SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Saturday, 5 November 2016
पाकची कोंडी करण्याची गरज-भारताने पाकवर कूटनीतिक दबाव आणला पाहिजे. सगळीकडून पाकची कोंडी कशी करता येईल, याचा विचार केला पाहिजे. दहशतवादाला संरक्षण देणार्याी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाने मोठा आर्थिक दंड करावा यासाठी भारताने दबाव वाढविला पाहिजे. आम्ही केवळ बोलघेवडे नाही, तर ठोस कृतीही करतो असा एक सज्जड संदेशही जागतिक समुदायाला भारताकडून दिला जाणे आवश्यक आहे. असे झाले तरच पाकिस्तान सुधारेल, अन्यथा सीमेपलीकडून त्याच्या कुरापती सुरूच राहतील.गजानन निमदेव
November 2, 2016
0
उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर दिल्याच्या घटनेला महिना उलटून गेला आहे. पण, पाकिस्तानकडून होणार्या कारवाया काही थांबलेल्या नाहीत. काल, मंगळवारी पाकने केलेल्या गोळीबारात काश्मिरातील आठ नागरिक ठार झाले आणि अनेक जखमी झाले. सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकची अब्रू गेली असे बोलले जात असताना पाकमध्ये लष्कर, सरकार आणि अतिरेकी संघटना यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ, पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अतिरेक्यांचा म्होरक्या हाफिझ सईद यांच्यातील मतभेद म्हणजे एक ढोंग असल्याचेही स्पष्ट होत आहे.
भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानात भारतविरोधी द्वेष निर्माण करण्यात तिथला मीडिया, सरकार, लष्कर आणि कट्टरवादी संघटना बर्या पैकी यशस्वी झाल्या. भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड झाला. अमेरिकेने फटकारल्यामुळे पाक आणखी भडकला. अतिरेकी संघटनांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वाअसन देऊनही पाकने कोणतीही कारवाई केली नाही. सर्जिकल स्ट्राईकला महिना उलटला आहे. अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करणे सोडाच, पाकिस्तान सीमेपलीकडून दररोज भारतीय सीमेत गोळीबार करीत आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे अनेक सैनिक ठार झाले असले तरी आमचाही एकेक जवान दररोज शहीद होत आहे. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. भारताने ठोस प्रत्युत्तर दिल्यानंतरही पाकिस्तानचे डोके ठिकाणावर आलेले नाही, ही त्या देशासाठी चिंतेची बाब असली तरी आमच्यासाठी जास्त चिंतेची बाब आहे. सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कारवाया सातत्याने सुरूच आहेत. त्या कारवाया लक्षात घेतल्या तर अतिरेक्यांविरुद्ध पाकिस्तान काही कारवाई करेल याचे कुठलेही संकेत अद्याप तरी मिळाले नाहीत. दहशतवादाच्या मदतीने जम्मू-काश्मिरात अशांतता कायम ठेवण्याचाच पाकचा प्रयत्न दिसतो आहे.
अतिरेक्यांविरुद्ध कारवाई तर दूरची गोष्ट, पाकिस्तानचे गृहमंत्री ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात विविध अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांना भेटले. यावरूनही पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होतो. लष्करप्रमुख राहील शरीफ, पंतप्रधान नवाझ शरीफ आणि हाफिझ सईदसारखे अतिरेक्यांचे म्होरके एकमेकांच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहेत. वास्तविक, उरी येथे केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक समुदायात पाकबद्दल संतापाची भावना निर्माण झाली होती. सर्व स्तरातून पाकचा निषेध करण्यात आला होता. परंतु, तरीसुद्धा पाकिस्तानने आपल्या कृत्याची साधी कबुली दिली नाही. अतिरेकी संघटनांना पाठिंबा दिल्यामुळे एकाकी पडल्यानंतरही पाकिस्तान अतिरेक्यांवर कारवाई करायला तयार नाही, यावरून तिथल्या सरकारची अगतिकताही स्पष्ट दिसते. नवाझ शरीफ यांचे सरकार लष्कर आणि अतिरेक्यांच्या किती दबावात आहे, हेही यावरून दिसते.
अमेरिकेने आणलेल्या दबावालाही पाकिस्तान मानायला तयार नाही. ज्या अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानने आतापर्यंत आपली उपजीविका चालविली, त्याच अमेरिकेकडे डोळे वटारून पाहण्याचे धारिष्ट्य पाककडे कसे आले, हेही सगळ्यांना माहिती आहे. दक्षिण आशियात आपले वर्चस्व स्थापित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारताला शह देण्यासाठी चीन कायम कुरापती करीत असतो. चीनच्या या कारवायांमध्ये आता पाकिस्तानही सामील झाला आहे. चीन स्वार्थी आहे. चीनकडून पाकिस्तानचा वापर करून घेतला जात आहे. ही बाब कदाचित पाकच्या लक्षातही आली असेल. पण, भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तान चीनशी हातमिळवणी करीत आहे. वेळ पडल्यास आपण चीन आणि रशियाच्या तंबूत जाऊन बसू, अशी अघोषित धमकीच पाकने अमेरिकेला दिली आहे. स्वत:चे हित कशात आहे हे कळत असतानाही केवळ भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तान चीनशी जवळीक करीत आहे, हेही आता स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानने अजून चीनचा डाव ओळखलेला नाही. ड्रॅगन कधी विषारी फूत्कार सोडेल अन पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल हे तिथल्या रज्यकर्त्यांना कळणारही नाही. परंतु, पाकिस्तान भारतद्वेषाने एवढा पछाडलेला आहे की, बर्याावाईटातला फरकही त्याला कळेनासा झाला आहे. दहशतवाद ही आता जागतिक समस्या झाली आहे आणि चीनलाही त्याच्या झळा बसणारच आहेत. इस्लामिक दहशतवादाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. असे असतानाही चीन निर्लज्जपणे पाकिस्तानी अतिरेक्यांची बाजू घेत आहे. मसूद अझरवर युनोकडून निर्बंध लादण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यात चीननेच अडथळा आणला. चीनची एकूणच भूमिका संशयास्पद राहिली आहे. तिकडे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करेल याचीही शक्यता आता धूसर झाली आहे.
भारताने सर्जिकल स्ट्राईक केला, गुलाम काश्मिरातील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवून ४० अतिरेक्यांना यमसदनी धाडले, त्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली, जगभरात भारताची वाहवा झाली. हे सगळे जरी खरे असले तरी सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानवर कूटनीतिक दबाव आणण्यात आपण कमी पडलो की काय, असे आताची परिस्थिती लक्षात घेता वाटते आहे. पाकिस्तानचे कितीही सैनिक तुम्ही मारले आणि अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत तरी पाकिस्तान वठणीवर येईल, अशी आशा करणे भाबडेपणाचे ठरेल. पाकच्या आर्थिक नाड्या जोपर्यंत आवळल्या जात नाहीत, तोवर काही उपयोग नाही. पाकिस्तान ही दहशतवादाची जननी आहे असे पंतप्रधान मोदी जागतिक व्यासपीठावरून बोलले होते. पण, त्याचा पाकिस्तानवर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ असा दर्जा आपण दिला आहे. त्यावर फेरविचार केला जाणार होता. पण, त्यावर विचार झाला की नाही, जनतेला अद्याप कळलेले नाही. सिंधू नदीच्या पाण्याबाबतचा जो करार पाकिस्तानशी आपण केला आहे, त्यावरही फेरविचार केला जाणार होता. पण, त्याचे काय झाले, हेही समोर आलेले नाही.
केंद्र सरकारने पाकिस्तानी कलाकारांना आणि अन्य सगळ्यांनाच भारतात येण्यासाठी व्हिसा न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी असलेले सर्व प्रकारचे संबंध भारताने तोडले पाहिजे, अशी भारतीय जनतेची भावना आहे. या भावनेचा आदर करण्यात सरकारला काय अडचणी आहेत, याची माहिती निदान जनतेला करून देण्यात यावी अशी अपेक्षा आहे. पाकिस्तान तिकडून दररोज गोळीबार करीत आहे आणि आपण त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे, हे किती दिवस चालणार? पाकिस्तानला १९७१ च्या युद्धाची आठवण होईल, अशी धडक कारवाई केली जावी, असे जे जनतेला वाटते आहे, ते विद्यमान स्थितीत चूक ठरविता येईल?
सर्जिकल स्ट्राईक करून भारताने जगात स्वत:ची प्रतिष्ठा वाढविली यात शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाचे सगळ्यांनाच अभिनंदन करावे लागले. परंतु, सर्जिकल स्ट्राईकमुळे मिळालेला फायदा वृद्धिंगत करण्यासाठी आता भारताने पाकवर कूटनीतिक दबाव आणला पाहिजे. सगळीकडून पाकची कोंडी कशी करता येईल, याचा विचार केला पाहिजे. दहशतवादाला संरक्षण देणार्याी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाने मोठा आर्थिक दंड करावा यासाठी भारताने दबाव वाढविला पाहिजे. आम्ही केवळ बोलघेवडे नाही, तर ठोस कृतीही करतो असा एक सज्जड संदेशही जागतिक समुदायाला भारताकडून दिला जाणे आवश्यक आहे. असे झाले तरच पाकिस्तान सुधारेल, अन्यथा सीमेपलीकडून त्याच्या कुरापती सुरूच राहतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment