Total Pageviews

Thursday 20 October 2016

दिल्लीत ‘मेड इन चायना’चा फुसका बार, दिल्लीकरांचा बहिष्कार-चीन विरोधी वातावरण भारतात तापत आहे-चिनी वस्तूंचा भारतातील व्यवसाय ३३० अरब रुपयांचा आहे


दिल्लीत ‘मेड इन चायना’चा फुसका बार, दिल्लीकरांचा बहिष्कार OCTOBER 20, 2016 9:52 PM0 COMMENTSVIEWS: 20 ऑक्टोबर : दिवाळीसाठी आकाशकंदिल, दिव्यांच्या माळा घ्यायच्या तर चिनी बनावटीच्या घेऊ नका, असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. आणि त्यामुळे दिल्लीत चिनी वस्तूंच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांची घट झालीय. दिल्लीतल्या चाँदनी चौकमध्ये चिनी वस्तूंची देशातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पण या बाजारपेठेत चिनी वस्तूंची मागणी घटलीय. chaina_marketभारत आणि पाकिस्तानच्या वादात चीनने पाकिस्तानची बाजू घेतली. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असं आवाहन सोशल मीडियातून केलं जात होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय लोकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं ठरवलं. याचा फटका व्यापाऱ्यांना बसलाय. दिवाळी जवळ आली की दिल्लीमधली चाँदनी चौकची बाजारपेठ सजते ती झगमगत्या माळा आणि आकर्षक आकाश कंदिलांनी. चिनी वस्तूंच्या आकर्षणामुळे या बाजारपेठेत मोठी गजबज असते. चिनी वस्तू स्वस्तही मिळतात त्यामुळे या वस्तूंना मोठी मागणी असते. यावर्षी मात्र तुलनेनं गर्दी कमी दिसतेय. त्यामुळे आधीच घेऊन ठेवलेल्या मालाचं करायचं काय, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडलाय. दिवाळीच्या काळात दिल्लीत चीनी वस्तूंची कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र यावर्षी नॉयडातल्या व्यापाऱ्यांना दीडशे कोटींची ऑर्डर रद्द करावी लागली. हे वातावरण असंच राहिलं तर भारतीय आणि चिनी व्यापाऱ्यांमध्ये नवं शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि चीनची जवळीक व वाढत्या कारवाया या पार्श्‍वभूमीवर चीन विरोधी वातावरण भारतात तापत आहे. स्वदेशी जागरण मंचाने चिनी वस्तूविरोधी अभियान राष्ट्रीय स्तरावर आरंभ केले. या अभियानात तरुणाईचा भक्कम सहभाग जाणवत आहे. त्यामुळे या अभियानाचे विशाल रूप व परिणाम येत्या काळात अनुभवास येईल, असा विश्‍वास स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संयोजक काश्मिरीलाल यांनी एका पत्रपरिषदेत व्यक्त केला. मागील आठवडाभरापासून नागपुरात स्वदेशी जागरण मंच व तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने चिनी वस्तूविरोधी अभियान सुरू आहे. विविध शाळांमध्ये दररोज मार्गदर्शन करून जागृती करण्यात येत आहे. याच मालिकेत आज काश्मिरीलाल यांचे नागपुरात आगमन झाले व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या सुरू असलेले स्वजामंचे चिनी वस्तूविरोधी अभियान आणि गतकाळात झालेली वंगभंगाची चळवळ या दोन्ही आंदोलनाच्या आवाक्यात साम्य व साधर्म्य दिसत आहे. यात अनेकांचे मत असे आहे की या आंदोलनाने चीनवर फारसा परिणाम होणार नाही. पण त्यांच्या मालाची सर्वाधिक विक्री भारतात होते आणि भारतात त्यावर आघात झाल्यास निश्‍चित चीनला धक्का बसेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. चिनी वस्तूंचा भारतातील व्यवसाय ३३० अरब रुपयांचा आहे. सध्या चीनने मोबाईल हॅण्डसेटचे १७ नवे ब्रांड बाजारात आणले आहेत. आणि मोबाईल खरेदीत जगात भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे या क्षेत्रात देखील चीनला अभियानामुळे फटका बसणार आहे. भारतात सौर ऊर्जेच्या वापराला भरपूर वाव आहे. पण भारतात येणारे पॅनल आजवर चीनमधून येत होते. पण आता मंचाने बीएसडीएफ ही संस्था स्थापन करून सर्व सौर साहित्य उत्पादकांना एक़ा छताखाली आणले. त्याचप्रमाणे सध्या वाहनांचे टायर आणि बॅटरी या क्षेत्रात चीनने मुसंडी मारली आहे. त्यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही काश्मिरीलाल यांनी सांगितले

No comments:

Post a Comment