Total Pageviews

Sunday, 6 November 2016

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे यांना वीरमरण-गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात महाराष्ट्राने आतापर्यंत सहा वीर गमावले आहेत. यापूर्वी नितीन कोळी (बुधगाव, सांगली), चंद्रकांत गलांडे (सातारा), संदीप ठोक (खंडजगळी, नाशिक), पंजाब उईके (नांदगाव, अमरावती), विकास कुळमेथे (पुराड, यवतमाळ).


भारतीय लष्कराकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पुंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने पुन्हा गोळीबार सुरू केला आहे. या गोळीबारात महराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कार्वे गावचे सुपूत्र राजेंद्र तुपारे यांच्यासह आणखी एका जवानाला वीरमरण आले. तुपारे हे पुंछ येथे कार्यरत होते. या गोळीबारात दोन नागरिकही जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राजेंद्र तुपारे हे २००२ साली लष्करात दाखल झाले होते. ते 2002 साली बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. बीएसएफकडून मिळत असलेल्या चोख प्रत्युत्तरानंतरही पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार अद्याप थांबलेला नाही. आज सकाळी पुंछ जिल्ह्यातील मेंढर विभागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. दरम्यान, भारताने प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या काही चौक्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात महाराष्ट्राने आतापर्यंत सहा वीर गमावले आहेत. यापूर्वी नितीन कोळी (बुधगाव, सांगली), चंद्रकांत गलांडे (सातारा), संदीप ठोक (खंडजगळी, नाशिक), पंजाब उईके (नांदगाव, अमरावती), विकास कुळमेथे (पुराड, यवतमाळ). पाकिस्तान जाणूनबुजून सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास या गोळीबारास सुरूवात झाली. त्यानंतर रविवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नियंत्रण रेषेवरच्या चौक्या तसेच सैन्यविरहित भागांवर पाकिस्तानने गोळीबार सुरू केला आहे. पुंछ भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आतापर्यंत ९९ हून अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत व्हावी, यासाठी पाकिस्तानच्या सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करीत पूँच जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी केलेल्या जोरदार गोळीबारात भारतीय लष्कराचे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील कार्वे गावचे सुपुत्र राजेंद्र तुपारे यांच्यासह दोन जवान हुतात्मा झाले, तर दोन जवान, दोन स्थानिक महिला आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी असे पाच जण जखमी झाले. भारतीय जवानांनी कृष्णा घाटी आणि पूँच सेक्‍टरमध्ये झालेले घुसखोरीचे दोन्ही प्रयत्न उधळून लावत पाकिस्तानच्या अनेक चौक्‍या उद्‌ध्वस्त केल्या. भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटी सेक्‍टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना एक जवान हुतात्मा झाला, तर पूँच सेक्‍टरमध्येही घुसखोरांना हुसकावून लावताना एक जवान हुतात्मा झाला, तर दोन जवान आणि एक महिला जखमी झाले. या दोन्ही ठिकाणी घुसखोरांना साह्य व्हावे, यासाठी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केला. कृष्णा घाटी येथील चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानाची ओळख पटली असून, शीख रेजिमेंटचे जवान गुरुसेवक सिंग (वय 23) असे त्यांचे नाव आहे. पूँच येथे हुतात्मा झालेल्या जवानाची ओळख पटली असून, नायक राजेंद्र नारायण तुकपारे असे त्यांचे नाव आहे. ते महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. जखमी झालेल्या महिलेचे नाव सलीमा अख्तर असे असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक नितीन कुमारही गोळीबारात जखमी झाले असून, त्यांच्या लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत उखळी तोफांनी मारा केला. ही चकमक अद्यापही सुरू आहे. तुपारेंच्या गावावर शोककळा चंदगड- मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील जवान राजेंद्र नारायण तुपारे हुतात्मा झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्याने दुपारी त्यांच्या नातेवाइकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिली. ही बातमी समजताच गावावर दुःखाचे सावट पसरले. दुपारपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यांचे पार्थिव गावाकडे कधी आणणार, याबाबत कुटुंबीय आणि ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत लष्कराच्या मुख्यालयाशी संपर्क साधून माहिती घेत होते. 2002 ला बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राजेंद्र बेळगाव येथे मराठा लाइट इंफन्ट्रीत भरती झाले. दहा वर्षापूर्वी गावातील पोलिसपाटील जोतिबा गडकरी यांच्या द्वितीय कन्या शर्मिला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नी आणि मुले आर्यन (वय 7) व वैभव (5) या मुलांसह काही काळ त्यांच्या बरोबरच होते; परंतु सीमेवर कार्यरत झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून पत्नी बेळगाव येथे विजयनगर भागात राहू लागल्या. त्यांचे एकत्र कुटुंब असून, वडील शेतकरी, तर आई गृहिणी आहे. एक भाऊ शेती करतात, तर दुसरा भाऊ शिक्षक म्हणून नोकरी करतो. सहा महिन्यांपूर्वी राजेंद्र गावाकडे आले होते. हरहुन्नरी स्वभावाचा तरुण म्हणून त्यांची गावात ओळख होती. सुटीला आल्यानंतर आपल्या परिचयातील प्रत्येक व्यक्तींना ते आवर्जून भेटत असत. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. गावच्या सुपुत्राला वीर मरण आल्याचा अभिमान आणि दुःख, असे वातावरण होते. सैन्यात नोकरी करणाऱ्या राजेंद्र यांना शेतीची आवड होती. निवृत्तीनंतर शेतीच करण्याचा त्यांचा मानस होता. दरम्यान, त्यांचा तो सुटीचा काळ शेवटचा ठरला.

No comments:

Post a Comment