मेहबुबांची मुक्ताफळे!
Saturday, July 30th, 2016
बुरहान वाणीविषयी ‘हमदर्दी’ व्यक्त करून मेहबुबाबाईंनी त्याच्या मृत्यूबद्दल अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अफझल गुरू हा स्वातंत्र्यसैनिकच होता, असे ठामपणे सांगणार्याब मेहबुबा कश्मीरच्या मुख्यमंत्री झाल्यावरही बदललेल्या नाहीत हेच बुरहान वाणीबद्दल त्यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत त्यावरून सिद्ध होते. या सगळ्यावर मेहबुबांच्या सत्तेतील भागीदारांचे नेमके काय म्हणणे आहे की मेहबुबांच्या भूमिकेचा कागदी निषेध करून प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे?
मेहबुबांची मुक्ताफळे!
जम्मू-कश्मीरातील वणवा विझता विझायला तयार नाही. त्यात मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तेल ओतण्याचेच काम केले. ज्या बुरहान वाणीच्या ‘एन्काऊंटर’वरून कश्मीर खोरे पेटले त्यावर मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांचे अंतरंग उघडे केले. म्हणजे ‘मन की बात’ समोर आणली. चकमकीच्या वेळी लपलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये बुरहान वाणी आहे याची माहिती लष्कराला आणि पोलिसांना नव्हती. माहिती असती तर बुरहान वाणीला वाचवता आले असते, असे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. थोडक्यात काय, तर बुरहान वाणीविषयी ‘हमदर्दी’ व्यक्त करून मेहबुबाबाईंनी त्याच्या मृत्यूबद्दल अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मेहबुबांच्या या वक्तव्याबद्दल स्थानिक भाजप पुढार्यां नी ‘अफसोस’ व्यक्त केला आहे. बुरहान वाणीमुळे कश्मीर खोर्यायत हिंसा उसळली व गेला महिनाभर खोर्याातील आगडोंब उसळतो आहे. बुरहान वाणी हा हिजबूल अतिरेकी संघटनेचा कमांडर होता व पाकिस्तानच्या मदतीने तो खोर्यात दहशतवाद्यांची भरती करून युद्ध छेडीत होता. लष्करांवरील अनेक हल्ल्यांत त्याची चिथावणी व सहभाग होता. अशा बुरहान वाणीला वाचवता आले असते असे सांगणे हे
राष्ट्रीय सुरक्षेला नवे भगदाड
पाडण्यासारखेच आहे. ज्या बुरहान वाणीच्या मृत्यूचे मातम पाकिस्तानात झाले व वाणीला ‘सलामी’ म्हणून पाकिस्तानात काळा दिवस पाळला गेला, अशा वाणीला वाचविणे म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानचेच हात बळकट करणे ठरले असते. त्यामुळे लष्कराने व आपल्या सुरक्षा दलाने केलेली कारवाई योग्यच होती व पाकिस्तानने पोसलेल्या अशा सापाचे फणे वेळीच ठेचले नाहीत तर कश्मीरातील परिस्थिती आणखीन हाताबाहेर जाईल. वास्तविक लष्कराच्या या कामगिरीचे पीडीपीच्या नेत्या म्हणून नव्हे तर किमान राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून तरी मेहबुबांनी कौतुक करायला हवे होते. तथापि तसे न करता ‘बुरहानला वाचवता आले असते’, असे वक्तव्य करून मेहबुबा यांनी कश्मीरच्या भडकलेल्या आगीत तेल टाकायचेच काम केले आहे. मागे मेहबुबांचे पिताजी मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्री असताना तर त्यांनी मशरत आलमसारख्या अतिरेक्याची तुरुंगातून सुटका केली होती. मेहबुबांच्या पीडीपीने या निर्णयाचे जोरदार समर्थन करून कश्मीर खोर्यारतील मुसलमानांची तेव्हा शाबासकी मिळवली होती. श्रीनगरच्या लालचौकात १५ ऑगस्टला तिरंग्याऐवजी पाकिस्तानचा चाँदतारा फडकवला जातो, त्यावर कधी मेहबुबा मुफ्ती बोलत नाहीत.
पृथ्वीवरील नंदनवन
असलेल्या कश्मीरचे अतिरेक्यांनी नरकात रूपांतर केले, त्यावर कधी मेहबुबा बोलत नाहीत. मात्र लष्कराने बुरहानसारखा एक खतरनाक अतिरेकी काय मारला तर त्याच्यासाठी या मोहतरमांनी अशी मुक्ताफळे उधळावीत? अर्थात मेहबुबा मुफ्ती त्यांचा राजकीय पूर्वेतिहास पाहता त्यांच्याकडून अशाच वक्तव्याची अपेक्षा होती. बुरहान वाणीला खतम केल्याबद्दल मेहबुबा मुफ्ती यांनी लष्कराची पाठ थोपटली असती तर सगळ्यांनाच आश्चखर्याचा धक्का बसला असता. कारण बुरहान वाणीसारख्या अनेकांच्या बाबतीत मेहबुबा मुफ्ती यांचे दिव्य विचार काय आहेत ते अनेकदा स्पष्ट झाले आहे. अफझल गुरू हा स्वातंत्र्यसैनिकच होता, असे ठामपणे सांगणार्याअ मेहबुबा कश्मीरच्या मुख्यमंत्री झाल्यावरही बदललेल्या नाहीत हेच बुरहान वाणीबद्दल त्यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत त्यावरून सिद्ध होते. या सगळ्यावर मेहबुबांच्या सत्तेतील भागीदारांचे नेमके काय म्हणणे आहे की मेहबुबांच्या भूमिकेचा कागदी निषेध करून प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे? थोडक्यात, बुरहान वाणीला वाचवायला हवे होते,
No comments:
Post a Comment