Total Pageviews

Saturday, 4 November 2017

साताऱ्यातील कराडवाडीचे जवान सुभाष कराडे शहीद

साताऱ्यातील कराडवाडी (तालुका खंडाळा) येथील जवान सुभाष लाला कराडे हे अरूणाचल प्रदेशात देशसेवा बजावत असताना शहीद झाले. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यावर सगळे जवान तंबूत बसले होते. त्याचवेळी थंडीपासून ऊब देणाऱ्या बुखारीचा स्फोट झाला. यामुळे कराडे आणि इतर जवान बसलेल्या तंबूला आग लागली. या घटनेत कराडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जवान सुभाष कराडे यांच्या मृत्यूची बातमी साताऱ्यातील खंडाळा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.  सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कराडवाडी येथील जवान सुभाष कराडे हे २००१ मध्ये भारतीय सैन्य दलात सहभागी झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कराडवाडी आणि अंदोरी या ठिकाणी झाले. तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल अंदोरी येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण लोणंदमध्ये झाले. जवान सुभाष कराडे मागील १६ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. २०१६ मध्ये त्यांची भारतीय सैन्य दलातील सेवा संपली होती. मात्र त्यांनी आणखी दोन वर्षे देशसेवा करण्याचा निर्णय घेतला

No comments:

Post a Comment