Total Pageviews

Saturday, 15 October 2016

ऐन दिवाळीत चिनी वस्तूंवर संक्रांत- चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे शस्त्र भारतीय नागरिकांकडून ठिकठिकाणी उपसले जात आहे- भारतीय जनतेचा बहिष्कार हा चीनसाठी चांगला संदेश ठरू शकतो..


. उरी हल्ल्यानंतर चीनने पाकची बाजू घेतल्याबद्दल चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे देशभरात आवाहन करण्यात देत आहे. काही नेत्यांनी तर फक्त भारतीय बनावटीच्याच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. याचा परिणाम हळूहळू दिसू लागला असून ऐन दिवाळीत चिनी वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जुन्या दिल्लीतील व्यापारी या अभियानामागील भावनांशी सहमत आहेत. पण यामुळे आमचे प्रचंड नुकसान होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. हजारो व्यापारी आणि दुकानदारांनी गेल्या चार महिन्यांपूर्वीच लाखो रुपयांचा चिनी बनावटीचा माल मागवला आहे. चिनी वस्तूंवर आमचे लाखो रुपये गुंतले आहेत. याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेतेमंडळींनी आमचाही विचार करायला हवा. चिनी वस्तूंसारख्या वस्तू भारतात बनवण्यासाठी पायाभूत सुविधा नाहीत. यामुळे भारतात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची योजना योग्य वाटत नाही, असे दिल्लीतील लजपत रॉय मार्केटमधील दुकानदार नितिन मलहोत्रा यांनी सांगितले. या अभियानाला साथ देणारेही काही व्यापारी आहेत. आमच्या दुकानात भारतीय बनावटीचीच सर्व उत्पादने आहेत. या उत्पादनांमुळे केवळ स्थानिकांनाच रोजगार मिळतो, असे दिल्लीतील भागीरथ पॅलेस मार्केटमधील मेक इन इंडिया या नावाने दुकान चालवणारे रविकुमार यांनी सांगितले. बहिष्कार आणि व्यवहार्यता- प्रा. शुभांगी कुलकर्णी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे शस्त्र भारतीय नागरिकांकडून ठिकठिकाणी उपसले जात आहे. दिवाळी तोंडावर असताना व्यापार्यांूची गोदामे चिनी वस्तूंनी भरून गेली आहेत. अशा स्थितीत बहिष्कार टाकल्यास भारतीय व्यापार्यां चेच नुकसान होणार आहे. तथापि, दीर्घकालीन विचार करता, भारतीय जनतेचा बहिष्कार हा चीनसाठी चांगला संदेश ठरू शकतो... भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेली लष्करी कारवाई, सिंधू नदीच्या पाणीवाटप कराराचा पुनर्विचार करण्याची केलेली घोषणा, या घडामोडींच्या पार्श्वरभूमीवर चीन भारताविरुद्ध कठोर निर्णय घेईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांचे पाणी अडविण्यासारख्या निर्णयाचा समावेश आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, असे वातावरण देशभरात निर्माण होत आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी किमान पाकिस्तानशी संबंधित विषयांत चीनने कधी सोडलेली नाही. पाकिस्तानात चीनला मोठी बाजारपेठ उपलब्ध असून, कोणत्याही परिस्थितीत ती गमावण्यास चीन तयार नसतो. पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या रूपाने चीनला सागरी व्यापारासाठी खुले प्रवेशद्वार मिळाले आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला खूश करण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे विश्लेकषकांचे मत आहे. परंतु, पाकिस्तानचा बचाव करण्याचा प्रयत्न नेहमी करणार्याव चीनने हेही लक्षात घेतले पाहिजे की, भारताशीही त्यांचे व्यापारी आणि अन्य संबंध आहेत. चिनी वस्तूंचा व्यापार भारतात सध्या सर्वाधिक चालतो. त्यामुळे भारताविरुद्ध उचललेले कोणतेही पाऊल चीनला व्यापारीदृष्ट्या महागात पडू शकते. तीच प्रक्रिया आता सुरू होताना दिसत आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडसारख्या राज्यांत आणि मथुरेसारख्या काही मोठ्या शहरांत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाला आहे. भारतात व्यापार करणार्याह कंपन्या दोन प्रकारच्या आहेत. काही कंपन्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या वस्तू भारतीय व्यापार्यांकमार्फत बाजारात पोहोचवून ग्राहकांना खूश ठेवतात. मात्र, काही कंपन्या निकृष्ट दर्जाची उत्पादने पुरवून भारतीय व्यापारी, कंपन्या आणि ग्राहकांची फसवणूक करतात. चीनवर भारत कोणत्याही परिस्थितीत विश्वापस ठेवू शकत नाही. परंतु, जागतिक बाजारातील बदलती परिस्थिती विचारात घेता, दोन्ही देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होतो. राजनैतिक स्तरावर सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरीकडे, वैश्वि क पातळीवर भारताचे स्थान मजबूत होणे चीनला खुपत राहते. त्यामुळे चीन प्रत्येक स्तरावर भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कधी भारताच्या हद्दीत चिनी फौजा घुसखोरी करतात, तर कधी चिनी हॅकर्स भारतातील महत्त्वाच्या संस्थांच्या वेबसाईट हॅक करून मानसिकदृष्ट्या अशांत करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, या सार्यायच्या पलीकडे, आर्थिक स्तरावर भारताला पोखरण्याचे चीनचे सुरू असलेले प्रयत्न अधिक गंभीर आहेत. स्वस्त चिनी वस्तू भारतात आल्या, तेव्हा त्या प्रचंड प्रमाणात विकल्या गेल्या. चीनमधून भारतात सर्वप्रकारच्या उपयुक्त वस्तू येतात. एवढेच नव्हे, तर देवाच्या मूर्तीही चीनमधून येऊ लागल्या असून, रंगपंचमीला वापरण्याच्या पिचकार्यानही चिनी बनावटीच्या असतात. चीनने भारतात सुरुवातीला पाठविलेल्या वस्तू इतक्या निकृष्ट दर्जाच्या होत्या की, भारतीय ग्राहकांचा या वस्तूंवरील विश्वा्स उडाला. परंतु, आता गुणवत्तेतही अव्वल असणार्याा वस्तू चीनमधून भारतात येत आहेत. या वस्तूही तुलनेने स्वस्त असल्यामुळे गुणवत्तेच्या निकषावर उडालेला ग्राहकांचा विश्वाभस आता चिनी वस्तूंवर पुन्हा बसू लागला आहे. ब्रँडेड कंपन्यांचा टॅबलेट भारतात 20 ते 40 हजार रुपयांत मिळतो. मात्र, हुबेहुब तसाच टॅबलेट चिनी कंपनीचा घेतल्यास दोन-चार हजारांत उपलब्ध होतो. ज्यांना ब्रँडेड टॅबलेट परवडत नाही, ते चिनी टॅबलेट घेण्यात समाधान मानतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंव्यतिरिक्त खेळणी, फर्निचर आदी वस्तूही चीनमधून भारतात येऊ लागल्या आहेत. भारतातील सत्ताधार्यांरनीही आजवर लेचेपेचे धोरण स्वीकारले आणि चिनी वस्तूंवर बंदी आणणे त्यांना शक्य झाले नाही. परिणामी, चिनी वस्तूंची भारतातील विक्री वाढतच गेली. या व्यापाराचा थेट परिणाम भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांवर पडला. गेल्या वर्षभरात 86 भारतीय कंपन्यांची चिनी कंपन्यांनी फसवणूक केली आहे. फसवणूक झालेले सर्व भारतीय छोटे आणि मध्यम स्तरावरील व्यावसायिक होते. भारतीय कंपन्यांनी कोणत्याही चिनी कंपनीशी करार करताना कंपनीची सखोल माहिती घ्यावी, असे आवाहन भारतीय दूतावासाला करणे भाग पडले. फसवणुकीत सामील असणार्यात चिनी कंपन्या मुख्यत्वे रासायनिक उद्योग, पोलाद उद्योग, सौरऊर्जेची उपकरणे, ऑटोमोबाईल, कला आणि हस्तकला, हार्डवेअर आणि जैविक तंत्रज्ञान क्षेत्रातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतात चीनचा व्यापार दरवर्षी 40 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 2 लाख 22 हजार कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. चालू आर्थिक वर्षात चिनी कंपन्यांची भारतातील उलाढाल 44 अब्ज डॉलरच्या घरात जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या सगळ्या पार्श्वतभूमीवर आता चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची आवाहने सुरू झाली आहेत. उरीमध्ये भारतीय लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर कठोर धोरण स्वीकारून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई केली. त्यानंतर चीनने जी भूमिका स्वीकारली, ती पाहून भारतीय नागरिकांमध्ये क्रोध उत्पन्न झाला आहे. या क्रोधाचा परिणाम म्हणून चिनी व्यापार अडचणीत येऊ शकतो. अर्थात, या भावनिक आवाहनांची दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी. सध्या दिवाळी जवळ आली आहे. अनेक भारतीय व्यापार्यांानी चिनी वस्तू खरेदी करून ठेवल्या आहेत. त्यामुळे बहिष्काराचा खरा प्रभाव भारतीय व्यापार्यांखवरच पडण्याची शक्यता आहे. काही व्यापार्यां नी तर चिनी वस्तूंना असलेली प्रचंड मागणी विचारात घेऊन सहा-सात महिने पुरेल एवढा माल गोदामांमधून भरून ठेवला आहे. अशा व्यापार्यां वर बहिष्काराचा विपरीत परिणाम होऊ शकतो. चीनचा माल भारतात येण्याचा दुसरा महत्त्वाचा रस्ता म्हणजे तस्करी. आजमितीस 60 ते 70 टक्के चिनी वस्तू तस्करीच्या माध्यमातून, प्रामुख्याने नेपाळमार्गे भारतात येतात. अशा परिस्थितीत बहिष्काराचे शस्त्र उपसण्याच्या आवाहनांनी बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे, चीनने वेगळीच युक्ती लढविली असल्याचे पाहायला मिळते. ‘मेड इन चायना’ असा शिक्का पाहून वस्तू नाकारण्यात येत असल्यामुळे आता ‘मेड इन पीआरसी’ (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) असा शिक्का मारण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, चीनने भारताला कमजोर समजण्याचे दुःसाहस आता करता कामा नये. दहशतवाद्यांचे नंदनवन मानल्या गेलेल्या पाकिस्तानची वकिली करणे चीनला महागात पडू शकते. अमेरिकेचा तुल्यबळ मानला जात असला, तरी चीन अद्याप आर्थिक महासत्ता बनलेला नाही. मुख्य म्हणजे, भारताकडे डोळे वटारून पाहावे, इतकी मोठी आर्थिक शक्ती अद्याप चीनमध्ये आलेली नाही. चीन आर्थिक शक्ती म्हणून विकसित होत आहे, त्याला भारताची प्रचंड बाजारपेठ हे एक प्रमुख कारण आहे, हे चीनने विसरता कामा नये. भारतातील व्यापाराचे दरवाजे बंद झाल्यास चीनमधील नागरिकांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, हे चीनने ध्यानात घेतले पाहिजे. खुद्द चीनमध्ये तुलनेने महाग विकल्या जाणार्याण वस्तू भारतात इतक्या स्वस्त कशा मिळतात, असा प्रश्नण येथील नागरिकांना पडतो. परंतु, राज्यकर्त्यांना पडत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. चिनी बनावटीच्या अनेक वस्तू दर्जाहीन तर आहेतच. शिवाय, चिनी सरकार तेथील उत्पादकांना विविध प्रकारची अनुदाने देत असल्यामुळे त्या आणखी स्वस्त होतात. दिवाळीच्या रोषणाईत चिनी बनावटीच्या लाखो दिव्यांच्या माळा देशभरात दिसतात. चिनी फटाके गावागावांत फोडले जातात. घड्याळे, कॅलक्युलेटर, वॉकमन, सीडी प्लेअर, ट्रान्झिस्टर, फोन, इमर्जन्सी लाईट, स्टेरिओ, बॅटरी सेल, खेळणी, सायकली, कुलपे, छत्र्या, स्टेशनरी, फुगे, टायर, रसायने एवढेच नव्हे, तर खाद्यतेलेही चिनी बनावटीची भारतात मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. दिवाळीत साठ फटाक्यांचे चिनी पॅकेट अवघ्या चाळीस रुपयांत विकले जाते. घातक धाग्यांनी बनलेले चिनी कपडे शे-सव्वाशे रुपयांत मिळतात. पंधरा रुपयांत घड्याळ मिळते. पंचवीस रुपयांत कॅलक्युलेटर मिळतो. यासाठी वापरण्यात येणारी सामग्री किती निकृष्ट दर्जाची असेल आणि प्लास्टिक किती विषारी असेल, याचा विचार आपण आधी केला पाहिजे. घातक प्लास्टिक इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतात पाठविण्यामागेही षड्यंत्र असू शकते. अशा वातावरणात देशी उद्योगांची भरभराट कशी होईल, यावर भारतीय राज्यकर्ते आणि नागरिकांनी डोळसपणे विचार करायला हवा. परस्पर सहकार्याने उद्योग उभारणी, सहकार तत्त्वावर उत्पादन, यावर भर दिला पाहिजे. दुर्दैवाने सहकारासारखा हुकमी एक्का आपल्याकडे नेते मंडळींनी स्वहितासाठी वापरला. परंतु, यापुढे तसे करून चालणार नाही. जागतिक स्पर्धेत उतरायचे आणि टिकायचे असेल, निकृष्ट चिनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठ ओसंडून वाहताना पाहणे डोळ्यांत खुपत असेल, तर सर्वात आधी आपल्याला याच उपाययोजना कराव्या लागतील. चीनने भारताची ताकद आणि त्याची व्यापारी गरज ओळखून भारतावर डोळे वटारण्याचे दुःसाहस करू नये, एवढा संदेश तूर्त या जनजागृतीमार्फत दिला गेला आहे.

No comments:

Post a Comment