Total Pageviews

Thursday, 2 November 2017

७० टक्के व्यक्तींना व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता- उन्हात जाणे सर्वोत्तम-निखिल निरखी

,Maharashtra Times | Updated: Nov 3, 2017,


अलीकडे मैदानी खेळ झपाट्याने कमी झालेले असतानाच, सगळीकडेच ‘इनडोअर सोसायटी’ तयार होत आहे. अशी ‘इनडोअर सोसायटी’ काही प्रमाणात नक्कीच तयार झाली आहे, असे सांगताना बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण म्हणाले, ‘देशातील वेगवेगळ्या राज्यात, शहरांमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, ‘ड’ची कमतरता ही तब्बल ४० ते ७० टक्के व्यक्तींमध्ये आढळून आली आहे. ‘न्युट्रिएंट’ पाक्षिकामध्ये तर ही कमतरता तब्बल ७० ते १०० टक्क्यांपर्यंत पोचल्याचे म्हटले आहे. भारत उष्णकटिबंधात मोडतो, तरीदेखील देशातील ‘ड’च्या कमतरतेची स्थिती गंभीर आहे. ‘ड’च्या कमतरतेमुळेच लहान मुलांमध्ये वाढ व्यवस्थित न होणे, हाडे ठिसूळ होणे, हाडे वाकडी होणे, मुडदुस (रिकेटस्) हा आजार होऊ शकतो. प्रौढांमध्ये ‘ऑस्टिओमलेशिया’, ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणजेच हाडे ठिसुळ होऊ शकतात, प्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते. संशोधनानुसार मधुमेह, हृदयरोग, क्षयरोग, जंतुसंसर्ग, ऑटो इम्यून डिसॉर्डर आदी आजार-विकार झालेल्यांमध्येही ‘ड’ जीवनसत्नाची कमतरता आढळून आली आहे. त्यामुळेच आता मधुमेह किंवा हृदयरोग किंवा अस्थिव्यंगोपचारांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचा समावेश करण्यात येतो. प्रगत देशांमध्ये दुधामध्येच ‘ड’ जीवनसत्वाचा समावेश करण्यात आला आहे. भारतात आयोडिनयुक्त मीठाप्रमाणे ‘ड’ जीवनसत्वाचा समावेश होणे गरजेचे आहे, असेही डॉ. चव्हाण म्हणाले.

‘मसल पेन’, ‘क्रँम्स’मागेही ‘ड’

‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेचे वेगवेगळे परिणाम वेगवेळ्या वयामध्ये दिसून येतात. केवळ हाडांचे विकार नव्हे तर मसल पेन, क्रँम्स यामागेही ‘ड’ची कतरता असू शकते. एवढेच नव्हे तर ‘ड’च्या कमतरेमुळे नैराश्याची (डिप्रेशन) समस्यादेखील असू शकते, असे आंतरग्रंथीविकारतज्ज्ञ डॉ. हेमंत फटाले यांनी सांगितले. ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेचा फटका कुपोषित बालकांमध्ये जास्त तीव्रपणे दिसून येतो, असे निरीक्षण घाटीतीलअस्थिरोग विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. अनिल धुळे यांनी नोंदविले.सर्व प्र
उन्हात जाणे सर्वोत्तम

आहारातून दहा टक्क्यांपेक्षा जास्त ‘ड’ जीवनसत्व मिळू शकत नाही. त्यातही शाकाहारी आहारातून फार कमी प्रमाणात जीवनसत्व मिळते. त्यामुळेच थेट सूर्यप्रकाशापासून किंवा औषधांपासून ‘ड’ जीवनसत्व मिळवावे लागते. या जीवनसत्वामध्ये ‘डी-थ्री’ महत्त्वाचे असून, ‘डी-थ्री’ मिळवण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंतचे उन सर्वोत्तम ठरते. सनस्किन न लावता २० ते ४० मिनिटे उन्हात राहिल्यामुळे ‘डी-थ्री’ मुबलक प्रमाणात मिळते. त्यासाठी गोऱ्या व्यक्तीला २० मिनिटे, गव्हाळ व्यक्तीला ४० मिनिटे, तर काळ्या-सावळ्या व्यक्तीला जास्त ‘मेलॅनिन’मुळे ४० मिनिटांपेक्षा जास्त सूर्यप्रकाश अंगावर घेणे गरजेचे ठरते, असेही डॉ. फटाले म्हणाले

No comments:

Post a Comment