स्पोर्टस्
अनेक अर्जुनांचा एकच द्रोणाचार्य
अनेक अर्जुनांचा एकच द्रोणाचार्य
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. सिंधूने जेंव्हा अंतिम फेरीत प्रवेश केला तेंव्हा सारा देशात आनंदात बुडाला. ट्विटर, फेसबूकवर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. पण जल्लोष सुरू असताना एक मनुष्य शांत बसून होता. सामना सुरू असताना हा मनुष्य सिंधूने पॉईंट गमावला तर तिला प्रोत्साहन देत होता, तिच्या बाजुने घोषणा देत होता.
हा शांत, संयमी मनुष्य म्हणजे पुलेल्ला गोपीचंद! सिंधूचा प्रशिक्षक. सिंधूचाच नव्हे तर देशात आज नावरुपाला आलेल्या बॅडमिंटन खेळाडुंचे कोच म्हणजे गोपीचंद होय.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन चँपियशिप जिंकलेले गोपीचंद अर्जुन पुरस्कार (१९९९), द्रोणचार्य पुरस्कार (२००९) आणि पद्मभूषण पुरस्कार (२०१४) असे सन्मान मिळवले आहेत. गोपीचंद एकेकाळी बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत ४ थ्या क्रमांकाचे खेळाडू होते.
वयाच्या १० व्या वर्षीपासून सिंधू बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेते. तेंव्हापासून गोपीचंद हेच तिचे प्रशिक्षक आहेत. सिंधू ही अत्यंत
लाजाळू मुलगी होती. सिंधूचे एका कणखर मुलीत रुपांतर करण्याचे सारे श्रेय गोपीचंद यांना जाते, असे सिंधूचे वडील रामन यांनी म्हटले होते.
साईना नेहवाल, किंदबी श्रीकांत, परूपल्ली कश्यप, प्रन्नोय कुमार हे सर्व खेळाडू गोपीचंद यांचेच शिष्य आहेत.
गोपीचंद स्वत: फार उशिरा या खेळात आले. जर लहान वयात सुरुवात केली असती तर त्यांना फार भव्य यश मिळवता आले असते. कोचिंगची व्यवस्था नाही आणि दुखापती यामुळे गोपीचंद यांच्यावर मर्यादा आल्या. पण त्यांनी स्वत: ॲकॅडमी सुरू करून बॅडमिंटनमध्ये भारतात हिरे घडवण्यास सुरुवात केली. बॅडमिंटनच्या ‘माईंड गेम’मध्ये गोपीचंद आज जगात नंबर १ चे प्रशिक्षक मानले जातात.
सिंधूला प्रशिक्षण देताना त्यांनी मैदानात जोरात किंचळण्याचे आणि आक्रम पोझिशन कशी घ्यायची याचेही प्रशिक्षण दिले आहे. भारतातील मुले ही फारच सुरक्षित वातावरणात वाढलेली असतात त्यामुळे असे प्रशिक्षण ही द्यावे लागते असे ते म्हणतात. खेळात तुमचा आक्रमकपणा विरोधी खेळाला बॅकफूटवर ढकलतो. सिंधूच्या उपांत्य फेरीतमधील सामन्यात तिचा हा आक्रमकपणा सहज नजरेस येत होता.
शांतपणे शिष्यांना घडवणारे गोपीचंद खरोखरच आज देशासाठी आदर्श ठरले आहेत
No comments:
Post a Comment