देशसेवेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना राज्य सरकारने मरणोत्तर गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हा सैनिक अधिकारी प्रांजळ जाधव यांनी बुधवारी या पुरस्काराच्या सहा लाख रुपये रकमेचा धनादेश मेजर राणे यांच्या पत्नी कनिका यांच्याकडे मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी सुपूर्द केला. यावेळी कौस्तुभ राणे यांचे वडील प्रकाशकुमार राणे हेही उपस्थित होते.
काश्मीरमधील गुरेज क्षेत्रामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईदरम्यान मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते.
दरम्यान, मंगळवारी मिरा भाईंदर शहराचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शहीद राणे यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे २५ लाख रुपयांची रक्कम देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याची माहिती मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता दिली. त्याशिवाय, मिरा भाईंदर महापालिकेतर्फे राणे कुटुंबियांना रुपये ११ लाख रक्कम देण्याचा प्रस्ताव महापौरांनी पालिका आयुक्तांना दिला आहे
सीआरपीएफला सर्वाधिक शौर्य
पदके
काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना प्राणाची
आहुती देणार्या दोन केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना सर्वोच्च
राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त
केंद्र सरकारने आज विविध राज्यांतील ९४२ पोलिसांना आणि निमलष्करी दलाच्या जवानांना
पोलिस पदक जाहीर केले.
काश्मीरमधील कॉन्स्टेबल शरीफ-उद-दीन गनी आणि हेड कॉन्स्टेबल मोहंमद ताफील यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलिस पदक घोषित करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि नक्षलविरोधी अभियानादरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील ८९ जवानांना पोलिस पदक जाहीर करण्यात आली.
केंद्रीय राखीव पोलिस दलाला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक पोलिस पदके आहेत, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
सीआरपीएफनंतर सर्वाधिक पोलिस पदके जम्मू-काश्मीर पोलिस दलाला मिळाली आहेत. जम्मू-काश्मीरमधील ३७ कर्मचार्यांना शौर्य पदके प्राप्त झालीत. त्यानंतर ओडिशा पोलिसांना ११, सीमा संरक्षण दलास (बीएसएफ) १०, महाराष्ट्र पोलिसांना आठ, छत्तीसगड पोलिसांना सहा राष्ट्रपती पोलिस पदके प्राप्त झाली आहेत. यंदा १७७ राष्ट्रपती पोलिस पदके देण्यात आली आहेत, असे सरकारने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. काश्मीर खोर्यामध्ये दहशतवाद विरोधी कारवायांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वाधिक शौर्य पदके या भागातील पोलिस दलांना प्राप्त झाली. या मोहिमा सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिस, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सैन्याद्वारे संयुक्तरीत्या राबविल्या जातात, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. यंदा एकूण ६७५ विशेष सेवा पदक आणि ८८ सेवा पदक पोलिसांना देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
१० बांगलादेशींना अंदमानमध्ये अटक
पोर्ट ब्लेअर : उत्तर अंदमान बेटावर बनावट कागदपत्रे तयार करून भारतात अवैधरीत्या राहात असलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना दिग्लीपूर भागातून सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. प. बंगालचे नागरिक असल्याचा दावा या लोकांनी केला आहे. तथापि, त्यांनी सादर केलेले रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:
Post a Comment