Total Pageviews

Thursday 25 August 2016

दाऊदचा पत्ता मिळाला; पुढे काय? SAKAL

दाऊदचा पत्ता मिळाला; पुढे काय? SAKAL कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानातच वास्तव्य आहे, हे राष्ट्रसंघाच्या समितीने मान्य केले आहे. तेव्हा दाऊदला आता तरी भारतात आणले जाईल काय आणि त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्याला शिक्षा होईल काय, हा महत्त्वाचा प्रश्नण आहे. मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या भीषण बॉंबस्फोट मालिकेचा प्रमुख सूत्रधार आणि ‘अंडरवर्ल्ड डॉन‘ दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच वास्तव्य करत आहे, यावर संयुक्ति राष्ट्रसंघाच्या विशेष समितीने शिक्का मोर्तब केल्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा अखेर जागतिक स्तरावर उघडा पडला आहे. मात्र, ‘सव्वाशे करोड‘ भारतवासीयांसाठी या बातमीत ‘नवीन‘ असे काहीच नव्हते. गेली अनेक वर्षे दाऊद पाकिस्तानातच राहत आहे, हे भारतातील सर्वांनाच ठाऊक आहे. एवढेच नव्हे तर कराचीत गेलेल्या अनेक भारतीयांना ‘क्लिकफ्टॉन‘ या सागरतीराला लागून असलेल्या आलिशान वस्तीतील सौदी मशिदीजवळचे त्याच्या निवासस्थानाचे दूरवरून का होईना ‘दर्शन‘ही झाले होते. पाकिस्तान मात्र दाऊदचा ठावठिकाणा आपल्याला ठाऊकच नाही, असा पवित्रा घेऊन गेली दोन दशके हात झटकून मोकळा होत होता. त्यामुळे भारताने दिलेल्या दाऊदच्या एकूण नऊ पत्त्यांपैकी सहा पत्ते अचूक असल्याचा निर्वाळा संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीने दिल्याने आता दाऊदला आपल्या स्वाधीन करण्यासंबंधातील मागणीचा भारत अधिक जोमाने आणि ठामपणे पाठपुरावा करू शकतो, एवढ्यापुरतेच या बातमीचे महत्त्व नाही. दाऊदच्या संबंधात पाकिस्तानने घेतलेली भूमिका ही या दोन देशांमधील संबंधांतील कळीचा मुद्दा ठरत आली आहे. त्यामुळेच आता राष्ट्रसंघाच्या या निष्कर्षानंतर भारत-पाकिस्तान संबंधांना वेगळे वळण लागू शकते. दाऊद हा भारतासाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा गुन्हेगार आहे आणि त्याची कारणेही अनेक आहेत. दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात छोटे-मोठे गुन्हे सुरू करून हा एका पोलिस हवालदाराचा मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘डॉन‘ बनू शकला, हे केवळ पाकिस्तान व आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संघटनांनी त्याला दिलेल्या छुप्या पाठिंब्यामुळेच, हेही सर्वश्रुत आहे. ‘डोंगरी ते दुबई‘ असा प्रवास करून हा ‘डॉन‘ अखेरीस पाकिस्तानात जाऊन स्थिरावला. तरी त्याच्या या कारनाम्याचा कळसाध्याय हा मुंबईत 12 मार्च 1993 रोजी त्याने घडवून आणलेले भीषण बॉंबस्फोट हाच होता. त्यानंतर तो भारतातून कसा निसटू शकला, हाही खरे तर कळीचा प्रश्नघ असला, तरी मूळ मुद्दा हा मुंबापुरीत 1993 मध्ये त्याने मेमन बंधूंच्या मदतीने घडवून आणलेल्या बॉंबस्फोट मालिकेचाच आहे. या बॉंबस्फोटांत किमान 257 निरपराध नागरिकांना हकनाक बळी जावे लागले होते आणि हजाराहून अधिक जबर जखमी झाले होते. पण त्याहीपलीकडची बाब म्हणजे या बॉंबस्फोटांकडे भारतात दहशतवादाने टाकलेले ‘पहिले पाऊल‘ म्हणूनच बघावे लागते. 1993च्या आधी भारतात हिंसक घटना घडत असल्या, तरी 1993 मधील बॉंबस्फोटांच्या तुलनेत त्या अगदीच चिरपूट म्हणाव्या अशा असत आणि त्यामागे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कटकारस्थानांचे दुवे नसत. मात्र, अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने देशाच्या आर्थिक राजधानीत घडवून आणलेल्या या बॉंबस्फोट मालिकेनंतर केवळ मुंबईतच नव्हे, तर देशात अनेक ठिकाणी असे स्फोट होत राहिले आणि त्यांचा छडा आजतागायत कायद्याच्या अंतिम पातळीवर लागू शकलेला नाही. दाऊदचे ‘नेटवर्क‘ हे किती प्रभावी आहे, त्याचीच ही साक्ष आहे. अर्थात हे बॉंबस्फोट कोण घडवून आणतो आणि त्याला पाकिस्तान कसा हातभार लावत आहे, याच्या असंख्य बातम्या येऊनही पुढे काहीच होत नसे. त्यामुळे आता दाऊदचा थांगपत्ता अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर भारत आता हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळकपणे मांडून पाकिस्तानची दुटप्पी भूमिका उघड करू शकतो. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांनंतर त्या दशकाच्या अखेरीस दाऊदच्या ब्रिटनमधील काही मालमत्तांचा छडा लावण्यात भारतीय गुप्तचर यंत्रणा यशस्वी झाल्या होत्या. त्यानंतरही अनेक देशांतील दाऊदच्या मालमत्ता उघड झाल्या होत्या. आता पाकिस्तानमधील त्याचे पत्ते अचूक ठरल्यामुळे भारताबरोबरच संयुक्त राष्ट्रसंघालाही त्याबाबत काही पावले उचलावी लागणार आहेत. त्याचे कारण म्हणजे दाऊद हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृतपणे घोषित केलेला गुन्हेगार आहे. त्यामुळे आता भारताला संयुक्तं राष्ट्रसंघाबरोबरच आपल्या अन्य ‘दोस्त‘ राष्ट्रांवर दबाव आणून पाकिस्तानातून दाऊदला परत आणण्याबाबतची मोहीम अधिक तीव्र करता येऊ शकते. पाकिस्तानबरोबरच्या मैत्रीचे गेल्या दोन दशकांत सर्वपक्षीय राजकारण्यांनी केलेले दावे कसे पोकळ आणि फसवे होते, हेही संयुक्तो राष्ट्रसंघाच्या या निर्वाळ्यामुळे स्पष्ट झाले आहे. 1990च्या दशकात दाऊदला फरफटत भारतात आणण्याच्या वल्गना करणारा भारतीय जनता पक्षच सध्या केंद्रात सत्तेवर आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेपासून अन्य अनेक देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले आहेत. या पार्श्वंभूमीवर आता तरी दाऊदला भारतात आणले जाईल काय आणि त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्याला शिक्षा होईल काय, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्ना आहे. संयुक्ति राष्ट्रसंघाने दाऊदच्या पत्त्यांबाबत केलेल्या खातरजमेनंतर तमाम भारतीयांच्या मनात कुतूहल आहे ते एवढेच

No comments:

Post a Comment