Total Pageviews

Monday, 2 December 2024

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था ! PART 1

 

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

सध्या बांगलादेशामध्ये सत्ता पालटामुळे तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक केली जाणे या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथे असलेल्या हिंदूंचे रक्षण करणे, हे भारताचे नैतिक दायित्व आहे. या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. ‘बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती’ या लेखमालिकेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

भाग १.

वर्ष १९७१ मध्ये स्थलांतरित झालेले बांगलादेशातील हिंदु

१. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांची स्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न

बांगलादेशातील हिंदु समुदायांविरुद्ध झालेल्या नरसंहाराप्रकरणी त्वरित कारवाई करण्याची विनंती ब्रिटनमधील १५३ हिंदु संघटनांनी मिळून केली आहे. याविषयीचे एक पत्र त्यांनी नुकतेच ब्रिटनचे परराष्ट्र सचिव आर्.टी. डेव्हिड लॅमी यांना दिले. बांगलादेशातील राजकीय उलथापालथ आणि तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांची ५ ऑगस्ट या दिवशी हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदूंची घरे, मंदिरे आणि व्यवसाय यांवर पद्धतशीर अन् क्रूर आक्रमणे यांची रूपरेषा या पत्रात देण्यात आली आहे.

याच कालावधीत ‘संयुक्त राष्ट्रां’चे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी ‘बांगलादेशामध्ये संसदीय निवडणुका घेण्याचे, तसेच अंतरिम सरकारला सर्वसमावेशक होण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत महिला आणि अल्पसंख्यांक समुदाय यांचाही समावेश करा’, असे आवाहन केले आहे. अँटोनियो गुटेरेस यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा बांगलादेशातील अस्थिरतेसाठी अमेरिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

२. हिंदूंवर आक्रमणाच्या २०० हून अधिक घटना आणि हिंदूंची घटती संख्या

बांगलादेशात महंमद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले. बैठकीत हिंदूंच्या सुरक्षेविषयी चर्चा केली गेली. ५२ जिल्ह्यात हिंदूंवर झालेल्या आक्रमणांच्या संदर्भात २०० हून अधिक घटना घडल्या. बांगलादेशातील युनूस यांच्या सरकारने हिंदूंवर झालेल्या हिंसेविषयी चिंता व्यक्त केली. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’ ही ढाक्यातील परिस्थिती आणखी बिघडवण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ आणि त्यांची विद्यार्थी संघटना ‘छात्रशिविर’ यांचा वापर करत आहे. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या आक्रमणाविषयी तेथील सरकारने क्षमा मागितली आहे; मात्र भारतातील कट्टरपंथी महंमद जुबैर, राणा अय्युब, आर्.जे. सायमा आणि अरफा खानम शेरवानी यांसारखे लोक बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या आक्रमणाविषयी बोलायला सिद्ध नाहीत. असे असले, तरीही बांगलादेशातील हिंदू स्वतःच्या सुरक्षेविषयी अत्यंत घाबरले आहेत. यासह काहींनी भारतीय सीमेवर पलायन केले आहे. काही कट्टरपंथियांनी हिंदूंच्या क्रूर हत्या केल्या, हिंदू महिलांवर अत्याचार केले. बांगलादेशी हिंदूंनी यासंदर्भात ८ मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये ‘हिंदू अल्पसंख्यांकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नवा कायदा कार्यवाहीत आणावा’, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. ‘बांगलादेशी पीडित हिंदूंना न्याय मिळावा, यासाठी जलदगत न्यायालयाची स्थापना करावी; हिंदु कल्याण संस्थेस पुनर्विकास करून फाऊंडेशन बनवावे. याखेरीज हिंदु, बौद्ध आणि ख्रिस्ती कुटुंबांचे संरक्षण व्हावे’, अशा काही मागण्या करण्यात आल्या आहेत.

आज २ कोटी हिंदू बांगलादेशामध्ये आहेत. आपला उद्देश असावा की, जे हिंदु, बौद्ध अल्पसंख्यांक बांगलादेशामध्ये आहेत, त्यांच्यावर अत्याचार होऊ नये. त्यांच्या भूमी बळकावल्या जाऊ नयेत, ज्यामुळे त्यांना भारतामध्ये येणे भाग पडेल. म्हणून आपण बांगलादेश सरकारच्या साहाय्याने उपाययोजना करू शकतो. पाकिस्तानातील हिंदूंची संख्या वर्ष १९५० मध्ये ८ ते ९ टक्के होती, ती आज ५ लाखांवर, म्हणजे १ टक्क्यांहून न्यून झालेली आहे. पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) फाळणीच्या नंतर, म्हणजे वर्ष १९५० मध्ये २४ ते २५ टक्के हिंदु होते. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार बांगलादेशात आज केवळ ८.६ टक्के हिंदूच शिल्लक उरले आहेत, तर मग १६ टक्के हिंदु गेले कुठे ? ते मारले गेले किंवा त्यांनी धर्मपरिवर्तन केले अथवा काही भारतामध्ये पळून आले.

बिग्रेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

३. बांगलादेशाचा प्रवास वहाबी मूलतत्त्ववादाकडे ?

तत्कालीन शेख हसीना यांच्या सरकारपुढील इस्लामी मूलतत्त्ववादाचे आव्हान अत्यंत बिकट होते. अवघ्या ५ दशकांपूर्वी ‘एक धर्म एक राष्ट्र’, अशा वैचारिक मांडणीस पूर्णपणे नाकारून बंगाली अस्मितेवर आधारलेल्या राष्ट्रवादाचा पुरस्कार केलेल्या बांगलादेशामध्ये इस्लामी मूलतत्त्ववादाच्या प्रभावामुळे ‘आमार शोनार बांगला’ची (आमच्या सोन्यासारख्या बांगलादेशाची) वाटचाल आता वहाबी मूलतत्त्ववादाकडे चालू आहे. हिंदूंसह ख्रिस्ती, बौद्ध यांच्यासारखे अल्पसंख्यांक जीव मुठीत घेऊनच रहात आहेत. त्यांना येथील कडव्या मूलतत्त्ववाद्यांच्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक बांगलादेशींचे भारतात पळून येण्याचे प्रमाण वाढू शकते.

४. वर्ष १९७१ च्या युद्धात ३५ लाखांहून अधिक हिंदूंचा वंशविच्छेद 

वर्ष १९७१ च्या युद्धात झालेला ३५ लाख हिंदूंचा वंशविच्छेद अमेरिकन पत्रकार गॅरी बासला जगासमोर आणावा लागला. अमेरिकन ज्यू आणि मानवतावादी कार्यकर्ता डॉ. रिचर्ड बेन्किन बांगलादेशातील अल्पसंख्यांकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर वैचारिक आणि कायदेशीर मार्गाने लढत आहे. भारतातील तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी (सेक्युलर्स), मानवतावादी, बुद्धीवादी विचारवंत बांगलादेशात होणार्‍या हिंदु-बौद्ध हत्याकांडाविषयी काही अपवाद वगळता गप्प का बसतात ?

५. बांगलादेशातील हिंदूंनी २२ लाख एकर मालमत्ता गमावली !

भारतात स्थलांतरित झालेल्यांची संपत्ती बांगलादेश सरकारने कह्यात घेतली. पाकिस्तानने वर्ष १९६५च्या युद्धाच्या वेळी भारतियांना शत्रू घोषित करून ‘शत्रू संपत्ती निर्बंध १९६५’ लागू करून भारतियांची (मुख्यत्वेकरून हिंदु आणि बौद्ध यांची) पूर्व अन् पश्चिम पाकिस्तानात असलेली संपत्ती कह्यात घेतली होती. बांगलादेशाने स्वातंत्र्यानंतर ‘Vesting of Property and Assets Order 1972’ (शत्रू संपत्ती निर्बंध १९७२) लागू करून यानुसार कुठल्याही निर्बंधाखालील पाकिस्तान सरकारच्या किंवा मंडळाच्या आणि भूतपूर्व पाकिस्तानच्या कह्यातील अन् अधिपत्याखालील सर्व संपत्ती, तसेच मालमत्ता बांगलादेश सरकारकडे हस्तांतरित केली. पश्चिम पाकिस्तानातील लोकांच्या ज्या संपत्ती पूर्व पाकिस्तानात होत्या, त्या या निर्बंधान्वये बांगलादेशाने कह्यात घेतल्याच; पण पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानने ‘शत्रू संपत्ती निर्बंध १९६५’नुसार भारतियांची किंवा भारतात स्थलांतरित झालेल्यांची जी संपत्ती कह्यात घेतली होती, तीसुद्धा बांगलादेश सरकारच्या कह्यात गेली. बांगलादेशाच्या राज्यघटनेप्रमाणे भारत शत्रूराष्ट्र नाही, तरीही भारतियांची किंवा भारतात स्थलांतरित झालेल्यांची संपत्ती बांगलादेश सरकारने कह्यात घेतली.

६. हिंदूंच्या भूमीची सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सामुदायिक चोरी केली !

पाकिस्तान सरकारने कह्यात घेतलेली संपत्ती बांगलादेशाने त्यांच्या मूळ मालकाला परत केली नाहीच, उलट दिवसेंदिवस त्या संपत्तीच्या सूचीमध्ये वाढ करत राहिले, तसेच राज्य अधिग्रहण कार्यालयातील तहसीलदार आणि इतर कर्मचार्‍यांना ‘त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रामध्ये कोणतीही लपवलेली निहित (Vested) संपत्ती शोधून काढली किंवा सादर केली, तर त्यास योग्य ते पारितोषिक दिले जाईल’, असे घोषित करून एक प्रकारे निहित संपत्तीच्या सूचीत नवीन भर घालण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले.

ढाका विद्यापिठाचे प्रा. अबुल बरकत यांनी ‘An Inquiry into Causes and Consequences of Deprivation of Hindu Minorities in Bangladesh through the Vested Property Act’ या पुस्तकातून ‘शत्रू संपत्ती निर्बंध १९७२’द्वारे हिंदूंच्या भूमी चोरीचे आणि अन्यायाचे पुराव्यासह अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या निर्बंधामुळे बांगलादेशातील ४० टक्के हिंदु कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यात जवळपास ७.५ लाख शेतीवंचित कुटुंबे समाविष्ट होती. परिणामी हिंदु कुटुंबांनी गमावलेल्या एकूण भूमींचा अंदाज १६.४ लाख एकर इतका आहे, जी हिंदु समाजाच्या मालकीतील एकूण भूमीच्या ५३ टक्के आहे आणि बांगलादेशाच्या एकूण भूमीच्या ५.३ टक्के आहे.

प्रा. अबुल बरकत यांच्या सर्वेक्षणानुसार हिंदूंच्या भूमीची सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सामूहिक चोरी केली आहे.

बांगलादेशातील हिंदूंनी या निर्बंधान्वये वर्ष २००१ ते २००६ या ६ वर्षांतच अनुमाने २२ लाख एकर स्थावर आणि जंगम मालमत्ता गमावली आहे, जे बांगलादेशच्या (त्या वेळच्या वर्ष २००७च्या) सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (‘जीडीपी’च्या) ५० टक्क्यांहून अधिक आहे.

1 comment:

  1. एका सीतेसाठी मारूतीने लंकादहन केले. रामाने रावणासकट सर्व राक्षसांचा नायनाट लंकेत घुसून केला. रामाचा आदर्श समोर ठेवण्याच्या गोष्टी करणारे हिंदूंचे सरकार आणि भारतीय सैन्य इतके बलाढ्य असतानाही, एके काळी भारतीय उपखंडाचा भाग असणाऱ्या बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्यास कां कचरत आहे ? लाथों का भूत बातों से नहीं मानता ! त्यानुसार सैन्याला सर्वाधिकार देऊन बांगलादेशला कायमचे जमीनदोस्त करावे, असे सर्वच भारतीय नागरिकांचे सध्या मत आहे. मोदी सरकार आल्यापासून मुस्लिम शत्रूंना जबरदस्त धास्ती बसेल असे कोणतेही ठोस उपाय गेल्या दहा वर्षांत केलेले दिसत नाहीत. त्यामुळे बाह्य शत्रू सोडाच पण ह्या हिंदूंच्या देशातच आपण पाकिस्तानात किंवा बांगलादेशात रहात आहोत इतके असुरक्षित वाटू लागले आहे. जगात कोठेही एक ज्यू मारला गेला तर इस्राएल सारखे राष्ट्र जगाची पर्वा न करता त्याच्या शत्रूची राखरांगोळी करून टाकते हे आपण बघत आहोत. यावरून बोध घेऊन भारतसरकारने भारतीय सेना दलास सर्वाधिकार द्यावेत. आणि दहा-दहाहजार पौंडी बाॅंबवर्षाव करून पूर्ण बांगलादेश पॅलेस्टाईन प्रमाणेच नाहिंसा करावा. इस्राएल कमालीचे छोटे राष्ट्र असून चहुबाजूंनी क्रूर मुस्लिम देशांनी घेरलेले आहे. तरीही इराण सारख्या देशाचा अणुप्रकल्प उध्वस्त करण्याची धमकी देण्याइतकी जबरदस्त तयारी ठेवते आणि त्यांचे लष्करी धोरण तात्काळ, शिवाजी महाराजांप्रमाणे अंमलात आणते हे भारतासाठी केव्हाही अनुकरणीयच आहे. बांगलादेशी सरकारला आणि तेथील मुसलमानांना नष्ट करण्याची ही संधी आपण साधली तरच चीनसह भारताच्या सर्व शेजारी देशांना, पंचमस्तंभी कारवाया करणाऱ्या भारतातील विरोधी पक्षांना, लाखो मुल्ला मौलवींना आणि इथे ५० वर्षे ठाण मांडून, भारत हे मुस्लिम राष्ट्र होण्याची वाट पहात बसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना कायमचा वचक बसू शकेल. अन्यथा याहीपेक्षा भयंकर परिस्थितीला तीन चार आघाड्यांवर भारताला कायमचे तोंड देत बसावे लागणार आहे. कोणी मदत तर करणार नाहीच पण अमेरिका, इंग्लंड सारखे तथाकथित लोकशाहीवादी देशही भारताची प्रगती सतत रोखण्याची कटकारस्थाने करून हा देश खिळखिळा करून सोडण्याचे काम चालूच ठेवतील. "मेरे प्यारे एकसोंचालीस भाईबेहनों और देशवासियों" ही मोदीजींनी प्रेमापोटी सतत दिलेली शाब्दिक मात्रा आता ओव्हर डोस होऊन कंटाळा येईपर्यंत कानावर आदळत असते !! पण जालिम उपाय काहीच नसल्याने अद्यापपर्यंत हिंदूंचे देवधर्म, मंदिरे, स्वधर्म रक्षण, राष्ट्ररक्षा, हिंदू धर्म संस्कृती, स्त्रियांची अब्रू अशा सगळ्याच गोष्टींचा संहार वाढत चाललेला दिसतो आहे.

    ReplyDelete