Total Pageviews

Friday, 14 October 2016

लोकहो, स्वदेशी उत्पादनांचा आग्रह धरा !- चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची चेतावणी देऊन त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याची सिद्धता चालू करावी चिनी चेतावणीला उत्तर द्या !


लोकहो, स्वदेशी उत्पादनांचा आग्रह धरा !- चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची चेतावणी देऊन त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याची सिद्धता चालू करावी चिनी चेतावणीला उत्तर द्या !-SANATAN PRABHAT १३ऑक्टोबरला ब्रीक्स (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या) वाणिज्य मंत्र्यांची बैठक दिवसभर चालू आहे. मुख्यत्वे व्यापार वाढण्याच्या संदर्भातील ही बैठक आहे. भारताच्या गृहमंत्र्यांनी पाकलगतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घोषित केल्याच्या पार्श्वीभूमीवर चीनने चीन आणि भारत यांमधील आधीच रखडत चालू असलेला व्यापार अधिक बाधीत होईल, अशी धमकीच त्याचे शासकीय दैनिक ग्लोबल टाइम्समधून दिली. नेहरूंच्या हिंदी-चिनी भाई भाईच्या घोषणेनंतर तत्परतेने मॅकमोहन रेषेवर आक्रमण करून चीनने त्याची चाल दाखवून दिली आणि भारताचे डोळे खाडकन उघडले. तेव्हापासून शत्रूत्व जोपासत असलेला चीन पाकसमवेत मैत्री करून, पाकला सर्वतोपरी साहाय्य करून, वारंवार आतंकवादी पाकची बाजू घेऊन आणि आता चिनी सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याच्या सिद्धतेत ठेवून त्याचे पाकप्रेम वारंवार सिद्ध करत असतो. काही दिवसांपूर्वी न्युक्लिअर सप्लाअर्स ग्रूप (एन्एस्जी)चा सदस्य होण्याची सर्व पूर्वसिद्धता भारताने केली असतांना केवळ चीनने खोडा घातल्याने हे सदस्यत्व मिळू शकले नव्हते. जैश-ए-मोहंमदचा आतंकवादी मसूद अजहरवर राष्ट्रसंघाने निर्बंध आणण्याच्या भारताच्या मागणीला चीनने कडाडून विरोध करून पाक आणि आतंकवादी यांना पाठीशी घातले. या दोन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा चीनचा भारतद्वेष अधोरेखित झाला. शत्रूराष्ट्राविषयी मानवतावादी भूमिका घेण्याची सद्गुणविकृती असलेल्या भारतीय नेत्यांनाही त्यामुळे शिकायला मिळाले असेल. भारताची चीननीती खोटी नावे दिलेल्या आणि तिबेटी शरणार्थींना भेटण्यासाठी आलेल्या चीनच्या शासकीय पत्रकार यंत्रणेच्या तीन पत्रकारांना व्हिसाची मुदत वाढवण्यास मध्यंतरी भारताने नकार देऊन ठामपणा दाखवला. काही दिवसांपूर्वी लडाखच्या नियंत्रण रेषेवर भारताने ७२ टँक आणून ठेवले. त्यानंतर धूर्त चीन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याची भाषा करू लागला. दक्षिण चीन समुद्रातील भारतीय नौसेनेच्या जहाजांवर चीन सातत्याने आक्षेप घेत असतो. त्यामुळे भारताने चिनी समुद्रातील मलेशिया या देशाला ब्रह्मोस हे महत्त्वाचे अस्त्र पुरवून चीनची चांगलीच जिरवली आहे. चाबहार बंदराने मध्य आशिया आणि अफगाणिस्तानसाठी भारताचे रस्ते मोकळे करून चीनला मोठा धक्का दिला. या सर्व गोष्टी मोदी यांच्या परराष्ट्रनीतीचे फलित म्हणाव्या लागतील. भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाकमधील आतंकवाद पोसणार्यार चीनला काश्मीरमधील आतंकवादावर नाईलाजाने टिपणी करण्याची वेळ आली, तसेच सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भात प्रत्येक देशाला त्याचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे असेही नाईलाजाने का होईना म्हणावे लागले. ही वेळ भारताने त्याच्यावर आणली आहे. एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे भारत मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम (एम्टीसीआर्) या मिसाईल आणि अंतरिक्ष क्षेत्रातील विकासाच्या निर्णयाच्या संदर्भातील बैठकीत सहभागी होत आहे, ज्यात चीनचा समावेश नाही. वरील सर्व पार्श्वंभूमीवर चीनने दिलेल्या व्यापार्याकच्या संदर्भातील नवीन चेतावणीवर भारताने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची चेतावणी देऊन त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याची सिद्धता चालू करावी, अशी अपेक्षा आहे. लोकहो, स्वदेशी उत्पादनांचा आग्रह धरा !- चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची चेतावणी देऊन त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याची सिद्धता चालू करावी काश्मीर येथील उरी येथे सैन्यतळावर झालेल्या आक्रमणानंतर भारतातील समाजमन प्रक्षुब्ध झाले आहे. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर त्याला वारंवार समर्थन देणार्याा आणि भारताचे पाणी अडवण्याची भाषा करणार्या चीनच्या विरोधातही राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. हरियाणातील मेवात येथील व्यापारी असोशिएशननेे चीनच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार, असा निर्णय घेऊन या असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. असाच निर्णय अनेक व्यापारी संघटना देशात विविध ठिकाणी घेतांना दिसून येत आहेत. चीनच्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठात प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. अगदी टाचणीपासून, लेखणी, कागद यांपासून कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू, भ्रमणसंच, तसेच दैनंदिन जीवनात लागणार्याच प्रत्येक वस्तू भारतियांच्या घराघरांत पहावयास मिळत आहेत. चिनी उत्पादनांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम ! स्वातंत्र्यानंतर काँग्रेस शासनाने देशातील उद्योगधंदे विकसित होण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कधीच रस घेतला नाही. येथील क्लिष्ट नियम, भूमी मिळण्यात येणार्याो अडचणी, अन्यायकारक करप्रणाली, लालफितीत अडकलेले प्रशासन यांमुळे एखाद्याला नवीन उद्योग चालू करणे हे अवघड बनत गेले. खरे तर कोट्यवधी निरुद्योगांसाठी लघु उद्योजक ही सुवर्णसंधी होती; मात्र याकडे कधी लक्षच दिले गेले नाही. याउलट चीनमध्ये कच्च्या मालाची उपलब्धता करून देण्यापासून निर्यातीपर्यंतच्या सर्व सुविधा तेथील शासनाने लहान-लहान उद्योगजकांनाही उपलब्ध करून दिल्या. यामुळे दिवाळीच्या काळात लहान लहान दिवे, आकाशकंदील, लहान विजेर्यां यांपासून भारतियांना जीवनावश्यक असणार्या प्रत्येक लहान-सहान वस्तूही भारतातील गल्लीबोळातील बाजारपेठेत सहज उपलब्ध होत आहेत. या वस्तू अल्प मूल्य असलेल्या आणि दिसण्यास सुबक असल्याने अल्प कालावधीत त्याची भुरळ भारतीय नागरिकांना पडली. अगदी रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा विक्रेताही चिनी बनावटीचा दिवा घेऊन बसू लागला. याचा हळूहळू परिणाम असा झाला की, येथील लहान उद्योगधंदे पूर्णत: मोडकळीस आले आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला. भारतियांना चीनला धडा शिकवण्याची संधी ! १० ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्रामध्ये सुरक्षा परिषदेत मसूद अजहर याला आतंकवादी घोषित करण्याच्या निर्णयाला संदर्भात १४ राष्टे्र भारताच्या बाजूने असतांना एकट्या चीनचे नकाराधिकार वापरून आतंकवादाच्या सूत्रावरून कोणता देश राजनैतिक लाभ उठवू शकत नाही, असे म्हणत या प्रस्तावाला विरोध केला आहे. सहा महिन्यांपूर्वीही पठाणकोट आक्रमणानंतर मसूदचे नाव पुढे आल्यावर तांत्रिक कारणे सांगत चीनने विरोध केला होता. भारतात वारंवार आतंकवादी कारवाया करणार्या् पाकिस्तानला चीन आंतराष्ट्रीय स्तरावरही साहाय्य करत आहे. याचा भारतीय नागरिकांनीही आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांच्या काळात भारतियांनी इंग्रजी वस्तूंची होळी केली, त्याचप्रकारे आताही चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याची भूमिका घ्यावी, म्हणजे पाकिस्तानला समर्थन देतांना चीनला दहा वेळा विचार करणे भाग पडेल ! चीनविरुद्ध बहिष्काराचे हत्यार? –DIVYA MARA-संजीव पिंपरकरOct 13, 2016 उरीतील लष्करी तळावर अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद््ध्वस्त करीत पाकिस्तानला धडा शिकवला. त्यानंतर भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकच्या सत्यतेबाबत काँग्रेस, केजरीवाल यासारखे पक्षनेते कोल्हेकुई करत असताना देशवासीयांच्या मनातले लष्कराने घडवले याबद्दल अभिमानाची, राष्ट्रप्रेमाची भावना सर्वत्र आहे. अशातच चीनने पाकिस्तानची पाठराखण करण्याचा उपद्व्याप तसाच पुढे चालू ठेवला आहे. युनोच्या परिषदेचे कायम सदस्यत्व व न्यूक्लियर सप्लायर ग्रुपचे सदस्यत्व भारताला मिळणे, याबाबत चीनने नेहमीच विरोधात भूमिका घेतली आहे. दहशतवाद्यांचा एक नेता मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव युनोसमोर आला असताना चीनने विशेष अधिकाराचा वापर करीत (व्हेटो) त्यालाही विरोध केला. पाकिस्तानची पाठराखण करण्याच्या आजवरच्या धोरणाला अनुसरूनच चीनची ही कृती असली तरी विशेषत: सर्जिकल स्ट्राइकनंतर देशभरात सध्या असलेल्या लोकभावनेच्या पार्श्वभूमीवर चीनविषयीचा राग उफाळून आला आहे. त्यामुळेच देशभरात सध्या काही पक्ष, नेते चीनमध्ये उत्पादन होणाऱ्या मालाच्या खरेदीवर लोकांनी बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत आहेत. विविध माध्यमांमधून या संदर्भात अनेक मतमतांतरे व्यक्त होत आहेत. बहिष्काराची भाषा आज तरी मर्यादित प्रमाणात पसरलेली असली तरी एकूणच त्या आवाहनाला सर्वसामान्य भारतीयांकडून कितपत साथ मिळेल याबाबत शंका व्यक्त होते. जागतिक बाजारपेठेमध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. विविध देशांकडून भारत करत असलेल्या एकूण आयातीमध्ये १/६ आयात ही एकट्या चीनकडून सध्या होते आहे. चीनकडून होणारी आयात आणि भारताकडून चीनला होणारी निर्यात याचे प्रमाण इतके व्यस्त आहे की त्याची चिंता वाटावी. भारत चीनकडून करणारी आयात ही ३२ लाख कोटी रुपयांची आहे. गेल्या पाच वर्षांत त्यात ५ टक्क्यांची वाढ झाली. विशेष म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर आयातवाढीचा वेग अगोदरपेक्षा जास्तीचा आहे. आयातीच्या तुलनेत भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीचे आकडेदेखील देशवासीयांना निराश करणारेच आहेत. ज्या कालावधीत आयात ५ टक्क्यांनी वाढली त्याच कालावधीत भारताकडून होणारी निर्यात ५० टक्क्यांनी घटली. आयातीच्या तुलनेत निर्यातीचे प्रमाण नगण्य आहे. पाच वर्षातील भारताची निर्यात ही ८६ हजार कोटींवरून ४३ हजार कोटींवर घसरली. दोन देशातील आयात ‑ निर्यातीचे हे व्यस्त प्रमाणच भारताची स्थिती गती काय आहे हे स्पष्ट दर्शवते. चीनकडून भारतात पॉवरप्लँट, मोबाइल फोन, सेट टाॅप बाॅक्स, खते इत्यादींची आयात होते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य भारतीयांच्या देवतांच्या मूर्ती, प्रतिमा यादेखील चीनने हायजॅक केल्या आहेत. कोणत्याही जातीधर्माचे दैवत याला अपवाद नाही. ज्या प्रतिमेसमोर आपण मनोभावे प्रार्थना करतो ती देशातच तयार झाली असेल याची खात्री देता येत नाही. चीनमध्ये आॅलम्पिक स्पर्धा होत्या तेव्हा युरिया खताच्या किमती वाढल्याने देशातील शेतकरी हैराण झाले होते. इतकी जबरदस्त पकड भारतांतर्गत बाजारपेठेवर चीनने मिळवली आहे. दोन देशांमधील यापुढची सगळी युद्धे ही रणांगणापेक्षा बाजारपेठांमधून खेळली जातील, असे शेतकरी संघटनेचे द्रष्टे व दिवंगत नेते शरद जोशी म्हणायचे. हे केवळ शेतमाल व त्यांची जागतिक बाजारपेठ यापुरतेच मर्यादित नाही. एकूणच सर्वच उत्पादनांच्या बाबतीत लागू आहे. त्याची प्रचिती आता पावलोपावली येते आहे. जागतिक देशांतर्गत बाजारपेठेच्या रणांगणावर चीनला हरवण्याची ताकद आपण कमावली आहे का, याचा विचार आपण बहिष्काराच्या आवाहनाच्या प्रतिसादाचे गणित मांडताना करायला हवा. शेजारील राष्ट्राच्या उत्पादन क्षमतेची ताकद ओळखण्यात भारत अपयशी ठरला, असे रघुराम राजन व मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी २००६ मध्ये एका शोध प्रबंधाच्या मांडणीत म्हटले होते. आजवरच्या कोणत्याही सरकारातल्या नेतृत्वाने गुणवत्ता पूर्ण व किफायतशीर किमतीच्या मालाची उत्पादन क्षमता वाढीसाठी समर्पक व पुरेसे प्रयत्न केले नाहीत. मग चीनशी स्पर्धा कशी करणार? परिस्थितीने गांजलेल्या सर्वसामान्य लोकांचा ओढा हा स्वस्त वस्तूंच्या खरेदीकडे साहजिकच व अपरिहार्य असतो. तेथे स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे चीनच्या मालावर बहिष्कार व स्वदेशी मालाचा पुरस्कार या आवाहनास लोक व व्यापारी यांच्याकडून कितपत प्रत्यक्ष साथ मिळेल हे सांगणे कठीण आहे. आता मेक इन इंडियाची चर्चा पंतप्रधान जगभर करीत आहेत. परंतु त्याला यश कितपत अन् केव्हा मिळेल, हे काळच ठरवेल.

1 comment: