सोमवारचा दिवस उजाडला तोच मुळात भोपाळच्या तुरुंगातून सिमीचे जिहादी पळाल्याची बातमी घेऊन. मग तमाम वाहिन्यांवर मध्य प्रदेश सरकार, पोलिस आणि तिथल्या तुरुंग प्रशासनाला नालायक ठरवण्याची स्पर्धा चालू झाली. हल्ली सामान्य प्रेक्षक वा जनता अशा बातम्या फारशा मनावर घेत नाहीत. कारण सरळ आहे. वाहिन्यांवर फार उथळ चर्चा चालतात आणि बातमीदारीही निव्वळ सनसनाटी माजवण्यासाठीच चालते. साहजिकच भोपाळची बातमीही थोड्याच वेळात फुगा फुटणारी ठरेल असेच लोकांना वाटल्यास नवल नव्हते आणि झालेही तसेच. काही तासातच तुरुंगातून फरारी झालेल्या त्या आठ सिमी अतिरेक्यांचा खात्मा चकमकीत झाल्याची बातमी आली. मग काय, थोड्या वेळापूर्वी जे पोलिस गाफील, नालायक व नाकर्ते होते, त्यांच्यावरच आता खोट्या चकमकीचा आरोप सुरू झाला. त्यासाठी सरकार व मंत्र्यांना जाब विचारण्याची स्पर्धा सुरू झाली. बातमी किंवा घटना यातले गांभीर्य कुठल्या कुठे अस्तंगत होते, याचेही भान सुटत चालल्याची ही लक्षणे आहेत. आधी हे आठ सिमी जिहादी चकमकीत मारले गेल्याची बातमी आली आणि अल्पावधीतच त्याच घटनेचे अन्य कोणी मोबाईल कॅमेर्याीने केलेले चित्रण समोर आले. एक नव्हेतर तीन वेगवेगळी चित्रणे समोर आली. त्यातून चकमक खोटी ठरवण्यासाठी युुक्तिवाद सुरू झाले. आठ खतरनाक आरोपी पोलिस गोळीबारात मारले गेले, त्याची चिंता व्यक्त करणार्याक कुणालाही तुरुंगात गळा चिरून बळी घेतला गेलेल्या रखवालदाराच्या मरणाची फिकीर नव्हती. जणू पोलिस वा सैन्यात भरती झालेला माणूस हा अतिरेकी, खुनी वा जिहादी यांच्याकडून हकनाक मारला जाण्यासाठीच जन्माला आलेला असतो, असा काही समज आहे काय? आठ तास हे नाट्य रंगले होते, त्या काळात कोणी त्या मारल्या गेलेल्या तुरुंग रक्षकाच्या हत्येविषयी एक खेदाचा दु:खाचा शब्द उच्चारला नाही. तो बिचारा नि:शस्त्र मारला गेल्याची कुठली वेदना बातमीत वा चर्चेत दिसली नाही; पण आठ अतिरेकी मारले गेल्यावर चिकित्सा सुरू झाली. जणू गुन्हेगार वा घातपाती असणे म्हणजेच निरपराध असणे आणि म्हणून चकमकीत तशा कुणाचा मृत्यू म्हणजे भयंकर पाप असल्याची चर्चा होते. ही खरी समस्या आहे. चकमक झाली तर त्यात पोलिस कसा मारला गेला नाही? कोणी पोलिस जखमी कसा झाला नाही? मारले गेले त्यांना शरण येण्याची संधी दिली होती काय? त्यांना जिवंत पकडणे शक्य असतानाही मारले काय? किती प्रश्नह विचारले जातात; पण अशा हत्यारबंद वा खतरनाक गुन्हेगारांना पकडणे म्हणजे कसा जीवावरचा खेळ असतो, याचे तरी भान प्रश्न विचारणार्यांळना उरलेले आहे काय? पोलिसांनी जीवावर उदार होऊन गुन्हेगारांना सुखरूप पकडले पाहिजे, ही कुठली अमानुष अपेक्षा आहे?
मानवतेचा इतकाच पुळका ज्यांना आलेला असतो, त्यांनी आपली खास पथके बनवावीत आणि असे प्रसंग येतील, तेव्हा पुढाकार घेऊन कोंडीत सापडलेल्या दहशतवादी वा गुन्हेगारांना सुखरूप पकडण्यासाठी सज्ज रहावे. म्हणजे मग ‘रक्ताला चटावलेल्या’ पोलिसांना खोट्या चकमकी करण्याची गरज भासणार नाही, की संधीही मिळणार नाही. किती मानवतावादी त्यासाठी आपला जीव धोक्यात घालायला तयार होतील? ज्यांचा मानवतावाद गुन्हेगारांच्या सुरक्षेसाठीच राखीव आहे आणि पोलिसांचा बळी जाण्याच्या बळावर उभा आहे, त्यांच्या कुठल्याही शब्दावर विश्वायस ठेवण्याची गरज नाही. इतकाच भोपाळच्या घटनेने दिलेला धडा आहे. कुठूनही सरकारी यंत्रणेला किंवा पोलिस सेनादलाला नामोहरम करण्यापलीकडे अशा लोकांचा कुठला अन्य हेतू नसतो. या आठपैकी तीनचारजण यापूर्वी खांडवा येथील तुरुंगातून फरारी झालेले होते. म्हणून त्यांना भोपाळच्या अत्यंत सुरक्षित तुरुंगात डांबलेले होते. दिवाळीला अनेक कर्मचारी सुट्टीवर जातात, त्याचा फायदा घेऊन त्यांनी हा खेळ केला. मग कैदी पळाले म्हणून सरकारची निंदा करायची. तेव्हा सरकार नालायक म्हणायचे. मात्र अल्पावधीत कैदी सापडले आणि चकमकीत मारले गेल्यास सरकार पोलिसांवर हत्याकांडाचा आरोप करायचा. ही आता फॅशन झाली आहे. असे बोलणारे, प्रश्नल विचारणारे किंवा शंका निर्माण करणारे ठराविक लोक; आपल्या ओळखीचे झाले आहेत. सीमेवर किंवा अन्य कुठल्या चकमकीत नागरिक वा पोलिस मारले जातात, तेव्हा यापैकी कोणी एकही अश्रू ढाळायला पुढे आलेला दिसणार नाही. विविध बॉम्बस्फोट व मुंबईतला कसाब टोळीचा हल्ला, यात शेकड्यांनी माणसे किडामुंगीसारखी मारली गेली. तेव्हा यापैकी एकही मानवतावादी उर बडवायला पुढे आला नाही; पण त्यापैकी कसाब वा याकुब मेमन, अफजल गुरू यांना फाशी देण्याच्या वेळी आकांत करायला हीच मंडळी पुढे होती. हे आता नेहमीचे नाटक झाले आहे आणि लोकांना आता त्याकडे ढुंकून बघण्याची इच्छा उरलेली नाही. जिहादी, नक्षलवादी वा दहशतवादी यांची पाठराखण करणार्यां चे चेहरे आता लोकांना पाठ झाले आहेत. प्रामुख्याने पाक संसदेच्या एका सभागृहाने मध्यंतरी भारतातल्या ज्या गटांना हाताशी धरण्याचा प्रस्ताव संमत केला. त्याच्याशी साम्य सांगणारी मंडळी अशा नाटकातून आता उघडी पडू लागली आहेत. जनमानसात त्यांची उरलीसुरली विश्वा सार्हताही आता लयाला गेलेली आहे. कारण इशरत वा तत्सम अन्य चकमकीचे धागेदोरे अलीकडेच उघड झाले आणि त्यातून अशा मानवतावाद्यांचे मुखवटेही फाटले आहेत. त्यांनी हे नाटक वेळीच थांबवले नाही तर पोलिस बाजूला राहतील आणि सामान्य जनताच अशा मानवतेचा बंदोबस्त करायला कायदा हाती घेण्याची शक्यता आहे..
No comments:
Post a Comment