चिनी वस्तूंविरुद्ध विहिंपने ठोकले षड्डू
October 21, 201608
Share on Facebook Tweet on Twitter
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
वृत्तसंस्था
कोलकाता, २१ ऑक्टोबर
पाकिस्तानच्या भारतविरोधी दहशतवादी कारवायांना चीनकडून सातत्याने पाठबळ मिळत असल्याने आगामी दिवाळीच्या काळात चिनी वस्तूंच्या वापराविरोधात विश्व हिंदू परिषदेने व्यापक मोहीम उघडली आहे.
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेसाठी विहिंपकडून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍप यासारख्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. याशिवाय, जनसंवादाच्या माध्यमातूनही लोकांना जागरूक करण्यात येत आहे. ‘राष्ट्र प्रथम – पाकच्या दहशतवादाचे समर्थन करणार्या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला’ असा संदेश यातून देण्यात येत आहे.
पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे आणि चीन या देशाची सातत्याने पाठराखण करीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक साधारण सभेत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या ठरावावर संपूर्ण जगाचे एकमत झाले असताना चीनने मात्र नकाराधिकार वापरून त्याचा बचाव केला होता. त्यामुळे आगामी दिवाळीत चीनी वस्तू जेव्हा भारतीय बाजारपेठांमध्ये दाखल होतील, तेव्हा त्यावर सर्व भारतीयांनी बहिष्कार घालावा, असे आवाहन विहिंपतर्फे केले जात आहे. चिनी वस्तू निकृष्ट दर्जाच्या असून, भारतविरोधी कटाचा एक भाग आहे. चीनचे दुटप्पी धोरण उधळून लावण्यासाठी आता नागरिकांनीच समोर यायला हवे, असे विहिंपचे प्रदेशाध्यक्ष सचिंद्रनाथ सिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
बंगालमधील विहिंप सदस्यांसोबतच बंजरंग दल, धर्म जागरण मंच, दुर्गा वाहिनी आणि गो सेवा दल यासारख्या संघटनाही चीनविरोधी मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. भारतीय वस्तूंच्या खरेदीवरच आपण भर दिला, तर उत्पादन वाढून आपल्या युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळेल आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणखी बळकट होण्यात होईल, यासाठी आम्ही जगजागृती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
विक्रीत ४० टक्के घसरण
जयपूर: चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, यासाठी सातत्याने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचा प्रभाव आता दिसू लागला आहे. राजस्थानच्या जयपूर शहरात चिनी वस्तूंच्या विक्रीत ४० टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे.
सध्या दिवाळीनिमित्त जयपुरातील सर्वच बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. आतापर्यंत चिनी वस्तूंच्या खरेदीकडे कल ठेवणारे लोक आता भारतीय वस्तूंची मागणी करीत आहेत. बहुतांश सर्वच दुकानांमध्ये भारतीय उत्पादनांची खरेदी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणि पाकला चीनकडून मिळत असलेले समर्थन यामुळे संतप्त झालेले विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते रस्त्या-रस्त्यांवर फिरून जनजागृती करीत आहेत. सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे.वाळीच्या काळात चीनमध्ये उत्पादित डेकोरेटिव्ह लाईट्सला विशेष मागणी असायची. पण, या दिवाळीत या लाईट्सच्या विक्रीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. याशिवाय, एलसीडी आणि अन्य चीन उत्पादनांच्या विक्रीतही मोठी घट झाली असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे
No comments:
Post a Comment