Total Pageviews

Tuesday 7 August 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि रामचंद्र प्रतिष्ठानच्यावतीने कारागृहातील बंदिवानांसाठी एक स्तुत्य उपक्रमतो म्हणजे बंदिवानांसाठी स्वा. वि. दा. सावरकरांच्या जीवनविषयावर निबंधस्पर्धा.-TARUN BHARAT



स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान कारागृहात असताना आपल्या सहबंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवून त्यांच्यातून अनेक देशभक्त तयार केलेकारागृहातून बाहेर पडल्यानंतर अनेक बंदिवानांनी सावरकरांचे विचारत्यांचे कार्य देशामध्ये अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंतपोहचवण्याचे कार्य करताना दिसत आहेतअसेच कार्य आपणही करावेअसा विचार मनात रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या मनातआलाकारागृहांमधील पुरूष आणि महिला बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीस लागावी यासाठी त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरनिबंध स्पर्धा घ्यावी असे ठरविलेपरंतु अगोदर कुठेही जास्त वाच्यता  करता सलग सहा महिने शासकीय स्तरावर गृहविभागाचे सचिवअतिरिक्तसचिवकक्ष अधिकारीकारागृहाचे महासंचालकविशेष महानिरीक्षक यांच्याकडे त्यांनी सतत पाठपुरावा केलात्यांना या निबंधस्पर्धेची निकड आणिराष्ट्रीय कार्यातील उपलब्धता समजावून सांगितलीकारागृहाची सुधारणाबंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती आणि पुनर्वसन यांची निकड समजावण्यासाठीअनेक प्रयोग केलेएक दिवस असा उजाडला कीअशोक शिंदे यांना प्रयत्नात यश मिळालेमहाराष्ट्र कारागृहाच्या पुणे मुख्यालयाचे अतिरिक्तमहासंचालक डॉविठ्ठल जाधव यांचा दूरध्वनी आला आणि त्यांनी काही अटींच्या अधीन राहून हा उपक्रम राबविण्याची संमती दिली आणि शुभेच्छादिल्या.  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका ही आनंदाची बातमी समजल्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीयस्मारक’ आणि ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ यांच्या स्वयंसेवी संस्थेने हा उपक्रम महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये राबवावा यावर शिक्कामोर्तब झाले आणि कार्यालासुरुवात झालीया कार्याला स्वामिनी सावरकर आणि स्नेहलता साठे यांचे आशीर्वाद लाभलेत्यांनी मनापासून या उपक्रमाचे स्वागत केले आणिमार्गदर्शनही केलेस्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या उपक्रमाला पाठिंबा देऊन योग्य त्या सूचना केल्यातसेच कार्यवाह राजेंद्र वराडकरयांना समन्वय साधण्यास सांगितलेत्यानुसार स्वामिनी सावरकरस्नेहलता साठे यांच्या मार्गदर्शनानुसार बैठका होत होत्यात्यातून विषयांचीनिवडग्रंथनिवडसूचना-नियम या सर्व गोष्टी साकारत गेल्या आणि मंदाकिनी भटराजेंद्र वराडकरअशोक शिंदेमुकुंद गोडबोले यांनी परिश्रमपूर्वकप्रत्येक कारागृहांना भेटी देऊन तेथील कारागृह प्रमुखांशी चर्चा केलीदेशात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्याबाबतीत साकारला गेला.
 
महाराष्ट्रातील येरवडा मध्यवर्तीमुंबई मध्यवर्तीठाणे मध्यवर्तीनाशिक रोड मध्यवर्तीसातारा जिल्हाभायखळा आणि रत्नागिरी विशेष अशाकारागृहात ही निबंध स्पर्धा घेतली गेलीही स्पर्धा घेतली तरी कशी गेलीकारागृहांमधील पुरूष आणि महिला बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीसलागावी यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिलीकाही महिन्यांच्या अवधीनंतर कारागृहाला सोयीचा ठरेलअशा दिवशीग्रंथांच्या आधारे निबंधाचे विषय देऊन त्यावर बंदिवानांना लिहायला सांगितलेही स्पर्धा दि१२ एप्रिल २०१८ या दिवशी ठाणे मध्यवर्ती कारागृहापासूनसुरू झाली आणि दि मे २०१८ या दिवशी येरवडा मध्यवर्ती कारागृहात समाप्त झालीसर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाखूप दिवसांनी बंदिवानांच्याहाताला एक वेगळंच काम मिळाले होतेत्यांचे हात लिहिते झालेया स्पर्धेत केवळ मराठी भाषिकच सहभागी झाले नव्हतेतर मुस्लीमख्रिश्चनमहिला  पुुरूषही सहभागी झाले होतेमराठीहिंदीइंग्रजी अशा भाषांमध्ये स्पर्धकांनी निबंध लिहिलेप्रत्येक कारागृहात स्पर्धेच्यावेळी अशोक शिंदेयांच्यासोबत स्मारकाशी संबंधित असलेली व्यक्ती जात होतीस्पर्धेपूर्वी बंदिवानांशी सावरकरांच्या साहित्यावर  स्पर्धेविषयी मनमोकळ्या गप्पाकेल्यामुळे ही सर्व मंडळी आपलीच आहेतअशी भावना बंदिवानांच्या मनात दृढ होऊन त्यांच्यावरील दडपण दूर झाले आणि सावरकरांविषयी लिहायलाहात तयार झाले.
 
जवळ जवळ सर्व निबंध स्पर्धा १० मेपर्यंत संपल्याप्रथमच सुरू केलेल्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळालाकारागृहाचे अधीक्षककर्मचारी यांचेउत्तम सहकार्य मिळालेनंतर सुरू झाले परीक्षकांचे कामतसं म्हटलं तर निबंध वाचताना परीक्षकांचीच परीक्षा होतीनिबंधवाचन करून क्रमांकदेण्यात आलेया सर्व निबंधस्पर्धेत खूप छान गमती झाल्याअभिमान वाटावेअसे प्रसंग घडलेआपण काही चांगलं काम केलं याचा आनंदअधीक्षकांना बंदिवानांना आणि आम्हाला मिळालाकाही कारागृहातले अनुभव इथे सांगायलाच पाहिजेतनिबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकालाउत्तरपत्रिका सोडविण्यासाठी लेखन साहित्य देण्यात आले होतेस्पर्धा संपल्यावर त्यांनी ते परत द्यायचं होेतंएका कारागृहात आम्ही स्पर्धा घ्यायलागेलोत्यावेळी एका बंदिवानानी साहित्य ठेवून घेतले आणि सांगितले,”यापुढे कुठेही काही लेखन केलेतर मी हे साहित्य वापरेनत्याचा मलाअभिमान वाटेलमात्र ते लेखन साहित्य त्याच्याजवळ  ठेवता कारागृहाच्या अधीक्षकांजवळ देऊन ठेवलंत्यांच्याजवळून तुला हवे असेल तेव्हा मागूनघे असे प्रेमाने सांगितलेत्यावेळी त्याला खूप बरे वाटलेबंदिवानांना लिखाण करायला प्रत्येकाला पेन देण्यात आले होतेनिबंध लिहून झाल्यावरस्पर्धकांनी ते पेन आपल्याजवळच ठेवायचे होतेसर्वांना ते ऐकून आश्चर्य वाटलेत्यातल्या एका बंदिवानांनी विचारले, “खरचं हे पेन आम्ही घेऊनजायचं?”   आमचा प्रतिनिधी म्हणाला,  “होहे पेन आता तुमचे झाले.”  पेनावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ असे कोरले होतेत्यामुळेत्या बंदिवानांनी एखादे ‘पदक’ किंवा ‘बिल्ला’ आपल्या शर्टाला लावून मिरवावेतसे ते पेन आपल्या शर्टाच्या बटणाला लावले आणि त्याचे अनुकरणइतरही काही बंदिवानांनी केलेखरोखरच किती कमी काळात हा बदल त्यांच्यात झाला होता!  आणखीन एक प्रसंग तो मजेशीरच होताबंदिवान लिहीतहोतेअगदी त्यांचे लिहिते हात ‘मोकाट’ सुटले होतेआपणाला केवळ सावरकरांवर लिहायचे एवढेच त्यातील एकाच्या डोक्यात होतेत्यामुळे दिलेलीउत्तरपत्रिका पूरत नव्हतीमग ‘पुरवणी’ (सप्लीमेंटमागितलीतीही पुरली नाहीमग दुसरी पुरवणी मागितलीत्याचा हा प्रकार बघून दुसर्याबंदिवानालाही स्फुरण चढलेत्यांनेही पुरवणी मागितलीआम्हाला तो प्रकार पाहून आनंद झालानंतर त्याला अधीक्षकांनी विचारले,  “तू कायलिहिलस तरी काय एवढे?”  त्यावर तो काय म्हणाला माहीत आहेतो म्हणाला, “खूप दिवसांनी लिहायला मिळालेखूप आनंद झालाजे आठवलंतेलिहीत गेलो.” विषयपृष्ठमर्यादाअक्षरव्याकरण याचा विचार  करता लिहिणार्या या बंदिवानाला खरोखरच पारितोषिक हवे होते काखूपदिवसांनी हातात पेन मिळाले आणि त्याचे मन मोकळे झाले होते!
 
काही बंदिवानांनी आमचे प्रतिनिधी परत जात असताना त्यांना वाकून नमस्कार केलाकारण काय तर आम्ही कोणताही भेदभाव त्यांच्यात केला नाहीत्यांना तुम्ही कोणता गुन्हा केलातुम्हाला किती दिवसांची शिक्षा झालीतुमच्या घरी कोण कोण असतेफक्त एवढंच सांगितले, ‘माणूस आहे तिथेचूक होणारचंतुम्ही वाईट वाटून घेऊ नकासुधारण्याचा प्रयत्न करामन शांत ठेवारागावर नियंत्रण ठेवाविचार करायला शिका आणि मुंबईत यालतेव्हा स्मारकात जरूर याफक्त कुठून आलात ते सांगाआमच्याशी मोकळेपणाने बोला.” असे बोलल्यामुळे त्यांनाही खूप बरे वाटलेअधीक्षकांनाआम्ही सर्वजण म्हणालो,”त्यांना लिहिण्यावाचून अडवू नकालिहू द्याबघून का होईना पण लिहितात हेच खूप!”  आमचा पहिलाच प्रयत्न होताआम्हाला हेच हवे होतेअनुभवांचे गाठोडे मोठे व्हायला लागले तसा आमचा उत्साह वाढू लागला.  उत्तरपत्रिका लिहून झाल्यावर काही बंदिवान प्रश्नविचारीत होते. “आम्ही निबंधस्पर्धेचा निकाल लागण्यापूर्वी सुटलोतर आम्हाला निकाल कसा कळणार?”  “आम्ही यशस्वी ठरलो नाही तरी आम्हालाप्रमाणपत्र देणार का?” “मुंबईला आलोतर तुम्हाला कुठे भेटायचे?”  “इथून सुटल्यावर काय करता येईल?”  असे एक ना अनेक प्रप्रश्नतिथेजाणारा आपला प्रतिनिधी त्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देऊन सर्व बंदिवानांना आश्वासक करून कारागृहातून बाहेर पडत होताप्रत्येकाला वेगवेगळेअनुभव येत होतेस्मारकात आल्यावर प्रत्येकाच्या चेहर्यावर एखादा मोठा पराक्रम गाजवून आल्याचा आनंद दिसायचाया स्पर्धेचे फलित कायकारागृहातील प्रत्येक बंदिवानाच्या मनात हीच भावना असेल-  सावरकर निबंध स्पर्धेमुळे आम्हाला कारागृहात सावरकर नावाचा देव भेटलाआम्हीवाचायला लागलोआम्ही सामुदायिक वाचनही करायला लागलोआम्ही विचार करायला लागलोआम्ही एकमेकांशी चर्चा करायला लागलोआम्हीआमच्या मनाशी बोलायला लागलोआम्ही लिहायला लागलो.  ज्या हातांनी वाईट कृत्ये घडलीत्याच हातांनी आम्हाला लिहिते केलेकागदावरझरझर अक्षर उमटली आणि...
आम्ही पार बदलून गेलो!
आम्ही पार बदलून गेलो!
हा सावरकर वाङमयाचा स्पर्धायज्ञ इथेच संपणार नाहीयात बदल होत जाणारवाढ होत जाणारस्पर्धक वाढणारग्रंथ वाढणारकारागृह वाढणारआणि सावरकर वाङ्मयाबरोबर त्यात क्रांतिकारकांच्या माहितीचा समावेश होणार.  यापुढील वर्षात मागील वर्षांची सर्व कारागृहे असणारच आहेतशिवाय या वर्षात तिहारविदर्भमराठवाडामध्यप्रदेशकर्नाटकगुजरात यांचाही समावेश असेलव्याप वाढणार आहे पण तुमच्या सर्वांची साथआणि आशीवार्द असल्यावर तसेच कारागृहांचे सहकार्य मिळाल्यावर हे स्पर्धेचे ‘शिवधनुष्य’ पेलायला बळ मिळणारच याची खात्री आहे.
-मंदाकिनी भट

No comments:

Post a Comment