरक्षा दलांचे जवान मारले गेलेत त्यावेळेस, माओवाद्यांना ईजा कशी झाली नाही? हा प्रश्न तुम्ही विचारला होता काय? तसेच, माओवाद्यांच्या
हल्ल्यात 76 जवान मारले गेल्यावर तुम्ही ‘आनंदोत्सव’ करता, मग अशा
अतिरेक्यांना मारल्यावर देशप्रेमी जनतेने आनंद व्यक्त केला तर तुम्हाला दु:ख का
होतेय? माओवादी अतिरेकी हे तांडा, पाडा किंवा गावांमध्ये अचानकपणे जाऊन अनेक निरपराध
निःशस्त्र लोकांची सर्वांसमोर हत्या करतात किंवा पोलिसांना बेसावधपणे घेरून अचानक
हल्ला करून त्यांना मारतात त्यावेळेस तुमची दातखीळ का बसते?
माओवाद्यांच्या मानवी हक्कांविषयी, न्यायाविषयी तुम्ही बोलता,मग तेच मानवी हक्क, न्याय हे निरपराध दलित, आदिवासी, वनवासी, गिरीवासी, पोलीस, सुरक्षा दलातील जवानांना, त्यांच्या कुटुंबीयांना लागू नाहीत का? प्रतिक्रियेमध्ये संरक्षण करतांना आक्रमक शत्रूचे
नुकसान झाले तर त्याला दु:ख होते, त्याप्रमाणेच
तुमचे वागणे आहे व म्हणूनच तुम्ही या देशाचे शत्रू आहात असे कुणी म्हटले तर?
No comments:
Post a Comment