Total Pageviews

Saturday, 5 November 2016

माजी मुख्यमंत्र्याचे काळ्या पैशाचे इमले! मध्य मुंबईतील प्रकल्पात कोटय़वधींची गुंतवणूक; विकासकाविरोधात गुन्हा दाखल

< विशेष प्रतिनिधी, मुंबई | November 6, 2016 1:08 AM माजी मुख्यमंत्र्याचे काळ्या पैशाचे इमले! मध्य मुंबईतील प्रकल्पात कोटय़वधींची गुंतवणूक; विकासकाविरोधात गुन्हा दाखल मध्य मुंबईतील करी रोड येथे उभ्या राहत असलेल्या आलिशान प्रकल्पात एका स्वाभिमानी माजी मुख्यमंत्र्याच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या विविध कंपन्यांचा काळा पैसा वापरण्यात आला असावा, असा दाट संशय आल्याने सक्तवसुली महासंचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी संबंधित विकासकाविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता संबंधित माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीयही अडचणीत येण्याची शक्यता आहे. करी रोड येथील हा आलिशान प्रकल्प खोटी कागदपत्रे सादर करून चार इतके चटईक्षेत्रफळ मिळविल्यामुळे याआधीच अडचणीत आला आहे. आता या प्रकल्पात माजी मुख्यमंत्री आणि त्याच्या कुटुंबीयांचा बेनामी पैसा (सुमारे ३०० कोटी रुपये) वापरला गेल्याची चौकशी सुरू झाल्यामुळे अडचणीत अधिक भर पडली आहे. सक्तवसुली महासंचालनालयाकडून या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असता परदेशातील पैसा भारतीय कंपन्यांमध्ये वळवून तो या प्रकल्पासाठी वापरला गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यावरूनच तूर्तास विकासकाविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता विकासकाला चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. विकासकाचे जबाब नोंदविल्यानंतर संबंधित माजी मुख्यमंत्री तसेच त्याच्या कुटुंबीयांनाही पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्य़ाचा तपास सध्या सुरू असून या गुन्ह्य़ात प्रकल्पाला अर्थसहाय्य करणाऱ्या अनेक कंपन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कंपन्या संबंधित माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपन्यांचे दहा रुपयांचे समभाग हजार रुपयांना विकण्यात आले आहेत आणि पुन्हा ते समभाग ९० पैशांना विकत घेण्यात आले आहेत. या कंपनीचा प्रत्यक्षात कुठल्याही स्वरुपाचा व्यवहार नसताना वा कुठलाही महसूल उपलब्ध नसतानाही या कंपन्यांमधील पैसा अन्य उपकंपन्यांमध्ये वळविण्यात आला आहे. त्यानंतर तो या प्रकल्पासाठी वळविण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांचा जबाब नोंदविला जाणार आहे. त्यानंतरच संबंधितांवर गुन्हा दाखल करावयाचा किंवा नाही, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत सक्तवसुली महासंचालनालयाचे मुंबईतील संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र महासंचालनालयाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी चौकशी सुरू असल्याचे मान्य केले. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे सध्या काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये तुरुंगात आहेत. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि त्याच्या कुटुंबीयांचा सहभाग उघड झाल्यास भुजबळ यांच्या पाठोपाठ बडी राजकीय व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या चौकशीत परदेशातील पैसा भारतीय कंपन्यांमध्ये वळवून तो या प्रकल्पासाठी वापरला गेल्याचे स्पष्ट तूर्तास विकासकाविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल भ्रष्टाचाराचा मार्ग.. प्रकल्पाला अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपन्या या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांशी संबंधित. या कंपन्यांचे दहा रुपयांचे समभाग हजार रुपयांना विकण्यात आले. नंतर पुन्हा ते समभाग ९० पैशांना विकत घेण्यात आले. या कंपनीचा प्रत्यक्षात कुठल्याही स्वरूपाचा व्यवहार नसताना वा कुठलाही महसूल उपलब्ध नसतानाही या कंपन्यांमधील पैसा अन्य उपकंपन्यांमध्ये वळविण्यात आला. त्यानंतर तो या प्रकल्पासाठी वळविण्यात आला

No comments:

Post a Comment