SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Sunday, 16 October 2016
क्राईम ब्रँचचे बँकॉकमध्ये सर्जिकल स्ट्राईक -tarun bharat bgm
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय लष्करासोबतच तपासयंत्रणांनीही सर्जिकल स्ट्राईक मोहीम सुरू केली आहे. एक तर परदेशात बसलेल्या अंडरवर्ल्ड गँगस्टर अथवा दहशतवाद्यांचा खात्मा करणे किंवा त्यांना फरफटत मुंबईत आणणे, असा पवित्रा कधी नव्हे ते भारतीय तपासयंत्रणांनी घेतला आहे.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर जीवघेणा हल्ला करणाऱया मुन्ना झिंगाडाला बँकॉक पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा ताबा मिळविण्यासाठी भारत-पाकिस्तानात गेल्या सोळा वर्षांपासून द्वंद्व सुरू आहे. मुन्ना झिंगाडाला बनावट पासपोर्टप्रकरणी अटक केल्यानंतर त्याच्याकडे मोहम्मद सलीम नावाने पाकिस्तानी पासपोर्ट सापडला होता. यामुळे तो आपलाच नागरिक असल्याची आवई पाकिस्तानने उठविली होती. आपसूकच यामागे दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील आहेत, हे सर्वश्रुत आहे. कारण मुन्ना जर मुंबई क्राईम ब्रँचच्या कचाटय़ात सापडला तर संपूर्ण डी कंपनीची पोल खोल होणार आहे. यामुळे काही करून, त्याच्या ताब्यासाठी पाकिस्तान सरकार आणि पोलिसांना पुढे करीत पडद्याआडून दाऊद आणि शकील सूत्रे हलवित आहेत, तर दुसरीकडे मुंबई क्राईम ब्रँचने संपूर्ण पुरावे बँकॉक सरकारला सादर करीत, मुन्ना झिंगाडा आपलाच नागरिक असल्याचे ठणकावून सांगितले आहे. यामुळे दोन्ही साक्षीपुरावे पाहता, बँकॉक पोलिसांचा कल मुंबई क्राईम ब्रँचच्या बाजूने आहे. तर गेल्या आठवडय़ात बँकॉकमध्ये पुन्हा एकदा मुंबई क्राईम ब्रँच आणि पाकिस्तानी पोलीस आमने सामने येऊन त्यांच्यात मोठी खडाजंगी झाली, मात्र ही लढाई मुंबई क्राईम ब्रँचनेच जिंकून बँकॉकमधील मुन्ना झिंगाडाच्या ताब्यासाठी आखलेले सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन यशस्वी केले.
गँगस्टर मुन्ना झिंगाडाचा अखेर ताबा मुंबई क्राईम ब्रँचलाच मिळणार यामध्ये तीळमात्र शंका उरली नाही. यामुळे येथून पुढे प्रत्या र्पण आणि काही न्यायालयीन प्रक्रिया पुढे करीत मुन्नाच्या ताब्याचा मार्ग सुकर केला जाणार आहे. मुन्नाच्या ताब्यासाठी क्राईम ब्रँच अथवा केंद्र सरकारने एवढे महत्त्व का दिले आहे असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. मात्र मुन्नाचा गुन्हेगारी इतिहास पाहिला तर डी कंपनीत अगदी चपळ आणि पाण्यातील झिंगाडा माशासारखा क्रूर तसेच हिंसक असल्याने, त्याचा एकच दबदबा होता. डी कंपनीची सर्व अंडी-पिले त्याला माहीत आहेत. यामुळे प्रत्येक लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीदरम्यान दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्याच्या वल्गना केल्या जातात. त्या वल्गना मुन्ना ताब्यात आल्यानंतर पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे मुन्नाचा ताबा क्राईम ब्रँच आणि केंद्र सरकारला हवा आहे. डी कंपनीचे वैध आणि अवैध धंदे याची इत्यंभूत माहिती मुन्नाला आहे. या माहितीच्या आधारे डी कंपनी तसेच दाऊदला नामोहरम करता येईल, असा विश्वास क्राईम ब्रँचला आहे. जसे अनेक दहशतवादी कारवायातील अंबू जुंदालच्या अटकेसाठी आणि त्याचा ताबा मिळविण्यासाठी सौदीत भारतीय तपासयंत्रणांनी सर्जिकल स्ट्राईक मोहीम आखून, त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी सरकार, आयएसआय, डेव्हिड हेडली आणि लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनांचा पर्दाफाश केला होता. अगदी त्याप्रकारे दाऊद टोळीच्या पतनासाठी झिंगाडा मासा आवश्यक आहे. बँकॉकमधील क्राईम ब्रँचने सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशनमध्ये अनेक अडचणीवर मात करीत, अखेर यश मिळविले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment