Total Pageviews

Thursday, 27 October 2016

#Sandesh2Soldiers या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भारतीयांचा भरभरुन प्रतिसाद-या हॅश टॅगच्या माध्यमांतून सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.भारताने चीनच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष केले आहे. -

#Sandesh2Soldiers या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भारतीयांचा भरभरुन प्रतिसाद #Sandesh2Soldiers या हॅश टॅगच्या माध्यमांतून सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. ऑनलाइन टीम | October 27, #Sandesh2Soldiers या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भारतीयांचा भरभरुन प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या जवानांना दिवाळी संदेश देण्यासाठी मोदी सरकारने नवा उपक्रम सुरु केला आहे. देशभरात दिवाळीच्या उत्सवात देखील जवान सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात.त्यांच्यामुळे प्रत्येक भारतवासियाने सीमेवरील जवानांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले होते. भारतीय जवानांना संदेश पाठविण्यासाठी ‘माझे सरकार’ या पोर्टलच्या माध्यमातून #Sandesh2Soldiers हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. भारतीय जवानांना संदेश देण्यासाठी सुरु केलेल्या या उपक्रमाला देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. मोदी सरकारच्या या उपक्रमाला नेटीझन्स मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहे. #Sandesh2Soldiers या हॅश टॅगच्या माध्यमांतून भारतवासियांना सीमेवरील सैनिकांना संदेश देत आहेत. मोदी सरकारने आपले सरकार या पोर्टलवर अॅपच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला भारततीयांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सामान्य जनतेपासून ते प्रसिद्ध व्यक्तिपर्यंत सर्वजण यंदाच्या दिवाळीमध्ये भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला असून नागरिकांना पंतप्रधान मोदींच्या या उपक्रमात सहभागी होऊन भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन केले.भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ याने सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने शहिद जवानांसाठी प्रत्येकाने दिप प्रज्वलीत करावा असे आवाहन केले आहे. भारतीय क्रिडा जगतातून मोहम्मद कैफ व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारतीय सैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते भारतीय संघाचे आणि सीमेवर लढत असणाऱ्या सैनिकाचे कौतुक केले. तिरंग्याच्या सन्मानासाठी मैदानात विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाचा आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बेटमधील जनतेचे श्रद्धास्थान असलेले जगप्रसिद्ध धार्मिक गुरु दलाई लामा हे पुढील वर्षीच्या मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे ठरल्याप्रमाणे भेट देतील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या निमंत्रणावरुन लामा हे तवांगला भेट देणार आहेत. लामा यांच्या भेटीची घोषणा याआधीच करण्यात आली होती; मात्र चीनने यास आक्षेप घेतला होता. भारतामधील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी अरुणाचलला नुकत्याच दिलेल्या भेटीमुळेही चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादामध्ये अमेरिकेने नाक खुपसू नये, असा कडक इशाराही चीनकडून देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर लामा यांच्या तवांग भेटीमुळे भारत व चीन संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली होती. मात्र भारताने चीनच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष केले आहे. लामा हे भारताचे पाहुणे असून देशामध्ये कोठेही प्रवास करण्याचे त्यांना स्वातंत्र्य असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते विकास स्वरुप यांनी व्यक्‍त केली आहे. ""दलामी लामा हे अध्यात्मिक गुरु आहेत. अरुणाचलमधील बुद्धधर्मीयांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. लामा यांचा आशीर्वाद घेण्याची त्यांची इच्छा आहे. शिवाय, लामा यांनी याआधीही अरुणाचलला भेट दिली आहे; आणि आताही लामा यांच्या पुन्हा भेट देण्यामध्ये वावगे असे काही नाही,‘‘ असे स्वरुप म्हणाले. तिबेटमधील बुद्धर्मीयांसाठी तवांगचे विशेष महत्त्व आहे. चीनने 1959 मध्ये तिबेटवर हल्ला केल्यानंतर लामा यांनी तवांगमध्येच आश्रय घेतला होता. 26/11नंतर यूपीएला सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला होता - शिव शंकर मेनन First Published :28-October-2016 : 10:05:00 Last Updated at: 28-October-2016 : 11:00:15 ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 28 - ज्यावेळी मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला करण्यात आला, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यावेळच्या यूपीए सरकारने पाकिस्तानविरोधात तातडीने कारवाई करणे टाळले, असा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव आणि यूपीए सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिव शंकर मेनन यांनी केला आहे. मेनन यांनी हा गौप्यस्फोट त्यांच्या ‘चॉइसेस: इनसाईड द मेकिंग ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकात केला आहे. '26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचे तळ आणि आयएसआयविरोधात कारवाई व्हावी, असे यूपीए सरकारला सांगितले होते. मात्र, भारताने लगेचच पाकिस्तानवर हल्ला केला नाही. याचे कारण म्हणजे, 26/11 हल्ल्याचे पाकिस्तानला प्रत्युत्तर न दिल्यास जास्त फायदा होईल, असे सांगत यूपीए सरकारने कारवाई टाळली', असा गौप्यस्फोट मेनन यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. 'लष्कर-ए-तय्यबा' या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी 2008 मध्ये मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले केले होते. दहशतवाद्यांकडून तीन दिवस हा रक्तपात सुरू होता. या हल्ल्यात 166 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात परदेशी नागरिकांचादेखील समावेश होता. तीन दिवस सुरू असलेला हा दहशतवादी हल्ला संपूर्ण जगाने टीव्हीच्या माध्यमातून पाहिला. यामुळे भारतीय पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, असा उल्लेखदेखील त्यांनी पुस्तकात केला आहे. १८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले होते.

No comments:

Post a Comment