बुरहानचे भूतकोणाच्या मानगुटीवर?
स्रोत: विवेक मराठी 16-Aug-2016
कोणत्याही कारणाने भारतात काश्मीरमध्ये प्रायोजित दंगल आणि अशांतता निर्माण करायची, दहशतवाद्यांना प्रचंड पैसे देऊन आत्मघातकी बनवायचे, त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण आणि साधने द्यायची, त्यांना भारतात निरपराध लोकांचे जीव घेण्यासाठी घुसवायचे, दहशतवादी कारवाया घडवायच्या आणि इतके करून पाकिस्तानी सरकारने आणि सैन्याने नामानिराळे राहत जगात शांततेची प्रवचने झोडायची, असे हे पाकिस्तानचे छुप्या युध्दाचे कांगावखोर नियोजन आहे. बुरहान वानी मारला गेल्यानंतर पाकिस्तानने याच प्रकारे काश्मीरच्या खोऱ्यात शंभर कोटी रुपये खर्चून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला.
काश्मीर खोऱ्यातील कुख्यात अतिरेकी आणि हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा कमांडर बुरहान वानी भारतीय सैन्यदलाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर सतत वेगवेगळया घटना, आरोप-प्रत्यारोप घडत आहेत. या सगळया घटनाक्रमात काही गोष्टी जगासमोर, भारत सरकारसमोर आणि जनतेसमोर स्पष्ट झाल्या आहेत. एक म्हणजे या विषयात पाकिस्तानच्या बदमाशीचा जगापुढे चांगलाच पर्दाफाश झाला आहे. आपण दहशतवादाच्या विरोधात असून त्यासाठी काम करत आहोत असा जो आव पाकिस्तानने आणला होता, तो धादांत खोटा असल्याचे आता अमेरिकेसह जगाला स्पष्टच झाले आहे. दुसरे, भारताने आता काश्मीरपेक्षा पाकव्याप्त काश्मीर हाच आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय केला पाहिजे, हे लक्षात घेऊन भारत सरकारने तशी मुत्सद्देग्ािरी सुरू केली आहे. काश्मीर खोऱ्यातील पाकप्रायोजित हिंसा उभी करण्याच्या वाटा शोधून त्या बंद केल्या पाहिजेत. तिसरे, काश्मीर या विषयावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून संसदेत भारतातील सर्व राजकीय पक्ष एक सुरात बोलत असल्याचे चित्र जगाला दिसले आहे. चौथे, म्हणजे याच काळात पाकव्याप्त काश्मीरमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीचे हिंस्रआणि हिडीस रूप जगासमोर उघडे पडले आहे. पाचवा मुद्दा म्हणजे लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी बहादूर अली याला तपास यंत्रणेने 26 जुलै रोजी अटक केली. या बहादूर अलीची तपासणी आणि चौकशी करताना बाहेर आलेले सत्य ते बुरहान वानीच्या खातम्यानंतर काश्मीर खोऱ्यात उफाळलेला असंतोष हा उत्स्फूर्त नव्हता, तर तो पाकिस्तानने प्रयत्नपूर्वक उभा केलेला होता हे उघड झाले आहे.
जो बुरहान वानी भारतीय लष्करी जवानांशी झालेल्या चकमकीत मारला गेला, तो कोण होता? तो काही संत, निरपराध, र्आदश तरुण होता असे चित्र निर्माण केले जात आहे, त्याची चिरफाड आधी केली पाहिजे. पंधरा वर्षांचा असताना दहशतवादी कारवायांत भाग घेण्यासाठी घरातून पळून गेलेला हा बुरहान वानी. हिजबुल मुजाहिद्दीन या भारताच्या विरोधात पाकिस्तानकडून कुमक घेऊन काश्मीर खोऱ्यात असंतोष निर्माण करण्याच्या उचापती करणाऱ्या संघटनेचा हा कमांडर होता. अनेक निरपराध नागरिकांच्या आणि भारतीय शूर सैनिकांच्या मृत्यूला हा कारणीभूत होता. अतिशय स्त्रीलंपट असा हा बुरहान एका जुन्या दुखावलेल्या मैत्रिणीमुळेच लष्कराच्या हाती लागला. हा कोणी सामान्य माणसांचे भले करणारा समाजसेवक नव्हता की संत नव्हता. त्याच्या मृत्यूनंतर सर्वसामान्य माणूस रस्त्यावर येऊन दगड हातात घेऊन भारतीय लष्करी जवानांच्या विरोधात उभा राहील, असे काहीही या बुरहानच्या व्यक्तिमत्त्वामध्ये नव्हते. त्यामुळे बुरहानच्या खातम्यानंतर ज्या प्रतिक्रिया काश्मीर खोऱ्यात उमटल्या, त्या उत्स्फूर्त नव्हत्या, तर चक्क शंभर कोटी रुपये खर्चून पाकिस्तानने केलेली ती चाल होती. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी बहादूर अली काश्मीरमध्ये असंतोष निर्माण करत असताना भारतीय तपास यंत्रणेने त्याला अटक केली. या बहादूर अलीचा जवाब आणि त्याच्याजवळ सापडलेले पुरावे यामधून पाकिस्तानचा काश्मीरमध्ये अशांतता पसरविण्याचा डाव उघड झाला आहे. 26 जुलै रोजी बहादूर अली याला तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. लाहोरला राहणारा हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबाच्या तीन प्रशिक्षण केंद्रांमधून दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन तयार झाला आहे. त्याने कबूल केले आहे की, काश्मीरला जळते ठेवण्याचीर् पूण योजना हाफीज सईद याच्या पुढाकाराने तयार झाली होती. जरी योजना सईदने तयार केली असली, तरी ती राबविण्यात पाकिस्तानी सैन्याचार् पूण सक्रिय पाठिंबा होता. पाकिस्तानी सैन्यातून दहशतवादाचे प्रशिक्षण देणे आणि दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसण्यास मदत करणे असे उद्योग केले जातात. इतकेच नाही, तर या दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याच्या अल्फा-3वरून सतत सूचना मिळत असतात. त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून असे सांगण्यात येते की, 'स्थानिक लोकांमध्ये मिसळून जा, भारतीय सुरक्षा रक्षकांवर हल्ले करा आणि तणाव निर्माण करा.' पाकिस्तानी सैन्याचे नापाक मनसुबे काय आहेत ते यावरून स्पष्ट झाले आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैन्यातून सतत वायरलेसवरून सूचनाही देण्यात येत होत्या, असे उघड झाले आहे.
कोणत्याही कारणाने भारतात काश्मीरमध्ये प्रायोजित दंगल आणि अशांतता निर्माण करायची, दहशतवाद्यांना प्रचंड पैसे देऊन आत्मघातकी बनवायचे, त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण आणि साधने द्यायची, निरपराध लोकांचे जीव घेण्यासाठी त्यांना भारतात घुसवायचे, दहशतवादी कारवाया घडवायच्या आणि इतके करून पाकिस्तानी सरकारने आणि सैन्याने नामानिराळे राहत जगात शांततेची प्रवचने झोडायची, असे हे पाकिस्तानचे छुप्या युध्दाचे कांगावाखोर नियोजन आहे. बुरहान वानी मारला गेल्यानंतर पाकिस्तानने याच प्रकारे काश्मीरच्या खोऱ्यात शंभर कोटी रुपये खर्चून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानच्या या प्रयत्नांना स्थानिक काश्मिरी जनतेचा पाठिंबा आहे असे पैसे देऊन दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. बुरहान मारला गेला आणि काश्मीर खोऱ्यात पाकप्रायोजित दंगली सुरू झाल्या, त्या वेळी नाशिक येथून गेलेल्या अमरनाथ यात्रेकरूंच्या चार बसेस या दंगलीत अडकल्या होत्या. त्यापैकी दोन बसेसच्या काचा दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत फुटल्या होत्या. मात्र, अतिशय संकटात सापडलेल्या या यात्रेकरूंना एक सुखद अनुभव आला. काश्मीर खोऱ्यातील सामान्य रहिवासी नागरिक न बोलावता त्यांच्या मदतीला देवासारखे धावून आले. या काश्मीर खोऱ्यातील सामान्य रहिवाशांनी त्यांना जम्मूपर्यंत सुरक्षित पोहोचविले. दहशतवादाला स्थानिक काश्मिरींचा पाठिंबा नाही, हे स्पष्ट करणारी ही घटना आहे.
या उलट पाकव्याप्त काश्मीरमध्ये याच्या उलटी परिस्थिती आहे. तेथे नुकतेच झालेल्या निवडणुकीत नवाज शरीफ यांच्या पक्षाला 41पैकी 30 जागा मिळाल्या आणि चेकाळल्यासारखे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ महाशय उर्वरित काश्मीरवरही हक्क सांगत उठले होते. मात्र, काश्मीरला पाकिस्तानचा भाग बनल्याचे त्यांचे दिवास्वप्न हवेत विरण्याआधीच पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने रस्त्यावरून उतरून, आंदोलन करून हे जगजाहीर केले की पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणुका बोगस होत्या. येनकेन प्रकारेण पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान देश आणि आपणच लोकप्रिय आहोत असेर् दशविण्याचा नवाज शरीफ यांचा प्रयत्न होता. दोनच दिवसांनी पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या आणि पाकिस्तानमध्ये आपण सुरक्षित नाही, आपल्याला भारतातच राहायचे आहे, असे जगजाहीर केले.
काश्मीर खोऱ्यामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची ओरड नेहमी केली जाते. पाकिस्तानने पोसलेले फुटीरतावादी आणि विकाऊ विचारवंत अशा प्रकारची कोल्हेकुई सतत करत असतात. मात्र आता मानवी हक्क आयोगाने पाकव्याप्त काश्मीरबाबत जो अहवाल दिला आहे, तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवतेची आणि मानवी हक्काची कशी पायमल्ली चालली आहे, त्याचे चित्र स्पष्ट करणारा आहे. या अहवालात म्हटले आहे की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना क्षुल्लक कारणांसाठी अत्यंत निर्दयपणे मारहाण करण्यात येते. छोटया छोटया गोष्टींवरून लोकांचा छळ केला जातो. इतका की तक्रार करण्यालाही लोक घाबरतात. पाकव्याप्त काश्मीरमधील पोलीस ठाणी गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. तेथे जनतेला आपली बाजू मांडण्याचा हक्कच नाही. या परिस्थितीतूनही पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्य माणूस जिवावर उदार होत 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा देऊ लागला आहे.
जगातही पाकिस्तानचे खरे रूप आता उघड झाले आहे. दहशतवादाचा विरोध करत असल्याचे भासवत जगाची आणि विशेषत: अमेरिकेची शाबासकी मिळविण्याचे चाळे पाकिस्तानने काही काळ केले. मात्र ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच आश्रयाला होता, हे अमेरिकेने तेथे घुसून लादेनचा खातमा करून जगजाहीर केले. पाकिस्तानला त्यावर हात चोळत बसण्यापलीकडे काहीच करता आले नाही. अमेरिकेने ड्रोन हल्ले करत पाकिस्तानात लपलेल्या अनेक तालिबानी अतिरेक्यांचा खातमा केला. या सर्व घटनांनी अमेरिकेचे डोळे खाडकन उघडले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात अमेरिकेची आजवरची भूमिका मोघम, संदिग्ध आणि दोन्ही देशांना सोयीने अर्थ काढता येतील अशी वरवरची असायची. मात्र आता अमेरिकेचा पाकिस्तानबाबतचा दृष्टीकोन बदलल्याचे जाणवत आहे. अमेरिकेने आता पाकिस्तानला तंबी देण्याला सुरुवात केली आहे. नरेद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अतिशय आक्रमकरित्या आणि वेगवानपणे जे परराष्ट्र धोरण राबविले आहे, त्यामुळे भारताची प्रतिमा अत्यंत चांगली झाली आहे. पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया करण्यास प्रोत्साहन देण्याचे जे उपद्वयाप केले आहेत, तेही जगासमोर उघड झालेले आहेत. आता तर दहशतवादी बहादूर अलीच्या रूपाने पाकिस्तानच्या काश्मीरमधील दगाबाजीचा आणि बेइमानीचा जिवंत पुरावाच भारताच्या हाती लागला आहे. पाकिस्तानची बदमाशी जगजाहीर झाली आहे. आता या परिस्थितीत भारत आंतरराष्ट्रीय समुदायासमोर कशी भूमिका मांडतो आणि पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याइतकी जगाची मनोभूमिका तयार करून प्रत्यक्ष काय करतो, याकडे सगळया जगाचे लक्ष आहे.
काश्मीरमधील पाकधार्जिण्या लोकांचे विषय आणि भारताबरोबचे भांडण हे वैयक्तीक आहे. बुरहान वानीचा एक भाऊ दहशतवादी कारवाया करत असताना भारतीय लष्कराकडून मारला गेला म्हणून बुरहान वानी दहशतवादी झाला. आता तो मारला गेल्यावर त्याचे वडील म्हणतात की माझी श्ािल्लक असलेली एक मुलगीही मी या कारवायांमध्ये देईन. या वैयक्तिक सूडाग्नीला पाकिस्तानकडून प्रोत्साहन मिळते. ही जी प्रक्रिया आहे, ती तोडली गेली पाहिजे. देशविरोधी कारवायांसाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि रागलोभ यांचा दुरुपयोग करण्यात पाकिस्तानला यश मिळता कामा नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे.
भारताकडे आता पाकिस्तानी दहशतवादी कारवायांचे पुरावेच आहेत. बहादूर अलीच्या रूपाने अगदी जिवंत पुरावा मिळाला आहे. भारत सरकार याचा कसा उपयोग करून घेते, यावरून दहशतवादाच्या विरोधातील यापुढची लढाई जगाच्या कार्यक्रम पत्रिकेतील मुख्य विषय कशी करते, हे महत्त्वाचे आहे. बुरहान वानीचे भूत भारताच्या मानगुटीवर बसणार की पाकिस्तानची बोलती बंद करणार, हे जास्त महत्त्वाचे आहे. भारत जगात किती आक्रमकरित्या हा विषय जगाच्या चिंतेचा विषय बनवतो, त्यावर ते अवलंबून आहे
No comments:
Post a Comment