Total Pageviews

Saturday, 22 October 2016

चीनला गरज भारताची-चिनी मालावर बहिष्कार टाका-चिनी मालावर बहिष्काराचा आवाज भारतातील समाजमाध्यमांतून उठू लागला. याची दखल चिनी माध्यमांनीही घेतली-‘भुंकण्या’पलीकडे भारत काहीही करू शकत नाही, असे या दैनिकातील संपादकीय पानासमोरील पानामधील (ऑप-एड) लेखात म्हटले आहे.पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात शहीद झालेल्या जवानांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे


चीनला गरज भारताची चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अधिक निर्भर आहे. या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनापैकी ६० टक्के हिस्सा हा निर्यातीचा आहे. त्यातही भारताचा वाटा एकूण आशियाई देशांमध्ये अधिक आहे. चीनमध्ये तयार केलेल्या मोबाइल, लॅपटॉप,खते, दूरसंचार क्षेत्रातील विविध साहित्य अशा छोटय़ा वस्तूंची येथील बाजारपेठ मोठी आहे. भारत हा चीनला कापड, तेल पदार्थ, मशीन आदी मोठय़ा वस्तू निर्यात करत असला तरी चलनात हे प्रमाण कमी पडते. व्यापाराच्या दृष्टीने भारत-चीन हे जगातील एक मोठे भागीदार देश आहेत. खनिकर्म, स्टील वगैरेसाठी दक्षिण आफ्रिका आणि खनिज तेल वगैरेसाठी चीनला संयुक्त अरब अमिरातपर्यंत पोहोचण्यासाठी पाकभूमीचा वापर करणे सक्तीचे ठरते. हाँगकाँग, शांघाय अशी व्यापारउदिमात आयकॉन असलेली शहरे सागरी किनाऱ्यालगतची आहेत. परिणामी या देशाचा सागरी व्यापारही अधिक आहे. पर्यटन, सी फूड्स याद्वारे या देशाचे स्वत:चे पोट तर भरतेच शिवाय निर्यातीसारखा मोठा आणि तेही विदेशी चलनातील उत्पन्न स्रोत या देशाला लाभला आहे. आयात-निर्यात चीन-भारत दरम्यान कापड, रत्ने, दागिने, मौल्यवान धातू, मीठ, सिमेंट, प्लास्टिक विद्युत उपकरणे, रासायनिक उत्पादने, स्टील, चामडे, मशीन, पंप यांचे मोठे व्यवहार होतात. त्यातही दूरसंचार, संगणक उत्पादने, खते, रासायनिक पदार्थ यांची भारत चीनमधून अधिक आयात करतो. तर कापड, प्लास्टिक, स्टील, चामडे हे भारताकडून चीनमध्ये निर्यात केले जाते. व्यापारातील वरचष्मा ५२ अब्ज डॉलर : चीनबरोबरची भारताची २०१५-१६ या आर्थिक वर्षांतील व्यापार तूट. याचा अर्थ भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत चीनमधून भारतात होणारी वस्तूंची आयात वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत चीनमधून आयातीचे प्रमाण तब्बल २० टक्क्यांनी वाढले आहे. तुलनेत भारताची चीनसाठीची निर्यात २०१५-१६ मध्ये घसरून अवघ्या ९ अब्ज डॉलरवर आली आहे. काही वर्षांपूर्वी हा वेग दुहेरी आकडय़ात होता. संदेशातील विसंवाद चिनी मालावर बहिष्कार टाका असे संदेश सध्या फिरत आहेत. ते ज्या मोबाइलवरून येतात त्यातील अनेक मोबाइल हे चिनी बनावटीचे आहेत.. • चिनी मोबाइल : लेनोवो, आसुस, कूलपॅड, जिओनी, हुवाई, वावो • भारतीय मोबाइल : मायक्रोमॅक्स, आयबॉल, एचसीएल, इंटेक्स, कार्बन लावा, व्हर्जिन, झोलो चिनी माध्यमांतील चर्चा • चिनी मालावर बहिष्काराचा आवाज भारतातील समाजमाध्यमांतून उठू लागला. याची दखल चिनी माध्यमांनीही घेतली. ग्लोबल टाइम्स या चीनमधील सरकारी मालकीच्या माध्यमाने तर या मोहिमेवरून भारतावर दुगाण्याच झाडल्या. ********* भारत आणि चीनमधील व्यापारात मोठी दरी आहे. ती वाढते आहे. परंतु त्यावर केवळ ‘भुंकण्या’पलीकडे भारत काहीही करू शकत नाही, असे या दैनिकातील संपादकीय पानासमोरील पानामधील (ऑप-एड) लेखात म्हटले आहे. ********* नरेंद्र मोदी यांचा ‘मेक इन इंडिया’ हा आवडता उपक्रम अव्यवहार्य असून, भारतामधील मोठय़ा प्रमाणावरील भ्रष्टाचार आणि तेथील बिनकष्टाळू कामगारवर्ग यांमुळे तेथे गुंतवणूक करणे हे आत्मघातकी ठरेल असा सल्लाही या लेखामधून चिनी कंपन्यांना देण्यात आला आहे. किस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्या गुरनाम सिंह या भारतीय जवानाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात शहीद झालेल्या जवानांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. जम्मू काश्मीरमधील हिरानगर सेक्टरमध्ये शुक्रवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरनाम सिंह हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरनामसाठी देशभरात प्रार्थनाही केल्या जात होत्या. पण शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास गुरनाम यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरनाम यांना आम्ही एम्स रुग्णालयात हलवणार होतो. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला असे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. गुरनाम सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच जम्मूतील अरनिया सेक्टरमध्ये शोककळा पसरली आहे. गुरनाम सिंह हे अरनिया सेक्टरचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर स्थानिकांनी गुरनाम सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.आम्हाला युद्ध हवे अशी मागणीच आता गुरनाम सिंह यांच्या वडिलांनी मोदी सरकारकडे केली आहे. दरम्यान, गुरनाम सिंहच्या उपचारावरुन त्याच्या बहिणीने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. देशातील मंत्री उपचारासाठी परदेशात जाऊ शकतात, मग जवानांना उपचारासाठी परदेशात का नेले जात नाही असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला होता. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आत्तापर्यंत ३३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. बुधवारी आणि १६ ऑक्टोबरला पाकच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाले होते.

No comments:

Post a Comment