Total Pageviews

Friday, 28 October 2016

सीमारेषेवर 2 जवान शहीद, महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण-29-October-2016


श्रीनगर, दि. 29 - पाकिस्तानने अजूनही आपल्या कुरापती सुरु ठेवल्या असून सीमारेषेवरील भागांमध्ये गोळीबार करत आहे. कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये गस्त घालणा-या लष्करी तुकडीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. शीख रेजिमेंट्सचे मनदीप सिंह आणि नितीन सुभाष अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. शहीद जवान नितीन सुभाष महाराष्ट्राचे सुपूत्र असून सांगलीचे रहिवासी आहेत. एकीकडे देश दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे सीमारेषेवरील जवान मात्र शत्रूशी जीवाची बाजी देऊन लढत आहेत. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तब्बल 53 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरमधील कठुआ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून तोफमारा करत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केली. बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सीमारेषेवरील तणाव लक्षात घेता सीआरपीएफने काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली असून चेक पॉईंट्सही वाढवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही बॉर्डरवरील जवानांबरोबर साजरी करत आहेत. यावेळी ते उत्तराखंडमध्ये भारत-चीन बॉर्डर परिसरात इलाके माना पोस्टवर तैनात असलेल्या आईटीबीपीच्या जवानांबरोबर असतील. शनिवार मोदी चमोली डिस्ट्रिक्टला पोहोचतील. आधी बद्रिनाथ मंदिरात दर्शन घेतील. यावेळी नॅशनल सेक्युरिटी अॅडव्हायजर अजित डोभालही त्यांच्याबरोबर असतील. दरम्यान, मोदींच्या #Sandesh2Soldiers कॅम्पेनद्वारे आतापर्यंत जवानाना 10 लाखांपेक्षा जास्त शुभेच्छा संदेश पाठवण्यात आले आहेत. सलग तिसरी दिवाळी जवानांबरोबर - केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 29 तारखेला सकाळी एअरफोर्सच्या खास विमानाने मोदी गौचरला पोहोचतील. - बद्रीनाथच्या दर्शनानंतर मोदी आयटीबीपीच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी करतील. चहा-नाश्ताही येथेच घेतील. - उत्तराखंडमध्ये चीनला लागून असलेल्या सीमेवर माना हे अखेरचे गाव आहे. - पंतप्रधान बनल्यानंतर मोदी सलग तिसऱ्यांदा जवानांबरोबर दिवाळी साजरी करत आहेत. - गेल्यावर्षी मोदी अमृतसरच्या खासामध्ये डोगराई वॉर मेमोरियलच्या दौऱ्यावर गेले होते तर 2014 मध्ये त्यांनी सियाचीनमधील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. जवानांना शुभेच्छा पाठवण्याचे अपील - मोदींनी गेल्या सोमवारी लोकांना विनंती केली होती की, त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छांचे संदेश पाठवावे. - महोबामध्ये एका रॅलीत मोदी म्हणाले होते, दिवाळीला जवानांना संदेश पाठवून त्यांचे मनोधैर्य वाढवावे. काय आहे #Sandesh2Soldiers कॅम्पेन? - मोदींनी 23 ऑक्टूबरपासून सीमेवर तैनात असलेल्या जवानांना संदेश पाठवण्याची सुरुवात केली आहे. - #Sandesh2Soldiers हॅशटॅगसह गेल्या रविवारी मोदींनी ट्विटरवर मॅसेज पोस्ट केला होता. - या कॅम्पेनमध्ये MyGov.in, ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचाही समावेश करण्यात आला आहे. लष्कराबद्दल देशवासीयाच्या भावना या माध्यमातून सर्वांना समजतील. - आतापर्यंत अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांनी संदेश पाठवले आहेत. - अक्षय कुमार, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, आनंद महिंद्रा असा सेलिब्रिटींसह 10 लाखांहून अधिक लोकांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. चीन-पाकबरोबरच्या नात्यात तणाव - 28 सप्टेंबरला PoK मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत-पाक बॉर्डरवर तणाव वाढला आहे. - दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. पाक रेंजर्स सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेत. - चीनबरोबरही सीमेवर भारताचे संबंध फारसे चांगले नाहीत. चीनी जवानांच्या घुसखोरीचेही वृत्त अनेकदा समोर येत असते. - एनएसजी, मसूद अझहरच्या मुद्द्यावर चीनने भारताचा विरोध केला आङे. दिवाळीची चिनी वस्तूंवर बंदी घालण्याबाबतही चीनने भारताला इशारा दिला आहे. जम्मू/नवी दिल्ली - पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी एलओसीवर हल्ला चढवला. मच्छिल सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकित आर्मीचे दोन जवान शहीद झाले. यापैकी एक जवान महाराष्ट्राचे असल्याची माहिती समोर येत असून, त्यांचे नाव नितीन सुभाष असल्याची माहिती समोर आलेली आहे. नितीन सुभाष हे सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. आणखी एक जवानही शहीद झाल्याचे वृत्त आहे. मात्र दहशतवाद्यांनी पळून जाण्यापूर्वी या शहीद जवानाच्या पार्थिवाची विटंबना केली. जवानाचे शीरही कापले. पाक आर्मीकडून दहशतवाद्यांना कव्हर फायरिंग दिले जात होते. लष्कराने जवानाचे शीर कापल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. पण विटंबनेचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे. एक दहशतवादीही चकमकीत मारला गेला. पंतप्रधान गृहमंत्र्यांना दिली माहिती.. - रात्री साडेअकरा वाजता डीजीएमओने पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर आणि एनएसएला या घटनेची माहिती दिली. पाकचे उच्चायुक्त बासित यांना शनिवारी बोलावण्यात आले आहे. - सर्जिकल स्ट्राइकनंतर बरोबर महिनाभराने पाकने हा हल्ला केला आहे. या महिन्यात 4 जवान शहीद झाले आहेत. - दरम्यान शुक्रवारी पाकिस्तानकडून कठुआ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. बीएसएफकडूनही प्रत्युत्तरात किरकोळ गोळीबार करण्यात आला. - डिफेन्स एक्सपर्ट पीके सहगल म्हणाले, पाकने कारगिल युद्धावेळी जे केले होते, तेच आताही करत आहे. दुर्दैवाने तेव्हा आपल्याला हा मुद्दा यूएनमध्ये उचलता आला नव्हता. मात्र आता भारताने हा मुद्दा यूएनमध्ये उचलायला हवा. सीमेवरील गावे रिकामी केली - पाकिस्तानकडून एलओसी आणि इंटरनॅशनल बॉर्डरवर शुक्रवारी दिवसभर फायरिंग सुरू होती. चौक्यांबरोबर सीमेवरील गावांनाही लक्ष्य करण्यात आले. - बॉर्डरवर 30 आणि एलओसीवर 10 हून अधिक चौक्यांवर फायरिंग करण्यात आली. यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. - आर्मीच्या 21 पंजाब रेजिमेंटचे मेजर अजित सिंह आणि बीएसएफ जवान बी व्यंकटेशसह 10 जण जखमी झाले आहेत. सीमेवरील बहुतांश गावे रिकामी करण्यात आली आहे. - पंजाबमधील सीमेवरील गावे धलोतर, पलाह, ढींडा, कोटली येथेही पाकने फायरिंग केले. - लष्करा पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. हल्ल्यामागचे कारण काय..? - पाक आर्मीचे कमांडो एलओसीवर कुंपनापर्यंत पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. - 29 नोव्हेंबरला निवृत्त होण्यापूर्वी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना काहीतरी मोठी कारवाई करायची आहे. - पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकचा बदला घ्यायचा आहे. दिवाळीच्या काळात पाकने नेहमीच असे प्रकार केले आहेत

No comments:

Post a Comment