Total Pageviews

Wednesday, 7 March 2018

भयगंडाने झपाटलेल्या ममता महा एमटीबी 07-Mar-2018




संघ-भाजप बंगालमध्ये जातीय तणाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत असून अशा लोकांना शोधून आणण्यासाठी जे नागरिक मदत करतील त्यांना सरकार रोखरक्कम किंवा सरकारी नोकरीत सहभागी करून घेणार आहेनुसती माहिती देण्यासाठी इतके मोठी रक्कम देणारे हे पहिलेच सरकार असावेममतांचा भयगंड यासाठीकारणीभूत आहे.
 
 
शान्य भारतातील भारतीय जनता पक्षाचा विजय जसा ‘पक्ष’ म्हणून महत्त्वाचा आहेतसाच तो राजकीय घटनाक्रमातही महत्त्वाचा मानावा लागेल.संघ भाजपमध्ये या निकालामुळे चैतन्य आले असले तरी राजकीय पटलावर त्याच्या उमटणार्‍या प्रतिक्रिया टिपणे औचित्याचे आहेसुनील देवधर त्यांच्या चमूने त्रिपुरात मारलेली मुसंडी लक्षणीयचभाषाभौगोलिक परिस्थिती या सगळ्यावर मात करून देवधरांनी तिथे भाजपला विजयाची वाटदाखविलीत्रिपुरातील यशानंतर एक व्यक्ती सातत्याने या विषयी प्रतिक्रिया देत आहेही व्यक्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीअसल्याने त्या कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ शकतातयाची पुरेपूर कल्पना येऊच शकते.
 
राजकारणात काहीही सरळ नसतेएखादा राजकीय नेता अभिव्यक्त होतोतेव्हा त्याच्या अंतर्मनात काय सुरू आहेत्याचेच हे प्रतिबिंब असते.आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले होते की, ‘‘हा भाजपचा विजयच नाहीत्रिपुरातील माणिक सरकार भोवताली इतके घडत असतानाढिम्म होतेसंघ आणि भाजपने बाहेरून माणूस आणला आणि त्याने त्रिपुरा जिंकले.’’ या पहिल्या प्रतिक्रियेनंतर आजतागायत त्यांच्या ज्या ज्याप्रतिक्रिया आल्या आहेतत्या ममता बॅनर्जींच्या खुर्चीला बसू लागलेल्या हादर्‍यांचे प्रतिबिंबच मानावे लागेलकालचे त्यांचे नवे विधानही अशाचआशयाचे आहेत्यांच्या आक्रस्ताळी स्वभावाला अनुसरून ममतांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहेबर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथेत्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश देताना एक नवी योजनादेखील मांडलीत्यांच्या योजनेचा गाभाच मुळी संघ आणि भाजप द्वेषावर अवलंबलेलाआहेरास्वसंघ आणि भाजप स्थानिक तरुणांना जातीय दंगे घडविण्यासाठी प्रवृत्त करीत आहेतसंघाचे लोक अल्पसंख्याकांच्याप्रार्थनास्थळांमध्ये मांसाचे तुकडे फेकण्यासाठी पैसे देत आहेतत्यामुळे जातीय तणाव वाढत असल्याचा दावा ममताबाई करतातहाबरा येथे असेकरणार्‍या संघाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलेआता या अंधेर नगरीत कोणाला अटक केली गेली आहेकोणत्याआरोपाखाली अटक केली गेली आहेहे कोणीही सांगू शकत नाहीखुद्द राज्यकर्त्याचा दृष्टिकोन इतका दूषित असेल तर खाली प्रशासन कसे वागतअसेल हे सांगायला वेगळ्या प्रकारच्या तपशीलांची गरज नाहीया पुढे जाऊन ममतांनी पोलिसांना आदेश दिले आहेत कीत्यांनी अशागावागावांमध्ये समित्या स्थापन कराव्याजातीय तेढ निर्माण करण्याचे काम जर कुणी करीत असले तर त्यांची माहिती देणार्‍यांना रोख रकमेच्यास्वरूपात बक्षीस द्यावे किंवा त्यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावेनुसती माहिती देण्यासाठी इतके भारी इनाम देणारे पश्चिम बंगाल हेजगातील एकमेव सरकार असावेमुळात इनामाची ही किंमत माहितीची नाहीतर ती ममता बॅनर्जींच्या भयगंडाची आहेजे ईशान्य भारतात सुरूआहे ते बंगलामध्ये घडण्यास उशीर लागणार नाहीयाची पुरेपुर कल्पना ममतांना आहेमात्रत्यांचा स्वभाव इतका आक्रस्ताळी आहे की जे त्याकरतात शेवटी त्या त्यातच जाऊन फसतात.
 
ममता मूळच्या काँग्रेसच्याकाँग्रेसपासून फारकत घेत त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून काँग्रेसचे जे काही पायाभूतसंघटन होतेते त्यांनी जाताना स्वत:बरोबर नेलेखुनशी आणि थंड डोक्याने हिंसा करणार्‍या डाव्यांशी त्यांनी खुलेपणाने पंगा घेतला आणि पश्चिम बंगालची सत्ता ताब्यात घेतलीममतांच्या या कर्तृत्वाचे सार्‍या देशाने मोठ्या कुतूहलाने स्वागतच केलेमात्रसत्तेत आपले पाय घट्ट रोवण्यासाठीकाँग्रेसचाच जुना डाव खेळायला त्यांनी पुन्हा सुरुवात केली. मुस्लिमांचे लांगूलचालन हा त्यातला प्रमुख भागनव्वदीच्या दशकात काँग्रेस जे दाढ्याकुरवाळण्याचे उद्योग करायचीतेच उद्योग ममता आज पश्चिम बंगालमध्ये करीत आहेतमुस्लिमांची एकगठ्ठा मते स्वत:च्या ताब्यात ठेवलीकीसत्तेची चावी आपल्या हाती राहील असा त्यांचा काँग्रेसी समज आहेया समजाला सध्याच्या भाजपने केव्हाच सुरूंग लावला आहेउत्तर प्रदेशातत्याचा ट्रेलर सार्‍या देशाने पाहिला आहे. 
 
पश्चिम बंगाल विचारांनी ‘डावा’ असला तरी त्याचे जनमानस अत्यंत उत्सवी आहेदुर्गापूजा हा तर बंगाली जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय.मागील वर्षी दुर्गापूजेच्या निमित्ताने कोलकात्यात जे घडलेते बंगाली जनता अद्याप विसरू शकलेली नाहीमुस्लीम धर्मांधांना ममतांनी इतकेगोंजारले आहे कीते कोणत्याही क्षणी हिंसाचाराला तयार होतात. मेल टुडे’ या युकेस्थित माध्यम समूहाने गेल्या वर्षी एक लेख प्रकाशित केलाआहेत्याचे शीर्षकच ‘ममता बॅनर्जींनी लांगूलचालनाच्या माध्यमातून बंगालचे सामाजिक सौहार्द कसे बरबाद केले,’ अशा आशयाचे आहे.मुस्लिमांनी हल्ले केले कीपोलीस गप्प राहातात आणि प्रतिकार करायला लागले कीपोलीस येऊन ताब्यात घ्यायला लागतातअशी बंगालमधीलकाही जिल्ह्यातील स्थिती आहेखुद्द कोलकाता उच्च न्यायालयाने या तुष्टीकरणासाठी ममता बॅनर्जी सरकारची कानउघडणी केली आहे.
 
या सार्‍याचा परिणाम म्हणजे मुक्त माध्यमांवर आजही कुठल्या तरी गावगन्ना मुल्ला मौलवीचे देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देणारे व्हिडिओपाहायला मिळतातअशिक्षित मुसलमानांना तुम्ही कसे असुरक्षित आहातहे चिथावून सांगण्याचा खेळ पश्चिम बंगालच्या मुस्लीमबहुलतालुक्यांमध्ये राजरोसपणे सुरू आहेया सार्‍याच्या विरोधात बंगालमध्ये असंतोष खदखदतच आहेईशान्येकडच्या राज्यांवर बंगालचा प्रभावनाकारता येत नाहीमात्रतिथे राजकीयदृष्ट्या जे घडते आहेत्याचा परिणाम बंगालवरही पडू शकतोबंगालसह ईशान्येकडच्या राज्यांना भाजपउत्तरेकडचा पक्ष वाटायचाईशान्य भारतात जे काही घडत आहे त्याचा परिणाम इथल्या राजकारणावर होणारही काळ्या दगडावरची रेघ आहे.पुढील काही काळात ममतांचा थयथयाट वाढतच जाईलघोडामैदान दूर नाहीबंगालच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी आपल्याआक्रस्ताळी स्वभावाने ममताच या राजकारणात रंग भरतील

No comments:

Post a Comment