Total Pageviews

Thursday, 12 April 2018

j&k: औरंगाबादचे सुपुत्र किरण थोरात शहीद

पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात केलेल्या गोळीबारात औरंगाबादचे सुपुत्र किरण पोपटराव थोरात हे शहीद झाले आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने या माहितीला दुजोरा दिला आहे. 

पाकिस्तानने बुधवारी पुंछमधील कृष्णा घाटीत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. त्यात किरण थोरात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं लष्कराच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं. थोरात हे वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील रहिवासी आहेत. 

दरम्यान, याआधीही पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर सुंदरबनी सेक्टरजवळ गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात रायफलमॅन विनोद सिंह आणि जाकी शर्मा शहीद झाले होते. भारतीय लष्करानही गोळीबाराला जशाच तसं उत्तर दिले. सुंदरबनी सेक्टरजवळील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने टार्गेट केले होते. 

No comments:

Post a Comment