November 6, 2016
अवंतीपुरा, ६ नोव्हेंबर
बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर हिंसाचाराच्या आगीत होरपळलेल्या काश्मीर खोर्यातत शांतता मोहीम यशस्वीपणे राबविल्यानंतर भारतीय लष्कराने आता ‘स्कूल चलो’ मोहीम हाती घेतली आहे. खोर्यांतील काही निवडक भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून, याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि अभ्यासक्रमाबाहेरील कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे.
आम्हाला केवळ सीमेवरील स्थितीच नाही, तर राज्यातील अंतर्गत स्थिती देखील हाताळायची आहे, याची जाणीव आहे आणि ऐच्छिक परिणामांसह आम्ही आपली जबाबदारी पार पाडत आहोत. आम्ही काही स्थानिक नागरिकांशी या मुद्यावर चर्चा केली असता, बहुतांश लोकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता आणि सुरक्षा सतावत असल्याचे दिसून आले. या एकूणच स्थितीवर विचार करून मी आपल्या अधिकारी व जवानांना मुलांना शिक्षण पुरविण्याची व्यवस्था तातडीने उपलब्ध होईल, अशी ठोस योजना तयार करण्यास सांगितले आणि आता आम्ही ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती ‘व्हिक्टर फोर्स’चे जनरल ऑफिसर-ईन-कमांड मेजर जनरल अशोक नरुला यांनी दिली.
लष्कराने ऑगस्ट-सप्टेंबर या काळात कमीतकमी बळाचा वापर करून काश्मीर खोर्या.तील बहुतांश भागात शांतता मोहीम राबवली होती. या मोहिमेला मोठे यशही प्राप्त झाले. अतिरेकी नेता बुरहान वाणीचा लष्कराने खात्मा केल्यानंतर सलग पाच महिने उसळलेल्या हिंसाचाराच्या आगीत आतापर्यंत ३४ शाळांना आगी लावण्यात आल्या असून, शैक्षणिक संस्था देखील बंद आहेत. अशा स्थितीत मेजर जनरल नरुला यांनी हाती घेतलेली ‘स्कूल चलो’ मोहीम प्रचंड लोकप्रिय ठरत असून, शेकडो विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वातील विविध तुकड्यांनी शिक्षकांची जमवाजमव केली असून, शाळा आणि समूदाय भवनांमध्ये लष्करी जवानांच्या कडेकोट सुरक्षेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.
मी एक लष्करी अधिकारी असलो, तरी दोन मुलांचा बाप आहे. त्यामुळे लष्करी अधिकारी म्हणून नव्हे, तर एक पिता म्हणून मी हा उपक्रम हाती घेतला आहे. मुलांच्या हातात दगडांऐवजी पुस्तक आले, तर त्यांची नक्कीच प्रगती होईल, यावर माझा ठाम विश्वा्स आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी काश्मीरमध्ये पेटवून देण्यात आलेल्या शाळा पुन्हा उभारून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. रविशंकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शाळा उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला. काश्मीरमध्ये मागील काही दिवसांमध्ये जवळपास 27 शाळा आगीच्या हवाली करण्यात आल्या. यामुळे या शाळा बेचिराख झाल्या आहेत. यात सरकारी बरोबरच खासगी शाळांचाही समावेश आहे.
बिहार आणि काश्मीरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे काम पाहणारे संजय कुमार सिंग यांना पेटविण्यात आलेल्या शाळांची ओळख पटविणे आणि त्यांना पुन्हा उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय कुमार हे पाहणीनंतर आकलन अहवाल सादर करतील. 22 नोव्हेंबर रोजी काश्मिरी नेत्यांसोबत यासंदर्भात दिल्लीत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दिवशी श्री श्री रविशंकर देखील संमेलनाला संबोधित करतील आणि काश्मिरी नेत्यांची भेट घेतील.
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आपल्या फ्री स्कूल प्रकल्पांतर्गत मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करविते. काश्मीरच्या शाळांना पुन्हा बनविण्याची योजना याच पुढाकारांतर्गत केली जात आहे. संस्था सध्या 20 राज्यांमध्ये जवळपास 50000 मुलांना मोफत शिक्षण पुरवत आहे. संस्थेद्वारे नक्षलवाद, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कोणत्याही कारणामुळे प्रभावित मागास भागात देखील शाळा उघडल्या जातात.
काश्मीर खोऱयात मागील 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान जवळपास 27 शाळा समाजकंटकांकडून पेटवून देण्यात आल्या. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी मारला गेल्यानंतर भडकलेला हिंसाचार अजूनही पूर्णपणे शमलेला नाही. अलिकडेच जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने शाळा पेटविण्याच्या घटनेची दखल घेत अधिकाऱयांना शाळा सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती शोधण्याचा निर्देश दिला होता.
शाळांना आगी लावण्याचे सत्र
आता दहशतवाद्यांच्या टोळ्यांनी श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला या जिल्ह्या-तल्या ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळांना आगी लावून त्या भस्मसात करायचे सत्र सुरू केले आहे. गेल्या महिनाभरात तीस प्राथमिक शाळांच्या इमारतींना दहशतवाद्यांनी आगी लावल्याने या शाळातील लाकडी बाके, दप्तर आणि शाळाही नष्ट झाल्या आहेत. राज्यातल्या बहुतांश प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंदच आहेत. वातावरण निवळल्यावरही ग्रामीण भागातल्या मुलांना प्राथमिक शाळेत जाताही येऊ नये, त्यांचे शिक्षण पूर्णपणे बंद पडावे, यासाठीच दहशतवाद्यांनी शाळांना आगी लावायची कटकारस्थाने सुरू केल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
उरी हल्ल्याचा सूड घ्यायसाठी कमांडो दलाने केलेल्या लक्ष्यवेध कारवाईनंतर आय. एस. आय. या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना चिथावण्या देत शाळांना आगी लावायचा ही नवी मोहीम सुरू केली. बहुतांश शाळा गावापासून दूर आहेत आणि तेथे सुरक्षा दलांचे कोणतेही संरक्षण नाही. नेमकी हीच उणीव लक्षात घेऊन रात्री दहशतवादी शाळांना आगी लावतात. सरकारी कार्यालये आणि शाळांच्या इमारतींना आगी लावायचे कारस्थान आय. एस. आय. ने रचल्याचे गुप्तचर खात्यांना समजले होते. काही सरकारी कार्यालयांवर दहशत-वाद्यांचे हल्लेही झाले. पण, सर्व सरकारी कार्यालयांना सुरक्षा दलांचे संरक्षण तातडीने देण्यात आल्याने, सरकारी कार्यालये भस्मसात करायचा हा कट उधळला गेला. पण, शाळांना लावल्या जाणार्यां आगींना पायबंद घालण्यात सुरक्षा दलांनाही अपयश आले आहे.
ग्रामीण भागातल्या जनतेला शांतता हवी असली, तरी दहशत-वादी बंदुका रोखून त्यांना ठार मारायची भीती घालतात. त्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणात आग लागलेल्या शाळा वाचवायसाठी ग्रामस्थही जात नाहीत, अशी गंभीर स्थिती आहे. सुरक्षा दलांनी गेल्या चार महिन्यात दहशतवाद्यांच्या विरोधात अंमलात आणलेल्या कारवाईत पन्नास दहशतवाद्यांचे बळी गेले. तरीही अद्याप 150 दहशतवादी आहेतच आणि तेच अडीच हजार लोकांच्या समूहाला हाताश धरून ही हिंसक कृत्ये करीत असल्याचे सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. सरकारने काश्मीर खोर्या तल्या दहा हजार युवकांची पोलीस दलात भरती करायच्या मोहिमेला प्रतिसाद मिळाल्याने, फुटीरतावादी संघटना आणि दहशतवाद्यांनी आता राज्यातली संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची, मुलांना शिकूच द्यायचे नाही, असे नवे लोक-विरोधी धोरण अंमलात आणले आहे. राजधानी श्रीनगरमध्ये 1990 नंतर प्रथमच, महत्त्वाच्या चौकात सुरक्षा दलांच्या नव्या चौक्या सुरू करण्यात आल्या आहेत आणि शहरातल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काश्मीर खोऱ्यात चार महिने शाळा- महाविद्यालये बंद आहेत, शाळांना आगी लावल्या जात आहेत.
No comments:
Post a Comment