शहीद औरंगजेब यांच्यासह १४ जणांना 'शौर्य चक्र'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम |
अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या करण्यात आलेले शहीद जवान
औरंगजेब यांना 'शौर्य चक्र' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार
आहे. औरंगजेब यांच्यासह सैन्य दलातील आणखी १४ जवानांना 'शौर्य
चक्र' देऊन गौरविले जाणार असून एका जवानाला मरणोत्तर 'कीर्ती चक्र' आणि दोन पोलिसांना राष्ट्रपती पदकाने
सन्मानित केले जाणार आहे.
उद्या बुधवारी स्वातंत्र्य दिनी सीआरपीएफच्या पाच आणि सैन्य दलातील १४ जवानांना शौर्य चक्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं. शौर्य चक्राने गौरविण्यात येणाऱ्या जवानांमध्ये रायफलमन शहीद औरंगजेब आणि मेजर आदित्य कुमार यांचा समावेश आहे.
१५ जून रोजी ईद साजरी करण्यासाठी घरी जात असताना अतिरेक्यांनी औरंगजेब यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांनी औरंगजेब यांची गोळ्या घालून हत्या केली होती. एका टॅक्सी चालकाने खबर दिल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन करत औरंगजेब यांचा मृतदेह शोधून काढला होता. औरंगजेब यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती.
उद्या बुधवारी स्वातंत्र्य दिनी सीआरपीएफच्या पाच आणि सैन्य दलातील १४ जवानांना शौर्य चक्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं. शौर्य चक्राने गौरविण्यात येणाऱ्या जवानांमध्ये रायफलमन शहीद औरंगजेब आणि मेजर आदित्य कुमार यांचा समावेश आहे.
१५ जून रोजी ईद साजरी करण्यासाठी घरी जात असताना अतिरेक्यांनी औरंगजेब यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांनी औरंगजेब यांची गोळ्या घालून हत्या केली होती. एका टॅक्सी चालकाने खबर दिल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन करत औरंगजेब यांचा मृतदेह शोधून काढला होता. औरंगजेब यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती.
यांना मिळणार शौर्य चक्र
>> औरंगजेब ( मरणोत्तर)
>> लेफ्टनंट कर्नल अर्जुन शर्मा
>> मेजर पवन गौतम
>> मेजर आदित्य कुमार
>> कॅप्टन कनिंदर पाल सिंह
>> कॅप्टन जयेश राजेश वर्मा
>> नायब सुभेदार अनिल कुमार दहिया
>> नायब सुभेदार विजय कुमार यादव
>> हवालदार कुल बहादूर थापा
>> हवालदार जावेद अहमद भट्ट
>> गनर रंजीत सिंह
>> रायफलमन निलेश भाई
>> रायफलमन जयप्रकाश ओरांव
कीर्ती चक्र
>> शिपाई ब्रह्मपाल सिंह (मरणोत्तर)
>> औरंगजेब ( मरणोत्तर)
>> लेफ्टनंट कर्नल अर्जुन शर्मा
>> मेजर पवन गौतम
>> मेजर आदित्य कुमार
>> कॅप्टन कनिंदर पाल सिंह
>> कॅप्टन जयेश राजेश वर्मा
>> नायब सुभेदार अनिल कुमार दहिया
>> नायब सुभेदार विजय कुमार यादव
>> हवालदार कुल बहादूर थापा
>> हवालदार जावेद अहमद भट्ट
>> गनर रंजीत सिंह
>> रायफलमन निलेश भाई
>> रायफलमन जयप्रकाश ओरांव
कीर्ती चक्र
>> शिपाई ब्रह्मपाल सिंह (मरणोत्तर)
थोडे भान ठेवा
काही लोक किती गेंडय़ाची कातडी पांघरलेले संवेदनाहीन असतात, याचा प्रत्यय हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या घराशेजारी हाकेच्या
अंतरावर आमदार, महापौर यांच्या उपस्थितीत डीजेचा दणदणाट करत
एका नगरसेवकाने जल्लोषात केलेल्या वाढदिवसावेळी नागरिकांना आला. हा हुतात्मा
सैनिकाचा अवमानच आहे. भारतीय सैन्यातील एक युवा अधिकारी शत्रूशी लढताना हुतात्मा
झाल्याचे कळल्यावर गेल्या ३ दिवसांपासून मुंबई आणि परिसर शोकाकुल आहे. मात्र
देशवासीयांच्या रक्षणासाठीच स्वत:च्या प्राणांची आहुती देणा-या लढवय्या
सैनिकाविषयी किंचितही कृतज्ञता नसणा-यांना लोकप्रतिनिधी कसे, का म्हणावे? याचा जाब जल्लोषात सहभागी झालेल्या
प्रत्येकाला खडसावून विचारलाच पाहिजे. देशावर आणि हाकेच्या अंतरावर राहणा-या राणे
कुटुंबावर अत्यंत दु:खद प्रसंग कोसळला असताना धांगडधिंगा करण्याचा भ्याडपणा केला
जाऊ शकतो, तर ‘मी असे का केले’?
याविषयी बोलताना वाचा बसण्याचे कारण असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
हा प्रकार मेजर राणे यांच्या घरी येणा-या प्रत्येकाने पाहिला आहे. एकजण चुकत आहे,
तर त्याला त्याची तत्काळ जाणीव करून देणारे कुणीच नाही. याचे
आश्चर्य वाटते. याचाच थेट अर्थ असा की, अशा ठिकाणी उपस्थित
राहिलेले सर्वच एकाच माळेचे मनी होते, असे म्हणता येईल.
सीमेवर कित्येक सैनिक हुतात्मा होत आहेत. म्हणूनच तर त्यांच्या
बलिदानानंतरही असले सोहळे करण्यासाठी धजावले जात आहे. अतिरेक्यांशी अहोरात्र
संघर्ष करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम हे अंगी भिनलेले असावे लागते. याची वानवा असलेले काय करतात
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वाढदिवस साजरा करण्याचा लांच्छनास्पद प्रकार याकडे
अंगुलीनिर्देश होईल. प्रसारमाध्यमांनी या अपप्रकाराविषयी तोंडसुख घेतले पाहिजे आणि
मस्तवालपणा अंगी भिनलेल्यांची मस्ती उतरवली पाहिजे. प्रसारमाध्यमांत ती क्षमता
आहे. त्याचा १०० % उपयोग ते करतील का ? आम्ही कसेही वागलो,
काहीही बोललो तरी आमचे कोण काय वाकडे करणार? या
नशेची धुंदी अशा प्रकारांमागे असते. थोडक्यात नागरिकांना गृहीत धरले जाते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नागरिक आणि मी वेगळे आहोत. ही भावना
ज्यांच्या मनात सखोलपणे बिंबलेली आहे, तेच असे करू शकतात,
असे ठामपणे वाटते.
घडल्या निर्लज्ज प्रकाराविषयी समाजातून सडकून टीका झाल्यावर माफीचे
नाटक पार पडल्यास ते उपयोगाचे आणि विश्वासार्ह असणार नाही. अशा कृतघ्नांना कुणीही
माफ करणार नाही. मी आणि माझे सुख या चौकटीत राहणा-यांना राष्ट्रसेवा, लोकसेवा काय कळणार? किंबहुना तेवढी त्यांची पात्रताच
(लायकी) नाही. एखाद्याच्या सुखात सहभागी होण्यास मिळाले नाही तरी चालेल. मात्र
त्याच्यावरील कठीण प्रसंगात हातातील सर्व कार्य सोडून तत्काळ धावून जाता आलेच
पाहिजे. तोच खरा ‘माणूस’ होय. आधी
माणूस होणे शिकण्याची नितांत आवश्यकता असलेल्यांकडून प्रसंगावधान राखत आदर्श
वर्तनाची अपेक्षा करणे म्हणजे अतिशयोक्तीच म्हणता येईल. गाढवांना गुळाची चव कशी
कळणार ? ज्यांची नितीमत्ताच लयास गेलेली आहे, अशांना येत्या १५ ऑगस्टला राष्ट्रध्वजास मानवंदना करण्याचा नैतिक अधिकार
आहे का? कुठे संकुचित वृत्तीचे प्रदर्शन करणारे निष्ठूर आणि
कुठे देशाच्या रक्षणासाठी आणखी मुले असती तर तीही दिली असती, असे धोरोदत्तपणे म्हणणारे मेजर राणे यांचे पिता. सैनिकांचे पालकच असे बोलू
शकतात. कारण त्यांनी देश रक्षणासाठी पुत्र अर्पण करण्याचा केलेला त्यागच असे
बोलण्याचे धाडस देतो. धाडसी माणसांचेच विचार, कार्य कायम
स्मरणात राहाते. त्यांच्याच गोष्टींपासून प्रेरणा घेतली जाऊन देशासाठी नेत्रदीपक
कार्य करण्यासाठी पुढील पिढी सिद्ध होत असते. अशी पिढी हाच देशाचा आधारस्तंभ आहे
आणि यास्तवच नागरिक, विशेषत: लोकप्रतिनिधी सुरक्षित आहेत.
देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक हीच देशाची बहुमूल्य संपत्ती आहे.
लोकसेवा ही कायम पाय जमिनीवर ठेवूनच करावी लागते. साधी राहणी, उच्च विचार, असा आचार असणारेच लोकोपयोगी येतात.
मात्र ज्यांचे विचारच बुरसटलेले आहेत असे खुळचट, बुळचट
दु:खावर डागण्या देण्याचे दुष्कर्म अगत्यपूर्वक करतात. अशांना समाज तांदळातील
खडय़ाप्रमाणे बाजूला केल्याविना शांत बसणार नाही. यात शंका नाही. खडे हे बाजूलाच
करण्यासाठी असतात. त्यांचा पोषकतत्त्व म्हणून उपयोग नसल्याने त्यांना फेकूनच
द्यावे लागते. ‘शितावरून भाताची परीक्षा होते’. बेशिस्त लोकप्रतिनिधी आणि त्यांचे सहकारी कठीण प्रसंगी (सैनिक हुतात्मा
झाल्याचे माहीत असूनही) बेभानपणे वागू शकतात, तर अन्य वेळी
ही मंडळी किती आत्मीयतेने लोकसेवा करत असतील ? असा प्रश्न
कुणाला पडल्यास चूक ते काय? बेशिस्तपणा पाहता कुणालाही असा
प्रश्न पडणारच!
सैनिक हुतात्मा झाल्यावर त्याचे पार्थिव घरी पोहोचवेपर्यंत त्या
सैनिकाचा मान सैन्याकडून कुठेही ढळू दिला जात नाही, ते कार्य किती
शिस्तबद्ध, अचूकपणे पार पाडले जाते हे वेळोवेळी
वृत्तवाहिन्यांवर देश पाहत असतो. सैन्याची ती शिस्त जपण्याचा प्रयत्न हुतात्मा
सैनिकाच्या परिसरातील नागरिकही आदरपूर्वक करत असतात. हे करत असताना प्रत्येकाचे
अंत:करण भरून येते. शत्रूविषयी आग मनामध्ये जळत असते. अशा भरल्या अंत:करणानेच
हुतात्मा सैनिकाला कायमचा निरोप दिला जातो. राष्ट्ररक्षण करून समाजऋण फेडणा-या
आमच्या सैनिकांना विनम्र अभिवादन
No comments:
Post a Comment