आपल्या देशातील कायदे हे वोटबँकेशी निगडित आहेत, असा समज त्यामुळे दृढ होऊ लागला
आहे. देशातील बहुतांश समाजांना आपल्या वोटबँकेची ताकद कळल्याने ते आता सर्वच
पक्षांना व सरकारांना आपल्या तालावर नाचवित आहेत, झुकवित
आहेत, असेच चित्र स्वातंत्र्यानंतर सतत दिसून आले आहे.
देशाच्या प्रगतीसाठी व एकसंधतेसाठी हे चित्र धोकादायक आहे. न्यायालयाचा निर्णय
बासनात गुंडाळण्याची वा त्याला न जुमानण्याची प्रवृत्ती यामुळे वाढीस लागण्याची
भीती आहे. सध्या देशातील सामाजिक वातावरणावर एक नजर टाकली तर असे दिसून येते की
प्रत्येक समाज आपल्या लाभासाठी सरकारला व सर्वसामान्यांना वेठीस धरत आहे. हे
कुठेतरी थांबायला हवे. आपल्या देशात भारतीय म्हणून कुणी विचार करताना दिसत नाही.
प्रत्येक जण धर्म, जाती, जमाती,
पंथ यामध्ये विभागला गेला आहे. हा प्रकार असाच फोफावत राहिला तर
देशात सामाजिक व राजकीय अराजक माजण्याचा धोका आहे. ऍट्रॉसिटी कायदा सौम्य करण्याचा
निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदर्शकुमार गोयल यांनी दिला होता. केंद्र
सरकारने सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुनर्विचार याचिकाही दाखल केली होती.
No comments:
Post a Comment