अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला महत्त्वाकांक्षी आशिया दौरा नुकताच सुरू झाला आहे. जानेवारीमध्ये अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदा आशियाच्या दौर्यावर आले आहेत. या 12 दिवसांच्या दौर्यादरम्यान ते पाच देशांना भेटी देणार आहेत. काही बहुराष्ट्रीय संघटनांच्या वार्षिक परिषदांमध्येही त्यांची उपस्थिती असणार आहे. ‘आसियान’ या संघटनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एक विशेष बैठक होणार आहे. या बैठकीला ट्रम्प उपस्थित राहणार आहेत. याखेरीज एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन संघटनेच्या एका बैठकीलाही ते उपस्थित राहाणार आहेत. ट्रम्प यांच्या या दौर्यामध्ये प्रामुख्याने जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन या देशांचा समावेश होतो. हा दौरा पाच नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी जपानला भेट दिली आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि चीन व त्यानंतर व्हिएतनाम, फिलिपाईन्स असा त्यांच्या दौर्याचा कार्यक्रम आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दौरा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या दौर्याचा मुख्य उद्देश हा उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांच्याकडून सातत्याने दिल्या जाणार्या धमक्या आणि उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव, आशिया प्रशांत क्षेत्रातील युद्धजन्य परिस्थिती यांची पार्श्वभूमी आहे. त्याचप्रमाणे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या 19 व्या परिषदेत शी जिनपिंग यांची पुनर्निवड करण्यात आली असून, तेथील राज्यघटनेमध्ये माओनंतरचे सर्वोच्च प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून झिनपिंग यांची नोंद करण्यात आली आहे; हीदेखील पार्श्वभूमी ट्रम्प यांच्या या दौर्याला
आहे.
दुसरीकडे, आज फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम हे चीनच्या विस्तारवादी धोरणाने घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांचे चीनबरोबरचे संबंध बिघडलेले आहेत. चीनच्या दौर्यानंतर या देशांना आश्वस्त करण्याचे कामही ट्रम्प करणार आहेत. चीनच्या विस्तारवादाला घाबरू नका, अमेरिका तुमच्या बरोबर आहे, हा विश्वास या देशांना ट्रम्प यांच्याकडून दिला जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचे पूर्वसुरी असणार्या बराक ओबामा यांनीही त्यांच्या कारकिर्दीत असा दौरा केला होता. या दोन्हींमागचा उद्देश स्पष्ट असून, आशिया प्रशांत क्षेत्रात अमेरिकेला स्वतःचा प्रभाव वाढवायचा आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा संपूर्ण दौरा हा सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.
आहे.
दुसरीकडे, आज फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम हे चीनच्या विस्तारवादी धोरणाने घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांचे चीनबरोबरचे संबंध बिघडलेले आहेत. चीनच्या दौर्यानंतर या देशांना आश्वस्त करण्याचे कामही ट्रम्प करणार आहेत. चीनच्या विस्तारवादाला घाबरू नका, अमेरिका तुमच्या बरोबर आहे, हा विश्वास या देशांना ट्रम्प यांच्याकडून दिला जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचे पूर्वसुरी असणार्या बराक ओबामा यांनीही त्यांच्या कारकिर्दीत असा दौरा केला होता. या दोन्हींमागचा उद्देश स्पष्ट असून, आशिया प्रशांत क्षेत्रात अमेरिकेला स्वतःचा प्रभाव वाढवायचा आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा संपूर्ण दौरा हा सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण स्वीकारले आहे. गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत ट्रम्प यांनी अनेक आंतरराष्ट्रीय करारांतून माघार घेण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आशिया खंडात चीनचा प्रभाव वाढू लागला आहे. परिणामी, अनेक देश घाबरले आहेत. त्यामुळे येथे अमेरिकेला एक आश्वस्त वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. या दौर्याच्या माध्यमातून हीच गोष्ट ठसवण्याचे प्रयत्न ट्रम्प करतील. आणखी एक मुद्दा म्हणजे ट्रम्प यांनी मध्यंतरी जपान आणि दक्षिण कोरिया यांनी स्वसंरक्षणाचा विचार करावा, स्वतःचे अणुबॉम्ब तयार करावेत. अमेरिका त्यांचे रक्षण करणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्याचबरेबर ओबामांच्या काळात आखल्या गेलेल्या पीव्हॉट टू एशिया या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेचे 20 टक्के नौदल हे आशिया प्रशांत क्षेत्रात ठेवले जाणार होते; पण त्यासंदर्भातही पुनर्विचार करण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले होते. ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप या बहुराष्ट्रीय करारातूनही त्यांनी माघार घेण्याचे सूतोवाच केले होते. अलीकडेच ‘युनेस्को’तून अमेरिकेने माघार घेतली आहे. या सर्वांमुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अमेरिका आपल्या पाठीशी राहील का, अशा स्वरूपाच्या भीतीचे वातावरण आशिया खंडातील देशांमध्ये होते. अशा परिस्थितीत हा दौरा आखण्यात आला आहे. या दौर्यातून आशिया खंडाच्या संरक्षणाविषयीची अमेरिकेची बांधीलकी पुन्हा एकदा दिसून येत आहे. उत्तर कोरिया हे तात्कालिक कारण असले तरीही या दौर्याच्या माध्यमातून अमेरिकेने पुन्हा एकदा आशिया खंडाकडे लक्ष वळवले आहे. अलीकडेच अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियाविषयीचे अमेरिकेचे धोरणही नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यात भारताला त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले आहे . या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण, अमेरिकेने माघार घेतल्यामुळे आशियातील सत्तासमतोलाच्या राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण होणार आहे ती पोकळी चीन भरून काढण्याची शक्यता आहे. ही बाब भारतासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अमेरिकेचे लक्ष पुन्हा एकदा आशिया खंडाकडे वळणे, अमेरिकेने आशिया प्रशांत क्षेत्रात पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करणे हे भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारत या दौर्याला पाठिंबाच देईल. ट्रम्प यांच्य दौर्यामुळे उत्तर कोरियाला चिथावणी मिळणार आहे. त्यातून उत्तर कोरियाची अरेरावी वाढू शकते. किम जोंग पुन्हा अणू परीक्षण करू शकतो आणि त्यातून जगाला आव्हानही देऊ शकतो.
त्यामुळे येणार्या काळात काय घडते, हे पाहावे लागेल. कदाचित, या दौर्यामुळे आशिया प्रशांत क्षेत्रावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment