करिमा, करजई यांचा काश्मीरला सल्ला
बलुचिस्तानमध्ये सध्या असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. तेथे पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांकडून बलुच जनतेवर होणार्याआ अनन्वित अत्याचाराबद्दल आवाज बुलंद होत आहे. शनिवारी बलुच जनतेने पाकिस्तानचा ध्वज जाळला आणि भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. बलुचिस्तानात होत असलेल्या दिवसाढवळ्या हत्या, अत्याचार आणि छळाला जगाच्या वेशीवर टांगावे, अशी बलुच जनतेची मागणी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बलोच स्टुडन्ट असोसिएशनची अध्यक्षा करिमा बलोच हिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये मारिया म्हणते, ‘मोदीजी, आम्ही बलुचिस्तानमधील सर्व बहिणी तुम्हाला भाऊ मानतो. रक्षाबंधनाच्या दिवशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की, आपण आम्हा बहिणींना न्याय मिळवून द्यावा. आज आम्हा हजारो बहिणींचे भाऊ पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडले आहेत. त्यापैकी काही जणांना पाकिस्तानी लष्कराने मारून टाकले आहे. आमची विनंती आहे की, तुम्ही आमच्यावर होणार्यान अनन्वित अत्याचार, नरसंहार, मानवाधिकारांचे उल्लंघन याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आमचा आवाज बनावा. आम्ही आमची लढाई स्वत: लढू, पण आमच्या व्यथा तुम्ही जगाच्या वेशीवर टांगा.’ काश्मीरमधील जनतेला आवाहन करताना करिमा म्हणाली, काश्मीरी जनतेने बलुचिस्तानमध्ये आमच्यावर होत असलेल्या अत्याचाराची आधी नोंद घ्यावी. पाकिस्तानात जाण्याचा आत्मघाती निर्णय घेऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलुचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेकडून आलेल्या अभिनंदनाचा उल्लेख केला होता. तो धागा पकडून करिमाने हे ट्विट केले आहे. बलुचिस्तानमधील युवकांची देशव्यापी संघटना असलेल्या बलोच स्टुडंटस् असोसिएशनची करिमा ही अध्यक्ष आहे. या संघटनेचा अध्यक्ष करिमाचा भाऊ जाहीद बलोच होता. त्याला पाकिस्तानी सैनिक दोन वर्षांपूर्वी अटक करून सोबत घेऊन गेले. तेव्हापासून तो परतलेला नाही. त्याच्या संघटनेची जबाबदारी करिमाने स्वीकारली आहे. २०१५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने बलुचमधील एका ठिकाणावर हल्ला केल्यानंतर करिमा ही भूमिगत झाली. त्यानंतर ती कॅनडाला गेली. अनेक बलोच लोक कॅनडात निर्वासित म्हणून आले आहेत, त्यापैकी काही जण भारतातही आले आहेत. भारतात आलेल्या लोकांनी तर अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला तुम्ही कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी म्हणू नका. आम्ही पाकिस्तानचे नागरिक नाहीच. आमचे स्वतंत्र राज्य होते. हे खरेच आहे. ज्यावेळी फाळणी झाली, त्यावेळी बलुचिस्तान हे स्वतंत्र राज्य होते. पाकिस्तानने लगेच १९४८ साली बलुचिस्तानवर हल्ला केला आणि बळजबरीने कब्जा केला. तेव्हापासून बलोच लोकांचा छळ सुरू आहे. आता मात्र चीनच्या इशार्याावर पाकिस्तानने बलोच लोकांवर अत्याचार करण्याची सीमा गाठली आहे. त्यामुळे बलोच जनता रस्त्यावर आली आहे. चीनने खूप मोठ्या रकमा पाकिस्तानी शासक, आयएसआय आणि वरिष्ठ लष्करी अधिकार्यांूना वाटून बलोचमधील ग्वादर बंदर आपल्या ताब्यात घेतले आहे. बलोच लोकांचे आंदोलन पेटले तर त्याचा मोठा फटका चीन आणि पाकिस्तानलाही होणार आहे. मोदींनी आपल्या भाषणातून बलोच, गिलगिट आणि पीओकेचा उल्लेख करून पाकिस्तानचे दात त्यांच्याच घशात घातले. नाक दाबले की तोंड उघडते, अशी युक्ती मोदींनी खेळली आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा तळतळाट झाला आहे. याच मालिकेत अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करजई यांनीही बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या नरसंहाराबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. शनिवारी त्यांनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टच सांगितले की, बलुचमध्ये पाकिस्तानी सैनिक तिथल्या लोकांच्या हत्या करीत आहेत, त्यांना तुरुंगात डांबत आहेत, मानवाधिकारांचे तेथे सरळसरळ उल्लंघन सुरू आहे. भारताचे पंतप्रधान मोदींनी बलुचचा जो उल्लेख केला, तो उचित आहे. कारण, पाकिस्तान हा दहशतवाद्यावे नंदनवन बनला आहे. अफगाणपेक्षा भयानक परिस्थिती बलुचमध्ये आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची झळ आम्हालाही बसली आहे. तेथे मानवाधिकार नावाची वस्तूच उरलेली नाही. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणामुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात आली आहे. भारत हा अफगाणिस्तानचा खरा मित्र आहे. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आमची मैत्री मात्र पाकच्या पचनी पडलेली नाही. त्यांना असे वाटते की, ही मैत्री होऊ नये. करजई यांनी काश्मीरी जनतेलाही पाकिस्तानपासून सावध केले आहे. बलुचिस्तानमध्ये जो नरसंहार होत आहे, तो लक्षात घेता, काश्मीरने पाकमध्ये जाणे हा त्यांच्यासाठी आत्मघात ठरेल. भारतात राहूनच तुमची प्रगती आणि विकास होऊ शकतो. पाकमध्ये तुम्ही कधीही शांततेने राहू शकणार नाही. स्वातंत्र्याचा उपभोग तुम्हाला घेता येणार नाही. करिमा आणि करजई यांनी काश्मीरी जनतेला जे आवाहन केले आहे, ते सध्याच्या जळित खोर्याामधील लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. शेजारी बांगला देशनेही मोदींच्या बलुचिस्नानबाबत भूमिकेचे स्वागत केले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. मोदींनी जागतिक पातळीवर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडल्यानंतर पाकच्या शेजारचे देशही पाकबाबत तीव्र भूमिका घेत असल्यामुळे नवाज शरीफ यांची डोकेदुखी वाढली आहे. बलुचमधील स्थितीकडे जागतिक व्यासपीठाचे लक्ष नाही असे नाही. करिमाच्या भावाला जेव्हा अटक झाली होती, तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला पत्र लिहून जाहीदची सुटका करावी, असा सल्ला दिला होता. मोदींनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात पन्नासहून अधिक देशांना भेटी देताना, पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला आहे आणि त्याला सर्वच देशांनी पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानची अशी नालस्ती झाल्यानंतर आता बलुच लोकांवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. बलुच लोक ज्या ज्या देशात निर्वासित म्हणून गेले आहेत, तेथे ते मोर्चे काढून जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाकिस्तानने ज्या हाफीज सईदला आश्रय दिला आहे, त्याच्या शिरावर अमेरिकेने दहा लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. हक्कानी या अतिरेकी गटाच्या मुसक्या बांधाव्या अशी तंबी अमेरिकेने कितीतरी वेळा अमेरिकेने नवाज शरीफला दिली आहे. पण, नवाज हतबल आहेत. त्यांच्याकडे सत्ताच नाही. आयएसआय अतिरेकी गटांना रसद पोचवीत आहे. सोबतच काश्मीरमधील सुरक्षा दलांवर दगडफेक करावी म्हणून युवकांसाठी पैसे पाठवीत आहे. त्यात बळी जात आहेत, ते काश्मीरी युवकांचे. पाकिस्तान पैसा पेरत असल्याची बाब आता काश्मीरी जनतेलाही कळली आहे. या सगळ्या पार्श्वरभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बलुचिस्तानबद्दल कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment