SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Monday, 8 August 2016
काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणं माहित असूनही जवान असहाय्य
काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणं माहित असूनही जवान असहाय्य
श्रीनगर, दि. 8 - काश्मीर खो-यातील हिंसा, लोकांचा वाढत असलेला रोष आणि लष्करी बळाचा वापर करण्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे दक्षिण काश्मीर परिसरात पोलीस आणि सेना हतबल झाली आहे. पोलीस आणि लष्करासमोर खूप सारी आव्हानं आहेत. हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीचा खात्मा केल्यापासून खो-यामधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. इतकंच नाही तर दहशतवाद विरोधी मोहिमांनाही जबर धक्का बसला आहे.
'लोकांच्या जमावात लपून उपस्थित राहणा-या दहशतवाद्यांची आमच्याकडे माहिती आहे. मात्र सद्यपरिस्थितीत आम्ही काहीच करु शकत नाही', असं खो-यात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा दलांनी सांगितलं आहे. खो-यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपले सुरु असलेले प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची भीतीही त्यांना आहे. काश्मीरमध्ये मिळत असलेल्या समर्थनामुळे गेल्या काही दिवसांत दक्षिण काश्मीरमधील अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी सभा आयोजित केल्या होत्या.
'आमच्यासाठी हा गंभीर विषय आहे. वाढत्या तणावामुळे एका प्रकारच्या जहालमतवादी गटाला जन्म दिला आहे. आता आम्हाला शुन्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अगोदर लोक जहालमतवाद्यांना दूर ठेवत होते, पण आता दहशतवाद्यांना समर्थन मिळत आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद विरोधी कारवाया करणं कठीण आहे', असं एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार गुलमर्ग आणि कुपवाडा सेक्टरमधून 120 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबासोबत इतर दहशतवाद्यांचाही समावेश आहे
कुपवाडा जिल्ह्यातील मचिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले असून, एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (सोमवार) दिली.
लष्करी अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, मचिल सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानुसार परिसरामध्ये दहशतवाद्यांविरोधात शोधमोहिम घेण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले. सुरक्षारक्षकांनी एका दहशतवाद्याला ठार केले. परिसर ताब्यात घेण्यात आला असून, दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहिम सुरू आहे. जम्मु काश्मीबर राज्यामध्ये सध्या असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वसभूमीवर भारताविरोधात आण्विक युद्ध करण्याची दर्पोक्ती हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्याी सईद सलाहुद्दीन याने केली आहे.
भारताविरोधात आता "चौथे युद्ध‘ अनिवार्य असल्याचा इशारा सलाहुद्दीन याने दिला आहे. काश्मीदरी जनता आता तडजोड करण्यास तयार नसल्याचे सांगत सलाहुद्दीन याने आता पाकिस्तान, उर्वरित जग आणि संयुक्ता राष्ट्रसंघाचा पाठिंबा नसला; तरी रक्तािच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढत राहण्याची प्रतिज्ञा काश्मिलरींनी घेतली असल्याचे म्हटले आहे.
"आझाद काश्मी रमध्ये आमचा तळ आहे. या बाजुच्या काश्मियरींकडून ती कथित नियंत्रणरेषा चिरडून टाकण्यासंदर्भातील घोषणा केली जाईल. त्यानंतर कोणतीही सीमारेषा नसेल, कोणतेही आंतरराष्ट्रीय नियम नसतील आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांचाही विचार केला जाणार नाही. यासाठी पाकिस्तानने पाठिंबा दिला; तर भारत व पाकिस्तानमध्ये आण्विक युद्ध होण्याची दाट शक्यतता आहे. मात्र आता काश्मिटरी जनता तडजोड करण्याच्या मनस्थितीत नसल्याने चौथे युद्ध नकीच होईल,‘‘ असे सलाहुद्दीन याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
जम्मु काश्मीपरमधील सध्याची अशांत परिस्थिती व यासंदर्भात भारत व पाकिस्तानमध्ये असलेला तणाव, या पार्श्वलभूमीवर सलाहुद्दीन याचे विधान अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.
काश्मीर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात देश द्रोही आहे हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तो पर्यंत तेथे कठोर धोरण घेता येणार नाही. बिचारी मुले, त्यांना नोकऱ्या नाहीत वगैरे करणे सांगून त्यांच्या दगड फेकीचे आणि बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब, तेजाब बॉम्ब यांचे समर्थन करणारी गांधीवादी घाण जो पर्यंत जनतेची दिशाभूल करत राहील तो पर्यंत सरकारला सुद्धा हि गोष्ट स्पष्ट पणे मांडून या देश द्रोह्यांना गोळ्या घालणे शक्य होणार नाही. रस्त्यावर जी मुले दंगा करायला येतात त्यांना शस्त्रे वापरून चिरडल्याशिवाय या असल्या मुलांचे दंगा करणे बंद होणार नाही. 15 टक्के जनता डोकेफिरू आहे पण बाकीच्यांना आपला व्यापार,उद्योग, शिक्षण चालवायचे आहे त्यांना पाठिंबा देऊन या 15 टक्के गुंडांना मारले तरच यात मार्ग निघेल. सध्याच्या बोट चेपे पद्धतीने, जे शांत आहेत त्यांना सुद्धा दम भरून रस्त्यावर उतरवले जात आहे.ते आपलेच नागरिक आहेत वगैरे नशेत राहण्यात काही अर्थ नाही.
548
पाकला जशास तसे उत्तर देण्याची वेळ
दहशतवादाला उघड प्रोत्साहन देणारा पाकिस्तान आगामी काळात भारतासाठी धोकादायक ठरू शकतो आणि त्यामुळे या देशाला खर्याम अर्थाने धडा शिकविण्याची वेळ आली आहे. अर्थात, यासाठी आपल्याकडच्या सर्व राजकीय पक्षांनी एकजुटता दाखविणे आवश्यक आहे. पाकिस्तान व चीन या देशांना आंतरराष्ट्रीय समुदायानेदेखील जाब विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे..
लोकशाही व्यवस्था केवळ नावापुरती उरलेल्या आणि इस्लामी कट्टरतावादाला बळी पडलेल्या पाकिस्तानने मागील काही काळापासून काश्मीर प्रश्नााची धग कशी वाढेल, यादृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. हाफिज सईद आणि सैयद सलालुद्दीनसारख्या दहशतवादी म्होरक्यांपासून वचकून राहणार्या् पाकिस्तान सरकारचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीदेखील काश्मीर प्रश्नारवर बेसूर गीत गाण्यास सुरुवात केली आहे. काश्मिरी लोकांमध्ये स्वतंत्र होण्याची नवी लहर आली आहे तसेच पाकिस्तानच्या विदेश धोरणाचा मुख्य पाया काश्मीर असल्याची मुक्ताफळे शरीफ यांनी अलीकडेच उधळली आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी बुरहान वानी याच्या खातम्यानंतर काश्मिरी जनतेमध्ये असंतोष वाढीस लागावा, यासाठी पाक आकाशपाताळ एक करीत आहे. दहशतवादाला उघड प्रोत्साहन देणारा पाकिस्तान आगामी काळात भारतासाठी धोकादायक ठरू शकतो आणि त्यामुळे या देशाला खर्याि अर्थाने धडा शिकविण्याची वेळ आली आहे. अर्थात, यासाठी आपल्याकडच्या सर्व राजकीय पक्षांनी एकजुटता दाखविणे आवश्यक आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या पाक दौर्याजनंतर काँग्रेसने दिलेली प्रतिक्रिया फारशी उत्साहवर्धक नव्हती. तर दुसरीकडे नितीशकुमार यांच्यासारख्या घोर मोदी विरोधकाने काश्मीर प्रश्नाीवर आम्ही केंद्र सरकारसोबत असल्याचे सांगून देशाचे हित सर्वोपरी असल्याचे अधोरेखित केले. पाकिस्तान व चीन या देशांना आंतरराष्ट्रीय समुदायानेदेखील जाब विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
देशाची फाळणी झाल्यापासून काश्मीर प्रश्नह कसा ज्वलंत राहील, किंबहुना त्याची व्याप्ती कशी वाढेल, याकडे पाकिस्तानचे लक्ष जास्त राहिलेले आहे. स्वतःच्या देशातील समस्या सोडविण्याऐवजी काश्मीरमध्ये कसे लोकांवर अन्याय सुरू आहेत, याचा पाढा पाकिस्तानी राजकारणी, तेथील लष्कराचे अधिकारी आणि खुलेआमपणे फिरणारे दहशतवाद्यांचे म्होरके वाचत असतात. भावना भडकाविणार्याप या प्रचारामुळे दहशतवादी संघटनांना भारतात शिरण्यासाठी युवकांची फौज मिळत असते, हे लक्षात घेतले पाहिजे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिद सईद याला पाक सरकारचे पूर्ण संरक्षण असल्याची बाब जगजाहीर आहे. याच पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये 9/11 हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेनला अमेरिकन सैन्याने घुसून मारले होते. दहशतवादाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेणार्याल पाकिस्तानला गृहमंत्री राजनाथसिंग यांनी त्यांच्या देशात जाऊन सुनावले, ही बाब निश्चिातपणे महत्त्वाची मानावी लागेल. आलेल्या पाहुण्याला कसे वागवायचे, याची चाडही नसलेल्या पाकने राजनाथ यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. राजनाथ यांच्या भाषणावेळी भारतीय प्रसारमाध्यमांना प्रवेश न देणे, भोजनाच्या कार्यक्रमाला पाक गृहमंत्र्यांचे अचानक गायब होणे अशा फालतू गोष्टी करून पाकने आपला खरा चेहरा पुन्हा एकदा दाखवून दिला.
मागील महिनाभरापासून काश्मीर धगधगत आहे. त्याला जितके जबाबदार पाक आहे तितकेच जबाबदार काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आहेत.
पाकच्या इशार्याजवरूनच काश्मीरला वेठीस धरण्याचे काम फुटीरतावादी करीत आहेत. याच पाक व फुटीरतावाद्यांनी 80 आणि 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांना काश्मीर खोर्यावतून पळ काढण्यास भाग पाडले होते. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप यांचे आघाडी सरकार सत्तेत आहे. या पार्श्वमभूमीवर या दोन पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न काश्मीरमधील देशविघातक शक्ती करीत आहेत.
पीडीपीचे मंत्री आणि नेत्यांच्या घरावर होत असलेले हल्ले हा त्याचाच एक भाग आहे. काश्मीर सतत अस्थिर रहावा, यासाठी पाक प्रयत्नशील असल्याची जाणीव ठेवून काश्मिरी लोकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. फुटीरतावाद्यांच्या उपद्व्यापामुळे गत महिना-दीड महिन्यापासून काश्मीरचे जनजीवन ठप्प पडले आहे. हिंसाचारात आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे, ते वेगळेच. भारताशी पारंपरिक युद्ध जिंकता येणार नाही, याची पाकला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे दहशतवादी टोळ्यांच्या म्होरक्यांना समोर करून भारतासोबत छुपे युद्ध पाकने छेडले आहे. दुर्दैवाने चीनसारख्या शेजारी देशाची पाकिस्तानशी हातमिळवणी झालेली आहे. आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येत असलेल्या भारताला रोखण्यासाठी पाकला मदत करण्याचे चीनचे डावपेच जुनेच आहेत. विस्तारवादी देश म्हणून कुप्रसिद्ध झालेला चीन ताकदीच्या बळावर दक्षिण चीन समुद्रावर मालकी गाजवू पाहत आहे. दुर्दैवाने अमेरिका, युरोपियन देश, रशिया या देशांसह युनोने या मुद्द्यावरही बोटचेपेपणाची भूमिका घेतल्याने चीनचे फावले आहे.
दहशतवाद्यांचे स्वर्ग बनला पाक...
मागील काही वर्षांपासून ‘इसिस’ दहशतवादी संघटनेने सीरिया, इराकमध्ये धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे तालिबानने पाक-अफगाणिस्तानमध्ये आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. सध्या पाकमध्ये ज्या घडामोडी सुुरू आहेत, त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे पाककडे असलेली अण्वस्त्रे. पाकमधील दहशतवादी सरकार वा तेथील लष्कराला जुमानत नाहीत, हे आजवरच्या अनेक घटनांनी सिद्ध केले आहे. या पार्श्वाभूमीवर भविष्यात जर पाकची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती आली तर मोठा हाहाकार उडू शकतो. दहशतवादाचे व्यापक प्रमाणावर चटके बसू लागलेला अमेरिका असो वा युरोपियन देश असोत, या देशांनी युनोमध्ये पाकच्या मुसक्या आवळण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. युनोने दहशतवादाची व्याख्या सर्वप्रथम निश्चिठत करावी, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालविलेला आहे. त्यावरसुद्धा आता प्रमुख देशांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे
माझ्या या पुस्तकाला वर्ष २०१६ चे ग्रंथोज्जनक पारितोषिक मिळाले आहे.
आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5451077040939915355?BookName=Aavhan
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment