Total Pageviews

Thursday, 27 October 2016

चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले BE INDIAN BUY INDIAN

• First Published :27-October-2016 : 17:19:25 • ऑनलाइन लोकमत चीन, दि. 27- पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांसाठी पाठिंबा देऊन चीन भारतावर वेळोवेळी कुरघोडी करत असल्याचं समोर आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातल्या सोशल मीडियावरून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा जोरदार प्रचार सुरू झाला. अनेक चिनी वस्तूंवर भारतातील व्यापारी वर्ग आणि ग्राहकांनी बहिष्कार घातला. त्यामुळे चीनच्या बाजारावरही त्याचा परिणाम झाला. मात्र आता चीनला जाग आली असून, चीननं भारतानं आमच्या वस्तूंवर सातत्यानं बहिष्कार टाकत राहिल्यास दोन्ही देशांतील संबंध बिघडतील, असा इशारा दिला आहे. "चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घातल्यास भारतात चीन करत असलेल्या गुंतवणुकीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल, यासाठी दोन्ही देशांकडून द्विपक्षीय सहकार्य गरजेचं आहे. मात्र दोन्ही देशांतील लोकांकडून तसा समजुतदारपणा पाहायला मिळत नाही आहे", असे चीनचे भारतातील दूतावास शी लियान म्हणाले आहेत. "दक्षिण आशियात भारत हा चीनचा सर्वात मोठा भागीदार आहे. तसेच जगातील वस्तू निर्यात करणारा सर्वात मोठा नववा देश आहे. भारतातील अनेक व्यापा-यांनी चीनमध्ये बनवलेल्या फटाक्यांसह अनेक वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. चीन-पाकिस्तान यांच्यातील जवळिकीमुळेच भारतात चिनी वस्तूंबाबत नकारात्मक प्रचार होतो आहे. मात्र हा बहिष्काराला कोणताही कायदेशीर आधार नाही. दिवाळी या सणाशी संबंधित वस्तूंवरच हा बहिष्कार मर्यादित नसून त्याचा इतर सणांच्या वस्तूंवरही परिणाम होतो", असं शी लियान यांनी सांगितलं आहे. दरम्यान 2015मध्ये भारत आणि चीन द्विपक्षीय व्यापार 71.6 अब्ज डॉलरच्या घरात होता, मात्र तो आता 50 अब्ज डॉलर इतका खाली आला आहे. चीन फक्त भारतात 2 टक्केच व्यापार निर्यात करत असल्याचंही शी लियान म्हणाले आहेत. दिवाळीत वर्धा बाजारपेठेतून ‘चायना मेड’ हद्दपार दिवाळीत वर्धा बाजारपेठेतून ‘चायना मेड’ हद्दपार वर्धा, दि. 26 - दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणासाठी नागरिक आसुसलेले असतात. घरांची डेंटींग-पेंटींग, सजावट यासाठी वर्षातून एकदा दिवाळीला खरेदी केली जाते. विविध वस्तूंची खरेदी, रोषणाईसाठी दिवे आदी सर्व वस्तूंची खरेदी केली जाते. दरवर्षी बाजारात चिनी वस्तूंवरच अधिक भर दिसतो; पण यंदा देशात घडत असलेल्या घडामोडी आणि शासनाचे आवाहन लक्षात घेत बाजारातून ‘चायना मेड’ हद्दपार झाल्याचेच दिसून येत आहे. दिवाळी सणासाठी सध्या बाजार सजला आहे. विविध आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध करून ग्राहकांची मागणीही वाढत असल्याचे दिसून येत आहे. घरांच्या सुशोभिकरणासाठी झालर, प्लास्टिक व अन्य वस्तंूपासून तयार आकर्षक घंटी, तोरणे बाजारात अवतरली आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांचीही गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळते. दिवाळी सणासाठी पणत्यांनी बाजार सजला आहे. गत काही वर्षांपासून बाजारपेठेतील प्रत्येक वस्तूंमध्ये ‘चायना मेड’चा शिरकाव झाला होता. यावर्षी मात्र देशपातळीवरील घडामोडींमुळे चिनी वस्तूंचा प्रभाव कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. आकाश कंदील, पणत्या, सजावटीच्या वस्तूंमध्ये चिनी शिरकाव होता; पण यंदा नागपूर, मुंबई यासह देशातील अन्य भागात तयार वस्तूंची भरमार असल्याचे दिसून येते. दुकानदारांनीही यंदा शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत चायना मेड वस्तू विकण्यापासून फारकत घेतल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले. यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही ‘चायना मेड’ला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. केवळ मोबाईल सोडले तर अन्य वस्तूंमध्ये ‘मेड इन इंडिया’ला प्राधान्य दिले जात असल्याचेच दिसून येत आहे. घरांच्या सुशोभिकरणासाठी वापरल्या जाणाºया सिरीजमध्येही चायना मेडला हद्दपार करण्यात आले आहे. बहुतांश इलेक्ट्रीशीयन, कारागिर व दुकानदारांनी भारतात तयार झालेल्या सिरीज, विविध प्रकारचे दिवे वापरावर भर दिल्याचे दिसून येत आहे. काही इलेक्ट्रीशियनकडून इमारतींची रोषणाई करण्याचे कंत्राट घेतले जातात. यासाठीही त्यांच्याकडून भारतीय बनावटीच्या सिरीज, दिव्यांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment