Total Pageviews

Thursday 27 October 2016

सुरक्षा दलाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर २४ माओवाद्यांना कंठस्नान घालून फार मोठी मोहीम फत्ते केली


नक्षल्यांवर प्रहार First Published :28-October-2016 : 05:15:04 पाकव्याप्त काश्मीरात लष्कराच्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर २४ माओवाद्यांना कंठस्नान घालून फार मोठी मोहीम फत्ते केली आहे. या कारवाईने नक्षलवाद्यांना जबर हादरा बसला असणार यात शंका नाही. कारण एकाच मोहिमेत एवढ्या मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आल्याची ही आजवरची पहिलीच घटना आहे. याबद्दल ग्रेहाऊंडस्च्या जवानांचे कौतुक करायला हवे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला दहशतवादापेक्षाही नक्षलवादाचा अधिक धोका आहे. देशातील १० राज्यांमधील १८० जिल्हे गेल्या अनेक वर्षांपासून नक्षली हिंसाचाराचा सामना करीत असून या काळात नक्षलवाद्यांनी हजारो निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. विशेषत: गडचिरोली ते छत्तीसगडदरम्यान बिजापूर, सुकमा, तेलंगणाचा खम्मन आणि ओडिशातील मलकानगिरीपासून आंध्र प्रदेशच्या विजयवाडापर्यंतचा संपूर्ण पट्टा नक्षलवाद्यांसाठी रेडकॉर्नर बनला आहे. या रेडकॉनर्रमधील नक्षल्यांच्या कारवायांवर अंकुश घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. अलीकडच्या काळात नक्षल चळवळीला बरीच खीळ बसली आहे. यावर्षी आतापर्यंत पोलिसांनी एकट्या बस्तरमध्ये ८६ नक्षलवाद्यांना ठार केले. इतरही राज्यांमध्ये नक्षल्याविरुद्ध दंड थोपटण्यात आले आहे. याशिवाय नक्षल चळवळीत राहून नैराश्य आलेल्या अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग अवलंबला आहे. या परिस्थितीचा लाभ विकास यंत्रणांनी घेतला तर ही चळवळ मोडीत निघू शकते. कारण नक्षलवादाची समस्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांशी निगडित असल्याने केवळ बळाचा वापर करून सुटणारी नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच दुर्गम आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासही यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. दबाव वाढला की शांत बसायचे आणि सुरक्षा यंत्रणा शिथिल झाली की पुन्हा सक्रिय व्हायचे हे नक्षलवाद्यांचे डावपेच आहेत. त्यामुळे केवळ अशा प्रकारच्या कारवायांनी हा गंभीर प्रश्न मार्गी लागेल असे नाही. याला विकासाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड असावी लागणार आहे. नक्षलवादावर नियंत्रणासाठी शासनाकडून वेळोवेळी वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले. सलवा जुडूम हा त्यापैकीच एक होता. काही दिवसांपूर्वी बस्तरमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध जवळपास ६० हजार लोकांनी ललकार रॅली काढली होती. मात्र एवढ्याने भागणार नाही. कारण त्यात सातत्याचा नेहमीच अभाव राहिला. आज नक्षलग्रस्त भागातील लोकांनाही हिंसाचार नको आहे. तळपत्या लोखंडावरच हातोडा मारणे केव्हाही चांगले. शासनाने बळासोबतच दुर्गम आदिवासी भागातील लोकांच्या विकासाचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास नक्षलवादाचा बीमोड होऊ शकतो, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. ४) Bookganga :- http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5660308543730989926?BookName=Nakshalvadache-Avhan:-Chinche-Bhartashi-Chhupe-Yuddha माओवादाचे आव्हान पार्ट २ (google play) https://play.google.com/store/books/details/%E0%A4%AC_%E0%A4%B0_%E0%A4%97_%E0%A4%A1_%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%B9_%E0%A4%AE_%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9_%E0%A4%9C%E0%A4%A8_Maovadache_Awhan?id=8R_-DAAAQBAJ&hl=en आणखी संबंधित बातम्या

No comments:

Post a Comment