Total Pageviews

Monday 16 May 2011

IGP SURESH KHOPADE DESERVES TO BE HEARD

आधी निवडणूक लढवा, नंतर बदल घडवा
-
Tuesday, May 17, 2011 AT 03:00 AM (IST)
पुणे - 'पोलिस यंत्रणा कालबाह्य झाली आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) सुरेश खोपडे यांना वाटत असेल, तर त्यांनी निवडणूक लढवून यंत्रणा सुधारावी,'' असा "सल्ला' राज्याचे पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांनी सोमवारी त्यांना दिला. "पुणे दहशतवादाचे केंद्र झाल्याची माहिती खोपडे यांना होती, तर ती त्यांनी आधीच का दिली नाही,' असा सवालही त्यांनी या वेळी केला.

सुरेश खोपडे यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात सोमवारी सकाळी, "पोलिस यंत्रणा सध्या कालबाह्य झाली आहे', असे सांगितले. तसेच, "पुणे हे दहशतवाद्यांच्या हालचालींचे केंद्र होत आहे; "अल्‌ कायदा'ची बैठकही पुण्यात झाली होती,' असे वक्तव्यही केले होते. आज सायंकाळी पाषाण येथील पोलिसांच्या बिनतारी संदेश विभागाच्या कार्यक्रमासाठी पारसनीस आले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांचे लक्ष खोपडे यांच्या वक्तव्याकडे वेधल्यावर त्यांनी वरील विधान केले. या वेळी पारसनीस यांनी, "खोपडे यांनी हे वक्तव्य कोणत्या आधारावर केले,' असा सवालही केला.

पारसनीस म्हणाले, 'दहशतवादी कारवाया जगभर होत आहेत. त्या पुण्यातही "जर्मन बेकरी'च्या रूपाने आपण पाहिल्या आहेत. या अनुषंगाने खोपडे यांनी पुण्यातील हालचालींविषयीचे विधान केले असावे. पण त्यांनी केलेले विधान फार मोठे आहे.''

नक्षलवाद्यांच्या विरोधात 'ऍलर्ट''नक्षलवाद्यांना संघटन वाढवायचे असून त्यासाठी त्यांनी शहरांकडे मोर्चा वळविला आहे. म्हणूनच आम्ही सर्व शहरांमध्ये दक्षतेचा इशारा दिला आहे. दहशतवादविरोधी पथकही (एटीएस) त्यांच्या मागावर आहे. अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या उपाययोजना सध्या आम्ही आखत आहोत,'' असे पारसनीस यांनी, पुणे जिल्ह्यात नक्षलवाद्यांना पकडण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर सांगितले

No comments:

Post a Comment