सेन्सॉर बोर्ड ज्या प्रकारच्या उत्तान सिनेमांना मंजुरी देत आहे ते लक्षात घेता, भविष्यात समाजातील वातावरण वैचारिकदृष्टय़ा अधिकच दूषित होत जाणार यात दुमत नाही. ईलतेची विषवल्ली भारतासारख्या आध्यात्मिक देशातील वातावरण वैचारिकदृष्टय़ा कलुषित करत सुटली आहे.
अल्पवयीन मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत समाजातील या सर्वच थरातील स्त्री तिच्यावरील अत्याचाराने पिचली जात आहे. या सर्व गोष्टींचा अंत कधी होणार? असा प्रश्न पडतो. सरकारी यंत्रणा त्यांच्यापद्धतीने या जटील समस्येवर उपाययोजना शोधून काढेपर्यंत वाट पाहात बसण्याचे आजचे दिवस नाहीत. स्त्रियांचे शोषण करणा-या नराधमांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे उडवून आपली दहशतच समाजात निर्माण केली आहे. त्यांना कसलाच धाक नसल्याचाच हा परिपाक आहे. समाजात ईलता पसरवणा-या गोष्टींचा बिमोड करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण, त्या ईलतेचा त्रास समाजातील असंख्य स्त्रियांना सोसावा लागत आहे. बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषण या महिलांविषयीच्या अपप्रकारांत देशात प्रतिदिन वेगाने वाढ होत आहे. या अपप्रकारांचे कुळ आणि मूळ हे ‘तीव्र कामवासने’त आहे. या सूत्राच्या मुळाशी आपण गेलो असता लक्षात येईल की, वासना भडकवणारे चित्रपट, विज्ञापन आणि समाजमाध्यमे यांतून मोठय़ा प्रमाणावर ईल गोष्टींना उत्तेजन दिले जात आहे. सेन्सॉर बोर्ड ज्या प्रकारच्या उत्तान सिनेमांना मंजुरी देत आहे ते लक्षात घेता, भविष्यात समाजातील वातावरण वैचारिकदृष्टय़ा अधिकच दूषित होत जाणार यात दुमत नाही. ईलतेची विषवल्ली भारतासारख्या आध्यात्मिक देशातील वातावरण वैचारिकदृष्टय़ा कलुषित करत सुटली आहे. जेव्हापासून इंटरनेटचा पसारा वाढला आहे, तेव्हापासून तर सामाजिक वातावरण वेगाने दूषित झाले आहे. जेथे चित्रपटात उत्तान भूमिका करणा-या अभिनेत्रीस समाज डोक्यावर घेतो, तेथेच लक्षात येते की, समाजात ईलतेने आपली पाळेमुळे किती घट्ट रुजवली आहेत.
मुलींना कपडे कसे घालावे, हे सांगण्यापेक्षा पुरुषांनी आपले विचार बदलावे असे नेहमी सांगितले जाते. वारंवार चर्चिल्या जात असलेल्या या सूत्राच्या आनुषंगाने सांगावेसे वाटते की, स्त्रियांसाठी समाजातील प्रतिदिन दूषित होत चाललेले वातावरण पाहता विषाची परीक्षा घेऊन स्त्रीने संकटाच्या जबडय़ात स्वत:हून चालून जाऊ नये. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असे म्हटले जाते. ते शहाणपण आपल्यात आल्यास आपलेच शील रक्षण होणार आहे. या सूत्रावरून निर्थक वाद घालण्याचा काळ आता राहिलेला नाही. स्त्रीकडे वाकडय़ा नजरेने पाहणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. आपल्याकडून त्यासाठी खतपाणी घातले जात नाही ना. याचाच विचार महत्त्वाचा आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या पेहरावाबाबत विचारले असता त्यांचे सांगणे असते की, तिच्या अन्य मैत्रिणीही असेच कपडे घालतात. मग तिलाही ‘मॉडर्न’ राहावेसे वाटते. नाहीतर ते तिला ‘काकूबाई’ म्हणून चिडवतात. अंगभर कपडे घातले म्हणून कोणी काकूबाई होत नाही आणि मॉडर्न कपडे परिधान केले म्हणून कोणी ‘स्मार्ट’ होत नाही. समाजातील बिघडलेले वातावरण लक्षात घेऊन आपल्या पेहरावात सुधारणा करण्याविना आता तरी पर्याय उरलेला नाही. हे सत्य जाणा. घातक वायू प्रदूषणापासून रक्षण होण्यासाठी तोंडाला ‘मास्क’ बांधले जाते. मास्क बांधल्यावर लोक काय म्हणतील, याचा विचार करून प्राथमिक सुरक्षेचा उपाय जे टाळतात, त्याचा फटका मास्क न वापरणा-यांना जटील शारीरिक त्रासांच्या माध्यमातून बसतोच बसतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील नागरिकांना याचा उत्तम अनुभव आहे.
याच सूत्राचा पेहरावाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याचे गांभीर्य लक्षात येईल. शाळा, महाविद्यालये ते विविध कार्यालयांतील मुला-मुलींच्या प्रेम प्रकरणांच्या भानगडी लक्षात घेता समाजातील व्यक्ती यातील मुलींवरील कठीण प्रसंगी साहाय्यास जाण्यास इच्छुक नसतात; कारण प्रेमाच्या नावाखाली काय चालू असते हे समाजाला ज्ञात आहे. त्यामुळे पालकांनीच आपल्या पाल्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे. त्यांना अवास्तव स्वातंत्र्य देणे म्हणजे धोका पत्करणे होय. शारीरिक आकर्षणाला प्रेम म्हटले जाणे यासारखा शुद्ध अडाणीपणा तो कोणता? आपला विवाह योग्य जोडीदाराबरोबर व्हावा, हे आपल्यापेक्षा आपल्या पालकांना नेहमी वाटत असते. त्यासाठी ते आपणास बालपणापासूनच तळहातावरील फोडाप्रमाणे जपत असतात. प्रसंगी स्वत:च्या आवडीनिवडींना तिलांजली देत आपणास काही कमी पडू देत नाही; पण जेव्हा एवढे करूनही आपले पाल्य भरकटल्याचे इतरांकडून कळते तेव्हा सर्व केलेल्यावर पाल्याने पाणी फेरल्याचा धक्का त्यांना बसतो. शिक्षणाच्या वयात शिक्षणच घेतले, तर त्याचा अखंड आयुष्यभर फायदा होत राहतो.
समाजावर बॉलिवूड चित्रपट जगताचा प्रचंड पगडा आहे. नायक- नायिका म्हणजे आपले जीवन घडवणारे ‘गुरू’च या आविर्भावात त्यांचे गोडवे गायले जातात. बहुतांश चित्रपटांमधून जे चुकीचे पेरले गेले, तेच आज समाजात भरघोसरीत्या ईलतेच्या रूपाने उगवले आहे. चांगल्या गोष्टींचे आकलन होण्यास नेहमीच विलंब लागतो; पण वाईट कृत्य मात्र चटकन अंगीकारली जातात. चित्रपटांमध्ये नायक-नायिका यांच्यात प्रेम प्रकरण दाखवल्याविना तो चित्रपट पूर्ण होत नाही. नायक आपल्या नायिकेसाठी काय काय करतो हे सध्याच्या युवकांच्या मनावर कोरले गेले आहे. चित्रपटात जे जे दाखवले जाते ते कोणताही विचार न करता आत्मसात केले जाऊन त्याप्रमाणे नक्कल करण्याचा आटापिटा केला जातो. शाळा-महाविद्यालय सुटल्यावर बस, रेल्वे स्थानकावर बहुतांश मुलं-मुली तासन्तास रेंगाळत बसलेली दिसतात. चित्रपट दाखवतात त्याप्रमाणे एखाद्या मुलीला प्रपोज करण्याचे नाटक करणे, तिच्या सोबत बोलून दाखव, धक्का मार, फिरायला येण्याबाबत विचारणे आदी गोष्टी करण्यासाठी मुले पैज लावतात आणि तोच कित्ता गिरवण्याचा सपाटा लावतात. हे करत असताना योग्य-अयोग्य याचे भान नसते आणि चुकीच्या ध्येयाचे शिखर गाठण्यासाठी एखाद्याच्या जीवावरही तुटून पडण्यास कचरले जात नाही. स्त्री म्हणजे केवळ भोगवादी, शोभेची वस्तू अशा अत्यंत घातक विचारांनी झपाटलेली अशी मुले समाजासाठी घातकच! कोणत्या तरी नायकाप्रमाणे नक्कल करणारे महाभाग हा विचार कधीच करत नाहीत की, डायरेक्टरने सांगितल्याप्रमाणे भूमिका करण्याचे त्या नायकाला पैसे मिळतात आणि त्या भूमिकेशी संबंधित कृती फक्त ३ तासांच्या चित्रपटात शक्य आहे. काही तासांचा चित्रपट आणि प्रत्यक्ष जीवन यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण, चित्रपट हा ठरवलेल्या संवादाप्रमाणे असतो तर आपले जीवन हे आपल्याला घडवायचे असते. टाळी दोन हातांनीच वाजते.
त्याप्रमाणे या सूत्राविषयी मुलींच्या सहभागाचा विचार केला असता त्यांनी या गोष्टींपासून लांबच राहात आपले शील रक्षण केले पाहिजे. बहुतांशपणे प्रेम म्हणून नव्हे, तर शरीर सुख प्राप्त करण्यासाठी मुलींशी मैत्री केली जात असते. हे फसवणूक झाल्यावर लक्षात येते. त्यामुळे सावध असा. यालाच अनुसरून सूत्र असे की, सामाजिक वातावरण बिघडवणा-या अनेक घटना मोकाटपणे तरुणाईकडून सार्वजनिक ठिकाणी चालू असतात. त्यांना चाप लावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनीच पुढाकार घेऊन त्याविषयी पोलिसांत तक्रार देऊन ते अपप्रकार थांबेपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा ठेवला पाहिजे. यासाठी जे शक्य आहे, ते केलेच पाहिजे. रस्त्यावरचा कचरा उचलण्यासाठी सार्वजनिक व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे सामाजिक वातावरण खराब करणा-यांना धडा शिकवण्यासाठी लोकशाहीने घालून दिलेल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. तर हाही कचरा राहणार नाही. आजमितीस अशा गोष्टींकडे पाहून कानाडोळा होत असल्याने, अशा गोष्टींशी संबंध नसणा-यांना त्याचा नाहक त्रास वाईट नजरांच्या माध्यमातून सोसावा लागत आहे. सायंकाळच्या वेळी घराघरांतून श्लोक, प्रार्थना ऐकू येणे बंदच झाले आहे. आता येतो तो फक्त मालिकांचा आवाज. नको त्या विचारांतून बाहेर येण्यासाठी प्रार्थना, श्लोक आवश्यक आहेत. यातून व्यक्तीला जे मानसिक समाधान मिळते ते कशातही मिळत नाही; पण त्यासाठी श्लोक, प्रार्थना म्हटले गेले पाहिजे ते आपल्यासाठी पालकांनी म्हणून उपयोगी नाही.
रात्री उशिरापर्यंत विनाकारण घराबाहेर राहणे, अनोळखी व्यक्तीकडे लिप्ट मागणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत. स्त्रीने स्वत:तील सुप्त शक्तीला जागृत करण्यासाठी आतातरी कार्यरत झाले पाहिजे. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याकडे लक्ष केंद्रित करून आपल्याकडे वाईट नजरेने पाहणा-यांना तत्काळ तडाखे देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. आताचे दिवस गाफील राहण्याचे नसून सावध राहण्यातच शहाणपण आहे. कुटुंबामध्ये एक मुलगी जरी शिकली तरी अखंड कुटुंबाची सर्वागीण प्रगती होते. म्हणूनच आपण म्हणतो की, ‘मुलगी शिकली प्रगती झाली.’ स्त्री जन्माचे महत्त्व खूप मोठे आहे. आपल्याला अनेक शूर-वीर स्त्रियांचा इतिहास लाभला आहे, त्याप्रमाणे मार्गक्रमण करून आपणही त्यांच्याप्रमाणे गुण अंगीकारणे ही काळाची गरज आहे. दुसरे सूत्र असे की, शांत राहून न्याय मिळत नाही. मग करायचे तरी काय? सामाजिक हितासाठी काय हवे, काय नको? हे आता जागृत जनतेनेच पुढाकार घेऊन ठरवावे. समाजामध्ये ईलता पसरवण्यास कारणीभूत असणा-या घटकांना आता जागृत नागरिकांनीच वैधपणे कडाडून विरोध करत ईलतेला समाजातून हद्दपार करण्यासाठी कंबर कसली पाहिजे
No comments:
Post a Comment