Total Pageviews

Tuesday, 2 August 2016

राष्ट्रभक्तीचे मुखवटे SAMNA

राष्ट्रभक्तीचे मुखवटे Monday, August 01st, 2016 मनोहर पर्रीकरांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले ते म्हणजे, ‘‘एका अभिनेत्याच्या पत्नीने मध्यंतरी देशाच्या विरोधात उद्धट विधान केेले, पण नागरिकांनीच त्यांना उत्स्फूर्त उत्तर दिले. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्ध काही बोलणार्यांचना लोकच धडा शिकवतील!’’ मनोहर पर्रीकर लाखमोलाचेच बोलले, पण सिनेमातील लोक बोलतात म्हणून धडा शिकवायचा ते सोपे असते, पण राष्ट्रभक्तीचे मुखवटे लावून जे लोक तीच विधाने करतात त्यांची कशाने पूजा करायची? बुरहान वाणीचा खात्मा हा अपघात असेल तर सध्याची राज्यव्यवस्था हीसुद्धा भयंकर अपघात आहे असे लोकांनी ठरवले तर काय उत्तर द्याल? तसे होऊ नये अशी आमची इच्छा आहे. राष्ट्रभक्तीचे मुखवटे हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गर्जना केली आहे. श्रीनगर किंवा दिल्लीत बसून देशाच्या विरोधात बोलण्याची हिंमत तरी कशी होते? कोणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे देशाच्या विरोधात बोलणार्यांणना धडा शिकवलाच पाहिजे. अशी कडक भूमिका मांडल्याबद्दल आम्ही संरक्षणमंत्र्यांचे अभिनंदन करीत आहोत. पुण्याची भूमी ही राष्ट्रभक्तांची व खासकरून क्रांतिकारकांची आहे. राष्ट्रभक्तीची पहिली राष्ट्रीय सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनीच केली होती व चापेकर बंधूंपासून राजगुरूपर्यंत एकापेक्षा एक सरस हुतात्मे याच भूमीने राष्ट्राच्या चरणी कमलपुष्पाप्रमाणे अर्पण केले. त्यामुळे याच पुण्यनगरीत येऊन देशाच्या संरक्षणमंत्र्यांच्या रक्ताने उसळी मारली असेल तर ते सगळ्यांंसाठी अभिमानास्पद आहे. पर्रीकरांच्या गर्जनेचा संबंध कश्मीर खोर्याितील सध्याच्या चिघळलेल्या परिस्थितीशी आहे. पाकपुरस्कृत दहशतवादाशी आपले सैन्य रोज झुंज देत आहे व हौतात्म्याच्या वेदीवर आमचे जवान चढत असताना सैनिकांनाच गुन्हेगार ठरवून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर ते राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा करीत आहेत. म्हणूनच पर्रीकरांनी अत्यंत परखडपणे सांगितले की, ‘‘सैनिकांच्या कारवाईचा सन्मान केला पाहिजे. देशाच्या एखाद्या भागात लष्कराला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेमले असताना त्यामध्ये इतरांनी लुडबूड करण्याची काहीएक आवश्यकता नाही. देशाचे लष्कर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सक्षम आहे. लष्कर कार्यरत असताना सैनिकांवर कोणी हल्ला करीत असेल तर त्याला प्रत्युत्तर हे द्यावेच लागेल. त्याला विरोध करण्याची गरज नाही!’’ मनोहर पर्रीकरांनी लोकभावनेलाच हात घातला, पण सैनिकांचे मनोधैर्य कोण खच्ची करीत आहे व देशविरोधी वक्तव्यांची ‘बांग’ कोण देत आहे याबाबत संरक्षणमंत्र्यांनी अधिक परखडपणे बोलायला हवे. दुसरे कोणीच बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याने संरक्षणमंत्र्यांनी हे कार्य हाती घेतले तरच त्यांची गर्जना सार्थ ठरेल. विषय कश्मीरचाच घेतला तरी सैनिकांच्या भूमिकेवर प्रश्नीचिन्ह निर्माण करणारे कोण आहेत? खतरनाक अतिरेकी बुरहान वाणी हा सुरक्षा दलांच्या चकमकीत मारला गेला. त्याबद्दल पाकिस्तानने ‘मातम’ करणे समजण्यासारखे आहे, पण कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबाबाईंनी आधी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि आता तर जम्मू-कश्मीरचे ‘भाजप’ उपमुख्यमंत्री श्रीमान निर्मलसिंह यांनाही हुंदके फुटल्याने संरक्षणमंत्र्यांपुढील काम कठीण झाले आहे. ज्या अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी आमचे जवान जंग जंग पछाडीत होते त्या बुरहान वाणीचा खात्मा हा एक निव्वळ अपघात होता अशी मुक्ताफळे उधळून भाजपाई निर्मलसिंहांनी झेलमचा प्रवाहच गढूळ केला. एकतर बुरहान वाणीची ही तरफदारी आहे व शहीद जवानांचा अपमान आहे. देशविरोधी बोलणार्यां ना धडा शिकवायलाच हवा असे कडक भाषेत बोलणार्याप संरक्षणमंत्र्यांनाही हे आव्हान आहे. बुरहान वाणीचा खात्मा हा अपघात असेल तर आमच्या शूर जवानांनी हा अपघात घडवून आणल्याबद्दल त्या सर्वच जवानांच्या मर्दानगी व राष्ट्रभक्तीबद्दल देशाला अभिमान वाटतो हे आम्ही नमूद करतो. चकमकी सुरू असताना तेथे बुरहान वाणी आहे असे आधीच समजले असते तर त्यास सन्मानाने बाहेर काढून त्याच्या अतिरेकी अड्ड्यात पोहोचवले असते. त्याचे हारफुलांनी स्वागत केले असते. त्यास आमच्या जवानांनी शिरकुर्मा किंवा बिर्याणीचे ताट पोहोचवून तोफांची सलामी दिली असती, पण काय करणार? तेथे बुरहान वाणी आहे हे आमच्या जवानांना समजलेच नाही व त्यामुळे पाकिस्तानबरोबर कश्मीरातील बेगडी राष्ट्रभक्तांवरही ‘मातम मातम’ करण्याची वेळ आली हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या महावीरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. दारूची नशा वाईट, आता इतरही अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे; पण जे लोक बुरहान वाणीसारख्या अतिरेक्यांच्या बाजूने पोपटपंची करतात ते तथाकथित राष्ट्रभक्त जणू पाकिस्तानची पहिल्या धारेची हातभट्टी ढोसून आपल्या कश्मीरात गुळण्या टाकीत आहेत. सत्तेची नशा भल्याभल्यांना गिधाडे बनवते ती अशी. मनोहर पर्रीकरांनी सैनिकांच्या स्वाभिमानाचा विषय काढला म्हणून आम्ही हे बोललो. मनोहर पर्रीकरांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले ते म्हणजे, ‘‘एका अभिनेत्याच्या पत्नीने मध्यंतरी देशाच्या विरोधात उद्धट विधान केेले, पण नागरिकांनीच त्यांना उत्स्फूर्त उत्तर दिले. काहींनी त्या अभिनेत्याच्या जाहिरातीमधील उत्पादनांवर बहिष्कार घातला, तर काही कंपन्यांनी त्याला अॅतम्बेसेडर पदावरून हटविले. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्ध काही बोलणार्यां ना लोकच धडा शिकवतील!’’ मनोहर पर्रीकर लाखमोलाचेच बोलले, पण सिनेमातील लोक बोलतात म्हणून धडा शिकवायचा ते सोपे असते, पण राष्ट्रभक्तीचे मुखवटे लावून जे लोक तीच विधाने करतात त्यांची कशाने पूजा करायची? बुरहान वाणीच्या हत्येचे समर्थन करून आमच्या जवानांची पाठ थोपटण्याची हिंमत दाखवणार्याव राज्यकर्त्यांची देशाला गरज आहे. बुरहान वाणीचा खात्मा हा अपघात असेल तर सध्याची राज्यव्यवस्था हासुद्धा भयंकर अपघात आहे असे लोकांनी ठरवले तर काय उत्तर द्याल? तसे होऊ नये अशी आमची इच्छा आ

No comments:

Post a Comment