Total Pageviews

Thursday, 9 August 2018

पाकमधील नव्या सरकारपुढील आव्हाने महा एमटीबी 08-Aug-2018

इमरान खान लवकरच पाकच्या पंतप्रधानपदी आरुढ होण्याची चिन्हे आहेतत्यांच्या नवीन सरकारला सर्वप्रथम आर्थिक संकटांचा आणित्यानंतर अमेरिका-चीन संबंधांचाही पुनर्विचार करावा लागेलत्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
 
पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसतेनवे सरकारजेव्हा केव्हा सत्तारुढ होईलतेव्हा त्यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर उभा असेलहे नक्कीचयेणाऱ्या सरकारला एका बाजूला अंतर्गत सुधारणांवर लक्षकेंद्रीत करावे लागेलतर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सतत बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीमध्ये आपल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे निर्वाहन करण्यावरहीजोर द्यावा लागेलपाकिस्तानमधील यापूर्वीच्या सरकारांचे आतापर्यंतच्या इतिहासावरून धोरणविषयक काही स्थायीभाव असल्याचे आपल्यालापाहायला मिळतेयाभोवतीच इथल्या सरकारच्या काऱ्याप्रणालीची रचना झालेली आहेजी काऱ्याप्रणाली सरकार बदलले तरी थोड्याफार प्रमाणातबदलतेपण उर्वरित आराखडयाचा चा तसाच्या तसाच राहतोपरंतुआता काळाच्या बरोबरीने जिथे समस्या वा अडचणीही वेगवेगळ्यासततबदलणाऱ्या असताततिथे त्यांच्या सोडवणुकीच्याउपाययोजनांच्या सरकारी प्रतिसादात बदल होणे हेदेखील स्वाभाविकच आहेअशाच प्रकारेघरगुतीप्रादेशिक आणि वैश्विक स्तरावरील पाकिस्तानची अनेक द्विधावस्थेतील वा दोन दगडांवर पाय ठेवणारी धोरणे आता नव्या सरकारसमोरएका नव्या रूपात उपस्थित होतील आणि त्यांच्याप्रती सरकारची धोरणे त्यांना यशस्वी अथवा अयशस्वी सिद्ध करतीलवर्तमानातच पाकिस्तानमध्येहोऊ घातलेल्या सरकारसमोर कितीतरी मोठ्या समस्या उपस्थित झाल्या आहेतज्याच्याशी सामना करणे अपरिहाऱ्या आहे.
 
अमेरिका आणि चीनशी संबंध
 /११ हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला पाठिंबा देण्याबरोबरच पाकिस्तानने आपला स्वार्थ साधण्याचे कामदेखील मोठ्याकौशल्याने केलेएकीकडे पाकिस्तानने तालिबानविरोधात अमेरिकेला मदत केल्याचे दाखवलेपण त्याचवेळी देशांतर्गत मात्र तालिबानलाच नैतिकआणि सामरिक समर्थन देणे सुरूच ठेवलेयातूनच पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत गेला२०१३ साली नवाझ शरीफसत्तेवर विराजमान झाल्यानंतर पाकिस्तान तर चीनच्या गटात निर्धास्तपणे उभा राहिलापरंतुअफगाणिस्तानमधील संघर्षाच्या दृष्टीनेपाकिस्तानची सामरिक स्थिती पाहताअमेरिकेलाही पाकिस्तानपासून फारकत घेता आली नाही.  सद्यस्थितीत पाकिस्तानच्या नव्यासरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे अमेरिका आणि चीनबरोबरच्या संबंधांमध्ये संतुलन साधणेअमेरिका पाकिस्तानचा कित्येकवर्षांपासूनचा एक खंदा समर्थक आणि जोडीदार राहिल्याचे चित्र दिसते१९७९ साली झालेल्या अफगाणिस्तानमधील मुजाहिदीन युद्ध आणि त्यानंतर२००१ साली अफगाणिस्तानच्या तालिबान शासनाविरोधात अमेरिकेला केलेल्या सहकार्याच्या बदल्यात पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात फायदा झालापरंतुपाकिस्तानकडून ज्यावेळी दहशतवादालाच सरकारी धोरणाचे रूप दिले गेलेत्यावेळी पाकिस्तानचे अमेरिकेबरोबरचे संबंध अधिकच ताणले गेलेआणि ही गोष्ट डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अधिक ठळकपणे समोर आलीत्यानंतर अमेरिकसोबतच्या आपल्या बिघडत्या संबंधांमुळेझालेली हानी भरून काढण्यासाठी पाकिस्तान थेट चीनच्या गटात सामील झालाइथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कीचीन फक्त दक्षिण आणिदक्षिण-पूर्व आशियाच नव्हेतर संपूर्ण जगातच अमेरिकेच्या सामरिक हितांशी स्पर्धा करणारा देश म्हणून समोर आला आहे आणि आज पाकिस्तानत्याच चीनच्या पाठिंब्यावर फुशारक्या मारताना दिसतो२०१४ पासून पाकिस्तान आणि चीनदरम्यानचीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर(सीपेकसारख्या महत्त्वाकांक्षी आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काऱ्या सुरू झालेएकीकडे हा पाकिस्तान-चीनदरम्यानच्या एकानव्या युगाच्या उदयाचा आरंभबिंदू होतातर दुसरीकडे या कारणास्तव पाकिस्तान-अमेरिकेचे आधीच बिघडलेले संबंध अधिकच ताणले गेलेपरंतुअसे असले तरी पाकिस्तान आणि चीनमधील संबंध फक्त ‘मधुर आहेतअसे नव्हेत्यातही चढउतार आहेतचसीपेक हे त्याचे सर्वात मोठेउदाहरणसीपेक प्रकल्पाचा आरंभी खर्च ४६ अब्ज डॉलर इतका अपेक्षित होताजो आज वाढून ६० अब्ज डॉलरच्याही पुढे गेला आहेत्यामुळेसाहजिकच पाकिस्तानवरील कर्जाच्या ओझ्यातही प्रचंड वाढ झाली आहेपाकिस्तानची सध्याची नाजूक आर्थिक स्थिती पाहताया कर्जाच्यापरतफेडीची व्यवस्था आणि शक्यता जवळपास नाहीचअशा परिस्थितीत चिनी कर्जदाते आणि पाकिस्तान सरकारदरम्यान तणाव वाढण्याची शक्यताआहेज्याचा सामना नव्या सरकारला करावा लागेलशिवायअशा परिस्थितीत पाकिस्तान अमेरिका आणि चीनसंबंधी नेमके कोणते धोरण भूमिका घेईलहाही एक रंजक विषय आहे.
 
 
लष्करासोबतचे संबंध
पाकिस्तानचे शक्तीशाली लष्करज्याला ‘ एस्टॅब्लिशमेंट’ आणि त्याने केलेल्या उद्योगांमुळे नकारात्मक छटेत ‘डीप स्टेटच्या नावानेही ओळखलेजातेत्याने पाकिस्तानच्या ७१ वर्षांच्या इतिहासात निम्म्या कालखंडात स्वतसत्ता राबवलीत्याचबरोबर इतरवेळीही पडद्यामागून लष्कराने केंद्रसरकारवरील आपली पकड कधी ढिली होऊ दिली नाहीआताची स्थिती तर अशी आहे कीइमरान खानचा पाकिस्तानच्या राजकारणातला उगमलष्कराच्या समर्थनामुळे झाल्याचे म्हटले जातेतर मग अशा स्थितीत हे निवडून आलेले सरकार त्याच्या कर्तव्यपूर्तीवेळी लष्करी हस्तक्षेपालाकशाप्रकारे हाताळतेहे पाहावे लागेलपाकचे अफगाणिस्तानविषयक धोरण ज्यात अमेरिका एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेदहशतवादविषयकएकूणच पाक सरकारचे धोरण आणि भारताशी संबंधया मुद्द्यांवरून लष्कर आणि सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी पडू शकतेयाव्यतिरिक्त सध्याकित्येक प्रकरणात गोत्यात आलेल्या जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याबाबत नवे सरकार कोणते धोरण अवलंबतेहाही एक वादाचा मुद्दा ठरू शकतोकारणलष्कर आपल्या माजी प्रमुखाविरोधात आणि त्याचवेळी सशस्त्र बलाच्या अन्य वरिष्ठ सदस्यांविरोधात कोणत्याही प्रकारच्या कारवाईचासाहजिकच विरोधच करेलजो पाकमधील नव्या नागरी सरकारबरोबर वादाचा विषय ठरू शकतो.
 
 
आर्थिक संकटाचे काळ ढग
गलितगात्र अर्थव्यवस्थेचे चाक रुळावर आणण्याचे सर्वात मोठे तात्कालिक आव्हान पाकमधील आगामी सरकारसमोर असेलपाकिस्तान सध्यास्वत:च्या सर्वात वाईट आर्थिक संकटाला कसाबसा सामोरा जात आहेपाकिस्तानमध्ये परकीय गंगाजळी सतत घटत असून सध्या तर तो दहा अब्जडॉलरच्याही खाली गेला आहेयातून पाकिस्तानच्या केवळ एका महिन्याच्या आयातविषयक गरजांची पूर्ती होऊ शकते. (जुलैमध्ये भारताची परकीयगंगाजळी मात्र ४०५ .१७ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती.) नव्या सरकारसमोर परकीय कर्ज हेदेखील एक आव्हान आहेसीपेक आणि संबंधितप्रकल्प पूर्णपणे विदेशी कर्जावर आधारित आहेतत्यामुळे डोक्यावरील कर्ज चुकवण्यासाठी नवीन कर्ज घेऊन पाकिस्तान कर्जाच्या गहन दुष्टचक्रातपुरता फसला आहे१२ जुलैला पाकिस्तानचे काळजीवाहू अर्थमंत्री शमशाद अख्तर यांनी असेही सांगितले होते की, “सध्या देशाच्या कर्जाशी जीडीपीचेप्रमाण ७२ टक्के आहेजे या वर्षाखेरीस ७४ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.” अख्तर यांनी दावा केला की, “मे २०१८ पर्यंत पाकिस्तानचे एकूण सार्वजनिककर्ज १९९ अब्ज होतेयातील १३४ अब्ज डॉलर कर्ज घरगुती (देशांतर्गतस्वरूपाचे होतेतर उर्वरित विदेशी कर्जाच्या रूपात होते.” पाकिस्तानसमोरवाढता चलन फुगवटा हीदेखील एक मोठी समस्या  वासून उभी आहेजागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार स्थिर बाजार मूल्यांवर पाकिस्तानच्यासकल घरगुती उत्पादनाची वाढ आर्थिक वर्ष २०१८ मध्ये जिथे  . टक्के होतीतिथे चलन फुगवटा जुलैमध्ये  . टक्क्यांच्यावर नोंदला गेली. ‘पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार जुलै २०१७ मध्ये पाकिस्तानच्या चलन फुगवट्याचा दर  . टक्के होताजो जुलै २०१८मध्ये  .८३ टक्के झालायातून पाकमधील चलन फुगवट्याची वाढ अतिशय तीव्र असल्याचे स्पष्ट होते.
 
 
पाकिस्तानचा व्यापारी तोटा जुलै २०१७ ते मे २०१८ या काळात ३४ अब्ज डॉलरच्याही पलीकडे गेला आहेपरतफेडीच्या संतुलनाची स्थितीही अतिशयचिंताजनक झाली आहेपाकिस्तानच्या चालू खात्यातील तोटा (सीएडी . टक्के (आर्थिक वर्ष २०१८ अब्ज डॉलरआणि राजकोषीय तोटा  .टक्क्यांच्या स्तरावर आहेज्यातून पाकिस्तानच्या बिकट आर्थिक स्थितीचे संकेत मिळतातपाकिस्तानी रुपया आजघडीला आशिया खंडात सर्वातवाईट प्रदर्शन करणारे चलन ठरले आहेया चलनाने नुकतीच प्रति डॉलर १३२ रुपये या स्तरावर गटांगळी खाल्लीपाकिस्तानला अशा वाईट स्थितीतआंतरराष्ट्रीय मुद्राकोषाकडून ‘बेल आऊट पॅकेजची मागणी करणे सर्वाधिक उपयुक्त उपाय ठरू शकतेपणआंतरराष्ट्रीय मुद्राकोषदेखील एकाआवश्यक अटीवरच कर्ज देतोती अट म्हणजे मितव्ययिता मानकांच्या पालनावर दिलेला जोरयात सार्वजनिक खर्चात कपात करावी लागतेमात्रतीकेल्यास पाकिस्तान मंदीच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतोदुसरीकडे अमेरिकेने अशा कोणत्याही ‘बेलआऊट पॅकेजला विरोध केला आहेपाकिस्तानची निम्मी लोकसंख्या कर भरणा करत नाहीया देशाचे करांशी असलेले जीडीपीचे प्रमाण केवळ ११ . टक्के आहेजे जगात सर्वात कमीआहेआर्थिक वर्ष २०१८ मध्ये पाकिस्तानचा दारिद्य्ररेषेखालील दर  . टक्के होताजो आर्थिक वर्ष २०१३ मध्ये  . टक्के होतातरीही देशातली ४०टक्के लोकसंख्या दारिद्य्ररेषेखाली राहतेज्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोक दररोज दोन डॉलरपेक्षाही कमी कमाई करून आयुष्य जगतातपाकिस्तानमध्ये जवळपास ४० टक्के लोक असे आहेतजे वाचू आणि लिहूही शकत नाहीतपाकिस्तानमध्ये ऊर्जेची कमतरता ही आणखी एक मोठीसमस्या आहेवीज आणि नैसर्गिक वायू क्षेत्रांना व्यवस्थित करण्यासाठी नव्या सरकारला मोठे प्रयत्न करावे लागतीलऊर्जा संकटावर मातकरण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत आराखड्याच्या प्रकल्पांना अर्थपुरवठा करून सुदृढ करण्याचा पर्याय  उपायही नव्या सरकारला शोधावेलागतीलयाचबरोबर पाकिस्तानमधील पिण्याच्या पाण्याचे संकट सतत वाढतच आहेसध्या पाकिस्तान पाण्याची कमतरता असलेल्या जगातीलमोठ्या क्षेत्रमधील एक देश झाला आहेनव्या सरकारसमोर पेयजलाची व्यवस्था करणे हेदेखील एक मोठे काम असेल.
 
केंद्र-राज्य संबंध
पाकिस्तानमध्ये केंद्रासह राज्यांमध्येही नव्या सरकारची स्थापना होते आहेपाकिस्तानच्या केंद्र सरकारचे राज्य सरकारशी ताळमेळ करून चालणे तसेपाकिस्तानमध्ये एक अवघडच कामखासकरून तेव्हा जेव्हा ही सरकारे निरनिराळ्या पक्षांची असतातपाकिस्तानमध्ये २०१३ -१८ या काळात केंद्रातसत्ताधारी असलेल्या नवाझ शरीफ सरकारचे सिंधमधील पीपीपी सरकारबरोबर सतत वादविवाद होत असतयात प्रामुख्याने सिंध विधानसभेद्वारेकेंद्राच्या काही विशिष्ट कायद्यांना आपल्या प्रांतातून हटवण्याचा मुद्दा समाविष्ट आहेयातून केंद्र आणि राज्यातील संबंधातील दुरावा अधिकठळकपणे अधोरेखित होतोपाकिस्तान संवैधानिकरित्या एक फेडरेशन वा परिसंघ आहेज्यात राज्यांना पुरेशी स्वायत्तता दिलेली आहेपणपाकिस्तानच्या केंद्र सरकारला लष्कराने समर्थन दिलेले असल्याने या प्रांतिक स्वायत्ततेचे पालन करणे अवघड होऊन जातेयातूनच राज्य आणिकेंद्रामध्ये सतत शीतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होतेआजघडीला सिंधमध्ये जलसंकटपाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तानभागात पाकिस्तानद्वारे संवैधानिक स्थितीमध्ये परिवर्तनाचे प्रयत्नबलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी संघर्ष आणि खैबर पख्तुनख्वामध्ये फाटाराज्याचे सामिलीकरण यातून हीच स्थिती अधिक गंभीर झाली आहे.
 
 
निष्कर्ष-
पाकिस्तानच्या नव्या सरकारसमोर जिथे एका बाजूला अंतर्गत सुधारणांचे मोठे आणि दुष्कर काऱ्या समोर आहेतिथे दुसऱ्या बाजूला वर्तमानपरिस्थितीमध्ये दहशतवादाला दिलेला आश्रय आणि अशा सर्वप्रकारच्या आरोपांमध्ये ‘एफएटीएफच्या ‘ग्रे लिस्टमध्ये सामील झाल्यानंतर वैश्विकसमुदायात एकटा पडण्याच्या आणि सोबतच देशाच्या चालू खात्यातील तोट्यात होणारी वाढपरकीय चलनसाठ्याचे झालेले आकुंचनपाकिस्तानच्यामुद्रा विनियम दरात सतत होत असलेली घट आणि चीनकडून सतत वाढत्या कर्जासाठी असलेल्या दबावामुळे वर्तमान स्थिती अधिकच चिघळली आहेयावरून पाकिस्तान आता स्वतःच तयार केलेल्या जाळ्यात अडकत चालल्याचे दिसतेअशा स्थितीत आगामी सरकारसमोर जनतेच्या अपेक्षा पूर्णकरण्याचे एक अवघड काऱ्या असेलत्याचबरोबर आघाडी सरकारमधील सहयोगी पक्षांशी मिळतेजुळते घेणे आणि सोबतच लष्कराशी ताळमेळ साधणेही वर्तमान सरकारच्या स्थायित्वाची अनिवाऱ्या अट असेल.

No comments:

Post a Comment