Total Pageviews

Tuesday 7 August 2018

मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद


उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराच्या

 चार जणांना वीरमरण आले आहे. यात मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले 

आहेत. मेजर राणे हे मुंबईतील मीरा रोड येथील रहिवासी होते. दहशतवादी घुसखोरी 

करण्याचा 

प्रयत्न करत होते. यावेळी कारवाई करताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले  आहे. मेजर राणे हे मुंबईजवळील मीरारोड येथील रहिवासी होते. मेजर कौस्तुभ राणे मिरारोडच्या शीतल नगरमध्ये हिरल  इमारतमध्ये आपल्या कुटुंब बरोबर राहत होते. सहा र्षी पूर्वी राणे सैन्यात दाखल झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान ,बहीण, पत्नी आणि दोन वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे.
गुरेज हे एलओसीजवळ आहे. श्रीनगरपासून 123 किलोमीटरवर गुरेज सेक्टर आहे. मंगळवारी रात्री लष्कराचा एलओसीवर संशयित हालचाली दिसल्या. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. लौसर, सरदारी, नुशेरानर आणि दुरमत या पाकव्याप्त काश्मीरमधल्या गावांमधून दहशतवादी आपल्या हद्दीत घुसले.
या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या 36 राष्ट्रीय रायफल्स आणि  9 ग्रेनेडियर्स यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. लष्करी माहिती नुसार, अजूनही अनेक दहशतवादी या क्षेत्रात लपलेले आहेत. असं म्हटलं जातंय की, 2003च्या कराराच्या पहिल्यांदाच या क्षेत्रात पाकिस्तानसाठी मोर्टर्स वापरले जात आहेत. पाकिस्तानाच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी  भारतीय सैनिक देखील सतत गोळीबार करत आहेत.


हशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कारवाई करताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले असून यामध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे. मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे मीरा रोड येथील शीतल नगर भागात असलेल्या हिरल सागर मध्ये वास्तव्य करत होते. २९ वर्षीय कौस्तुभ राणे यांच्यासह मनदीप सिंग रावत, हमीर सिंग, विक्रम जीत सिंग हे जवानही शहीद झाले. घटनास्थळावरून दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. शोधकार्य सुरू आहे. दहशतवाद्यांशी लढताना आज भारतमातेने आपले चार पुत्र गमावले आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतात मोठा घातपात घडवून आणण्याच्या इराद्याने घुसखोरी करणाऱ्या २ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. मात्र यावेळी अतिरेक्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत भारताच्या चार जवानांना वीरमरण आलं असून त्यात मेजर के.पी. राणे यांचाही समावेश आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरासह आसपासच्या परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी मध्यरात्री उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या गुरेज सेक्टरमध्ये आठ अतिरेकी घुसखोरी करत असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यावेळी सुरक्षा दलाने या आठही अतिरेक्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत या अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला आणि जवानांवर मोर्टारही डागले. दोन्हीकडून गोळीबार सुरू झाल्याने त्यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले. यावेळी २ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली ही चकमक अद्याप सुरूच असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

No comments:

Post a Comment