येत्या वर्षभरात अशा अनेक घटना घडतील ज्या आडून हिंदुत्त्वावर हल्ला केला जाईल. विरोधक एकत्र येतील व आपल्याच धार्मिक मान्यतांवर आघात करतील. मात्र त्यावेळी ते विशिष्ट एका पक्षाच्या किंवा संस्था-संघटनेच्या विरोधात आहे असे म्हणून गप्प बसण्यात शहाणपण नाही हे लक्षात घ्यायला हवे. मला काय त्याचे या वृत्तीनेच आजवर भारताचा घात केला आहे.
एखाद्या बलात्कार, दंगल, खून अथवा जाळपोळीच्या घटनेआडून हिंदू समाजाला लक्ष्य करणे हे काही भारतात नवीन नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातील हिंदू समाज हे पाहात आलेला आहे. ब्रिटिश शासनकाळापासूनच हिंदू धर्मीयांना त्यांच्या धर्माबाबत तडजोडी कराव्या लागल्या आहेत. तेव्हाही व स्वातंत्र्यानंतरही जवळपास सहा दशके मुस्लिम लांगुलचालनाची परंपरा सत्ताधाऱ्यांनी चालूच ठेवली होती. त्यामुळे हिंदूंनी वारंवार अन्याय सहन केल्याच्या कितीतरी दाखल्यांनी इतिहासाची पाने भरलेली आहेत. हिंदुत्त्वासाठी काम करणाऱ्या संघटनाही त्यावेळी अशा सुलतानी संकटासमोर दुबळ्या ठरत असत. परंतु त्यांचे प्रयत्न कायमच तोकडे पडत राहिले. मात्र आता तसे राहिले नाही. हिंदुत्त्वासाठी काम करतो असे सांगणाऱ्या डझनभर संघटना आज देशात अस्तित्वात आहेत. त्यांचा विस्तारही सध्या चांगलाच फोफावला आहे. असे असतानाही यातील एकाही संघटनेने याविषयी अधिकृत भूमिका घेतलेली दिसत नाही. रासिनामधील निष्पाप मुलीला न्याय मिळावा ही तर देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा होती आणि आहे. अनेक संघटनांनी तिला न्याय मिळावा ही भूमिका तातडीने घेतली आणि ते आवश्यकही होते. मात्र या घटनेचे भांडवल करून निष्कारण थेट हिंदू समाजावर आरोप होत आहे हे दिसत असूनही यातील एकाही संघटनेने ठाम भूमिका घेतली नाही हे दुर्दैव.
कठुआ प्रकरण मोठे करण्यामागेच कारणच मुळी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करणे हे होते. कारण तसे नसते तर देशभरात कितीतरी बलात्कारांच्या घटनांच्यावेळीही अशीच आंदोलने दिसली असती. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये झालेले अल्पवयीन मुलींवर दिवसाढवळ्या झालेले बलात्कार हे जणू त्यांच्यावर संस्कार करण्यासाठीच केलेले असतात अशा थाटात पुरोगामी मंडळी त्याकडे दुर्लक्ष करतात. डाव्यांची ही बेगडी मानवता आता साऱ्या जगाला माहिती आहे त्यामुळे त्यांच्याकडून सद्वर्तनाची अपेक्षा नाहीच. पण जेव्हा हे लक्षात आले की हे सर्व या पद्धतीने रंगवण्यामागे भाजपला बदनाम करण्याचा डाव होता तेव्हा भाजपने त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. पण तो राजकीय विरोध होता. म्हणजे भाजपने पोलीस योग्य ती कारवाई करतील यासाठी प्रयत्न केले, त्या गावात सीबीआयच्या तपासाची मागणी करणाऱ्या मोर्च्यात सहभागी झालेल्या भाजप मंत्र्यांचे राजीनामे घेतले, आपल्यावरील टीकाकारांना उत्तरेही दिली. अशाप्रकारे राजकीय आरोप करणाऱ्यांना भाजपने आपल्या पद्धतीने विरोध केला. मात्र हाच विरोध जेव्हा भाजपच्या आडून हिंदुत्त्वावर गेला तेव्हा मात्र भाजपने त्यावर मौन बाळगणेच पसंत केले.
मुळात या सर्व प्रकाराला हिदू विरुद्ध मुस्लिम असा रंग केव्हा दिला गेला हे समजून घेतले पाहिजे. १७ जानेवारी २०१८ या दिवशी त्या मुलीचा मृतदेह जंगलात सापडल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. त्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास सुरु झाला व प्राथमिक संशयित म्हणून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. १९ जानेवारी २०१८ या दिवशी जम्मू काश्मीर सरकारने विधानसभेत याविषयी निवेदनही दिले. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी याविषयी आपल्या सोशल मिडियावर खेदही व्यक्त केला. यानंतर दहाच दिवसांत म्हणजे २९ जानेवारी २०१८ या दिवशी पिडित मुलीच्या कुटुंबियांनी वकिल व आपल्या समाजातील काही जणांसमवेत मुख्यमंत्री मुफ्ती यांची भेट घेतली. २९ जानेवारी ते १ एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये हे सगळे प्रकरण आकार घेत गेले. दुसरीकडे आपल्याला हिंदू असल्यामुळे पोलिसांनी त्रास दिला असे आरोपीच्या कुटुंबियांना वाटत होते. जम्मू भागातील रोहिंग्या मुस्लिमांचे वाढते प्रस्थ कोणाच्या नजरेस येऊ नये त्यामुळे हे प्रकरण मुद्दाम असे रंगवले जात आहे असा संशय येऊन गावकऱ्यांना ही सरकारची चाल वाटली. दुर्दैवाने यालाच विरोध करण्यासाठी त्यांनी हिंदू एकता मंचाची स्थापना केली आणि तिथेच विरोधकांच्या हातात मुद्दा मिळाला. मग पुढची वाटचाल सोपी होती. आधी भाजपला विरोध करायचा, मग मंदिरांचा मुद्दा काढायचा, मग बॉलिवूड अभिनेत्रींना गाठायचे आणि मग हिंदूंना ठोकून काढायचे असा आराखडा तयार केला गेला.
जोपर्यंत भाजपला विरोध सुरु होता तोपर्यंत त्याला भाजपने उत्तर देणे हेच योग्य होते. मात्र जेव्हा या प्रकरणाचा संबंध थेट मंदिर, देवीस्थान, हिंदू धर्म याच्याशी जोडला गेला तेव्हा मात्र त्याला देशभरातून विरोध होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. स्वतःला प्रखर हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनाही यात नेमकी काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट झाले नाही. एकीकडे बलात्कार व खून याचा तीव्र शब्दांत निषेध करून निष्पक्ष तपासाची मागणी करणे व दुसरीकडे तितक्याच तीव्र शब्दांत या प्रकरणाचा हिंदुत्त्वाशी संबंध लावण्याला विरोध करणे अशी भूमिका खरंतर या संघटनांनी घ्यायला हवी होती. मात्र दुर्दैवाने स्वतःच्याच प्रचाराची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे हिंदुत्त्वासमोर निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी उसंत मिळाली नसावी. देशात खरंतर राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्त्वासाठी काम करणाऱ्या अशा अनेक संघटना आहेत. त्या एकमेकांशी संबंधित आहेत. त्या सर्व संघटनांचे जम्मू काश्मीरमधील किमान जम्मू परिसरात तरी काम आहे. त्यांनी वेळीच घटनेतील सत्य जगासमोर मांडून होणारे नुकसान टाळायला हवे होते. मात्र तसे झाले नाही कारण संस्थागत अभिनिवेश व हित यापेक्षा हे महत्त्वाचे वाटले नाही. वास्तविक व्यापक हिंदू हिताच्या कितीतरी मोठ्या आंदोलनांचा इतिहास अशा संघटनांच्या पाठीशी आहे. मात्र तरीही यावेळी गाफिल राहिल्यामुळे बलात्काराच्या आडून थेट हिंदुत्त्वावर हल्ला केला गेला आणि कोणीच काहीच करू शकले नाही.
केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही तर निरनिराळ्या राज्यांतही विविध हिंदुत्त्ववादी पक्ष अस्तित्वात आहेत. आपापल्या राजकीय उद्देशासाठी ते हिंदुत्त्वाचा डंका वाजवत असतात. मात्र जेव्हा कठुआ प्रकरणात थेट हिंदू धर्मावर हल्ला झाला तेव्हा मात्र यातील एकही राजकीय पक्ष काहीही बोलला नाही. हे भाजपविरोधात आहे ते पाहून घेतील अशी भूमिका बहुतांश पक्ष व संघटनांनी घेतली. बॉलिवूड सिनेतारकांनी हातात बॅनर घेऊन काढलेल्या फोटोंमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख नव्हता. त्यावर सरळ सरळ हिंदुस्थान, देवीस्थान, मंदिर असे उल्लेख होते ज्यातून उघडपणे हिंदू धर्म, संस्कृती यांच्यावरच प्रश्न उपस्थित केले गेले होते. मात्र देशभरात एकाही हिंदुत्त्ववादी पक्षाने याबाबत भूमिका घेतली नाही हे दुर्दैव. आपापल्या प्रादेशिक अस्मिता जपण्यातच धन्यता मानणाऱ्या या संघटनांनी उगी राहून जे जे होईल ते ते पाहण्यातच धन्यता मानली. नाही म्हणायला सोशल मिडियातून वेळोवेळी हिंदुत्त्ववादी मंडळींनी या प्रकाराचा विरोध केला. मात्र ते प्रयत्न विखुरलेले होते त्यामुळे अपुरे पडले. विशेष म्हणजे निदान या पक्ष-संघटनांनी त्या मुलीला न्याय मिळावा अशी भूमिका तरी घ्यायला हवी होती मात्र ती ही न घेतल्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावले.
कठुआ प्रकरणाने शिकवलेला तिसरा धडा म्हणजे किमान आतातरी मला काय त्याचे ही प्रवृत्ती सोडायला हवी. येत्या वर्षभरात अशा अनेक घटना घडतील ज्या आडून हिंदुत्त्वावर हल्ला केला जाईल. विरोधक एकत्र येतील व आपल्याच धार्मिक मान्यतांवर आघात करतील. मात्र त्यावेळी ते विशिष्ट एका पक्षाच्या किंवा संस्था-संघटनेच्या विरोधात आहे असे म्हणून गप्प बसण्यात शहाणपण नाही हे लक्षात घ्यायला हवे. मला काय त्याचे या वृत्तीनेच आजवर भारताचा घात केला आहे. त्यामुळे किमान आता तरी त्यातून शहाणपण शिकून व्यापक हिंदुत्त्वाचा विचार करत वेळोवेळी समोर उद्भवलेल्या प्रश्नांना एकत्रितपणे सामोरे जायला हवे. त्याच वेळी किमान राष्ट्रीय विचारांची सरकारे असलेल्या राज्यांत तरी कठुआ सारख्या घटना मुळात घडणारच नाहीत याची दक्षता त्या सरकारने घ्यावी यासाठी दबावगट निर्माण करायला हवा. कठुआ प्रकरण मुळात घडायलाच नको होते व ही त्या सरकारमध्ये बसलेल्या सर्वच पक्षांची जबाबदारी होती. मात्र दुर्दैवाने असे घडले जरी तरी त्यावर तातडीने उपाय करून त्यातून पुढे निर्माण होणारा अनर्थ टाळायला हवा. बलात्कारांकडे पाहण्याची आपली दृष्टी ही पिडितेला न्याय मिळायला हवा व आरोपीला कठोर शिक्षा मिळायला हवी तसेच बलात्कार पूर्णपणे थांबले पाहिजेत अशी असते मात्र त्याचे राजकीय भांडवलही केले जाते हा धडा नवीन आहे. त्यामुळे त्यापासूनही सावध राहायला हवे
गेले काही दिवस कठुआ येथील बलात्काराच्या प्रसंगानंतर ‘डाव्या लिबरल’ समजल्या जाणार्या लेखनिक आणि प्रसारमाध्यमांचा गदारोळ सुरू झाला आहे आणि हिंदुत्ववादाबद्दल राळ उठवली जात आहे. कठुआ येथील एका बालिकेच्या हत्येची आणि तिच्यावर झालेल्या बलात्काराची कथा मन सुन्न करून टाकणारी आहे. या घटनेला जे कारणीभूत असतील त्यांना लवकरात लवकर आणि अधिकाधिक कठोर शासन झाले पाहिजे. परंतु, ही प्रक्रिया घडत असताना त्या आधारे प्रचाराचे जे रान उठविले जात आहे आणि जणू काही अशा घटना या हिंदू समाजाच्या नेहमीच्या व्यवहाराचा भाग आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामागची कारणमीमांसा तपासून घेण्याची गरज आहे. वास्तविकरित्या, कायद्याच्या दृष्टीने बलात्कारित पीडितेचे नाव आणि फोटो देण्यास बंदी आहे. परंतु, त्या नावाचा आणि चेहर्याचा उपयोग करून जी प्रचाराची मोहीम चालवली जात आहे, ती अत्यंत तिरस्करणीय आहे. असे असेल तर आजवर झालेल्या बलात्कारित स्त्रियांचा धर्म कोणता होता आणि बलात्कार करणार्यांचा धर्म कोणता होता, याची यादी घेऊन हिशोब मांडावा लागेल. हिंदू धर्मसंकल्पनांमध्ये आणि मुस्लीम धर्मसंकल्पनेतील दोन मूलभूत फरक लक्षात घेतले पाहिजे. बलात्कार आदी गोष्टी हिंदू धर्मसंकल्पनेच्या कधीही भाग नव्हत्या. परंतु, इस्लामी धार्मिक संकल्पनांमध्ये इस्लामेतर लोकांना जगण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशा काफर लोकांवर केलेले कोणतेही अत्याचार हे अत्याचार ठरत नाहीत. आज मध्य पूर्वेतील देशांत मुस्लीम यादवीने जे थैमान मांडले आहे, त्यात मानवी हत्याकांड आणि बलात्कारासारख्या घटना या नेहमीच्या बाबी बनल्या आहेत आणि त्या बाबी जिहादचा एक भाग म्हणून केल्या जात आहेत. अजूनही शरीयतनुसार महिलांना दगडाने ठेचून मारण्याचे प्रकार काही मुस्लीम देशांत घडत आहेत आणि त्याला धार्मिक समर्थन आहे. यातील दुसरा भाग असा की, जातीभेद, समाजातील उच्च-नीच भाव हा हिंदू धर्म परंपरेचा एक भाग इतिहासात होता. परंतु, त्यात परिवर्तन घडवून आणण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून अशा चालीरितींना विरोध करणारा मोठा वर्ग हिंदू समाजात निर्माण झाला आहे. परंतु तलाक, बहुपत्नीत्व अशासारख्या स्त्रियांना अन्यायकारक असणार्या परंपरामध्ये बदल घडवून आणण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो, तेव्हा धर्माच्या आधारावर त्याला विरोध केला जातो. त्यावरून मुस्लीम मानसिकतेवर अजूनही कट्टर धार्मिकतेचा किती प्रभाव आहे, हे लक्षात येते. परंतु, हा समाज उदारमतवादी लोकशाहीमध्ये मुख्य प्रवाहात सामील व्हावा, यादृष्टीने स्वतःला ‘लिबरल’ समजणारे हे घटक कोणताही प्रयत्न करीत नाहीत; उलट जे असे करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना हिंदू जातीय वादाच्या गटात टाकून मोकळे होतात.
कठुआ येथे झालेला जो घटनाक्रम प्रसिद्ध झाला आहे, त्यानुसार स्थानिक पोलीस अधिकार्यांनी याची चौकशी दाबण्याचा प्रयत्न केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी याची चौकशी करीत असताना या घटनेशी संबंध नसणार्या अनेक तरुणांना कैद करण्यात आले आणि त्या भागात पोलिसी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम म्हणून ही चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी सुरू झाली आणि त्याचा परिणाम निदर्शनांत आणि तेथील वकिलांच्या आंदोलनात झाला. या दोन्ही घटनांमुळे या घटनेला वेगळी दिशा देण्याचा स्वतःला ‘डावे लिबरल’ म्हणणार्या घटकांनी प्रयत्न सुरू केला. पोलिसांच्या दहशतवादाविरुद्ध आणि चौकशी सीबीआयकडे सोपवावी, या मागणीसाठी झालेले आंदोलन बलात्काराच्या व खुनातील आरोपीच्या समर्थनासाठी आहे, असे चित्र निर्माण केले गेले आणि जणूकाही देशभरातील वाढत्या हिंदुत्वाच्या प्रभावामुळेच हे घडत आहे, असा प्रचार-प्रसार माध्यमांतून देशात आणि विदेशात केला गेला. हे करीत असताना सामान्य सभ्यता आणि सुसंस्कृततेच्या मर्यादाही ओलांडल्या गेल्या. त्याची तीव्र प्रतिक्रिया हिंदू समाजमनात खदखदत आहे. दुसर्या बाजूला पाकिस्तान व काश्मीरमधील फुटीरतावादी शक्ती याचा फायदा घेऊन काश्मीरमधील वातावरण अधिक कसे बिघडविता येईल, याचा प्रयत्न करीत आहेत.
चाललेले हे सर्व प्रकार हे हिंदुत्ववादी शक्तींना बदनाम करण्यासाठी आजवर चाललेल्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. १९४८ साली महात्मा गांधींची हत्या झाली. या हत्येमध्ये अनेक घटक काम करीत होते, हे आता नवनव्या संशोधनांवरून स्पष्ट होत आहे. परंतु, या हत्येशी सुतरामसंबंध नसतानाही संघावर बंदी आणण्यात आली. यावेळचा प्रचार एवढा जबरदस्त होता की, राजसत्तेबरोबर सामाजिक वातावरणही संघाच्या विरोधात गेले होते. परंतु, त्यातूनही संघ बाहेर पडला आणि विस्तारू लागला. १९७३ पासून इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली आणि त्यातून जयप्रकाश नारायण यांच्या ’संपूर्ण क्रांती’ आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन निपटता न आल्याने इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली आणि त्यानंतर संघावर बंदी आणली. त्यावेळी राजसत्ता संघाच्या विरोधात असली तरी सर्व विरोधी पक्ष आणीबाणीच्या विरोधात संघाबरोबर होते आणि नंतर त्यांना लोकांनीही साथ दिली. या सर्व संघर्षात संघाची प्रतिमा अधिक उजळून निघाली आणि संघाचा प्रभाव पुढच्या काळात अधिक वाढला. बाबरी ढांचा उद्ध्वस्त झाल्यानंतर संघावर आणखी एकदा बंदी आली. ही बंदी न्यायालयानेच उठवली आणि या प्रसंगी हिंदू समाज संघाच्या पाठीशी उभा राहिला आणि पुढे काही वर्षांतच राजकीय परिवर्तन घडले. त्यानंतरच्या दोन शतकांत जे सामाजिक आणि राजकीय परिवर्तन होत आहे, त्यामुळे हिंदुत्वविरोधी शक्ती अस्वस्थ झाल्या आहेत. मधल्या दहा वर्षांच्या संपुआ सरकारच्या काळात ’भगवा दहशतवाद’ या नावाने हिंदुत्ववादी शक्तींना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, त्यांना त्यात यश आले नाही. याचे कारण ‘जिहाद’च्या नावाने केलेले युद्ध किंवा हिंसाचार हा मुस्लीमधर्माचाच भाग आहे, असे मानणारा प्रभावी मुस्लीम गट आजही मुस्लीम धर्मात आहे. परंतु, युद्ध किंवा हिंसाचार यांना धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून हिंदू संस्कृतीने इतिहासात किंवा वर्तमानात कधीही मान्यता दिलेली नाही. काही अपवादात्मक शक्ती अतिरेकी भाषा बोलत असतात. तरी त्याला व्यापक जनसमर्थन कधीही मिळालेले नाही. हिंदुत्त्ववादी शक्तींच्या वाढत्या प्रभावाचा परिणामम्हणून मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आपली सद्दी संपणार हे लक्षात आल्याने या सर्व शक्ती हिंदुत्ववादाला पराभूत करण्यासाठी सर्व प्रकारच्या मार्गांचा उपयोग करून आपली शक्ती एकवटत आहेत. वैचारिक युद्धापासून हिंसक आंदोलन करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या माध्यमांचा ते उपयोग करीत आहेत.
No comments:
Post a Comment