दहशतवादी हल्याुल त सोमवारी शहीद झालेले CRPF चे कमांडेंट प्रमोद कुमार यांच्याववर आज (मंगळवार) शासकीय इतमामात अंत्य संस्काFर
शहिदाला अखेरची सलामी, ध्वइजारोहणानंतर दोन दहशतवाद्यांना एकट्याने मारले होते
जामताडा (झारखंड) - श्रीनगरच्यार नौहट्टा चौकात झालेल्याा दहशतवादी हल्याावर त सोमवारी शहीद झालेले CRPF चे कमांडेंट प्रमोद कुमार यांच्या्वर आज (मंगळवार) शासकीय इतमामात अंत्येसंस्काखर करण्यारत आले. मुलीने त्यां ना मुखाग्नीह दिला. हल्यािप् पूर्वी सोमवारी त्यांीनी आपल्याक तुकडीकडून स्वांतंत्र्य दिवसाची सलामी घेतली होती. त्या नंतर काहीच वेळात हल्याय इ ची माहिती मिळाली आणि कुमार यांच्यात तुकडीने मोर्चा संभाळाला. या चकमकीत त्यांीनी एकट्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्ना्न घातले. नंतर ते शहीद झाले. विशेष म्ह णजे 11 दिवसांपूर्वीच त्यांहच्याूवर पेट्रोल बॉम्ब ने हल्लाा झाला होता.
झेंडा वंदानाच्या एका तासानंतरच चकमक ...
> सोमवारी झेंडावंदन झाल्याानंतर प्रमोद कुमार यांनी आपल्याश जवानांना संबोधित केले होते.
> त्यांरनी सकाळी 8.29 वाजता झेंडावंदन केले.
> ते म्हीणाले होते, ''आपली जबाबदारी वाढली आहे. दहशतवाद आणि दगडफेक करणाऱ्यांचे आवाहन आहे. त्यांणच्यानशी निडर होऊन लढावे लागणार आहे. ते मेहन नतीचे शक्य होणार आहे. मन लावून कार्य कारा. '
> त्या्च्याह एक तासानंतरच सकाळी 9.29 वाजता दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. प्रमोद कुमार यांच्याहकडेच तुकडीचे नेतृत्वन होते.
> दहशतवादी ज्याा घरातून गोळीबार करत होते त्याे घराच्याज खूप जवळ जात त्यां नी दोन दहशतवाद्यांना कंठस्नाान घातले.
> सकाळी 11 वाजता त्यांाच्यात कुटुंबीयांना फोन आला की त्यां च्या डोक्यातला गोळी लागून ते शहीद झाले.
> बिहारचे बख्तियारपूर येथील ते मूळ रहिवासी होते. 15 ऑक्टोलबर 1972 रोजी त्यांवचा जन्मल झाला. जामताडामध्येय ते लहानचे मोठे झाले.
> येथे त्यांमचे वडील रेल्वेत होते. त्यांनच्यात पश्या्त त्यांंचे आई- वडील पत्नी आणि सात वर्षांची एक मुलगी आहे
अंजली भुजबळ
सैन्यातील जवानांना शत्रू आणि निसर्ग अशा दोन्हींशी लढाया लढाव्या लागतात. सियाचीन ग्लेशियर सारख्या सरासरी २२ हजार फुट उंचावर आॅक्सीजनचे प्रमाण कमी असेत. येथे बर्फाचे कडे कोसळण्याच्या घटनाही वारंवार घडतात. त्यात अनेक जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. बर्फाच्या वादळात अनेक सैनिकांचे तर मृतदेहही सापडत नाहीत. देशासाठी असे हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांना अभिवादन.
सीमाच्या मोबाइलची रिंग वाजली... तसा तिने फोन उचलला. समोरून अगदी खंगलेला आवाज आला... ‘हॅलो सीमा, मी रवी बोलतोय...’ आवाज ऐकून सीमाने प्रश्नांचा भडिमार के ला. काय झालं? तुमचा आवाज असा का येतोय?... तुमची तब्येत बरी नाही का?... त्यावर रवीने अगदी सहज उत्तर दिलं, ‘मी ठीक आहे. जरा पाठ दुखतेय एवढंच... मी सध्या चंदिगढच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये अॅ्डमिट आहे. पण काळजी करण्याचं काही कारण नाही.’
आठ दिवस असाच सीमा आणि रवीचा फोनचा सिलसिला सुरू होता. रवी फोन करेल तेव्हा ‘मी येऊ का’ हा एकच प्रश्न ती विचारत होती. त्यावर ‘तू एकटी कशी येणार? मुलांचं काय? त्यांचा अभ्यास बुडेल? कुटुंबाला राहण्यासाठी येथे काही व्यवस्था नाही. मीच येतो बरा झालो की,’ असेही त्याने सांगितले. त्यावर सीमाने जरा विचार केला आणि ‘ठीक आहे, पण तुम्ही काळजी घ्या,’ असे ती उत्तरली. रवीची काळजीही स्वाभाविक होती, मुलांचा विचार करणंही गरजेचं होतं. त्यानंतर नेहमीप्रमाणे सीमा रवीला फोन करत होती. मात्र रवीचा फोन बंद होता. काही दिवसांनी तिला रवीच्या निधनाचं वृत्त समजलं. हे ऐकून असं काही घडलंय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. लेह लडाख येथे पोस्टिंग असताना रवींद्र देशमुख यांना आॅक्सिजन कमी पडल्याने त्यांची प्रकृ ती गंभीर झाली आणि चंदिगढ येथील आर्मी हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.१ आॅगस्टला रवींद्र देशमुख यांचे चंदिगढच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ३ आॅगस्टला त्यांचा मृतदेह पुणे विमानतळावर तिरंग्यात रवीचा मृतदेह पाहून सीमाच्या अश्रूंचा बांध फुटला. ही केवळ रवींद्र आणि सीमा देशमुख यांची कहाणी नसून अनेक जवानांच्या कुटुंबीयांची आहे. रवींद्र देशमुख यांचे वडीलही माजी सैनिक असून दोन्ही भाऊही लष्करात आहेत. देशसेवेसाठी अविरत झटणारे हे जवान कुटुंबापासून दूर सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी उभे असतात. या सैनिकांना नेमणूक असलेल्या ठिकाणच्या वातावरणाचाही सामना करावा लागतो, तोही एक संघर्ष आहे.
आपली भारतीय सेना अशा दुर्गम भागात आहे, जेथे वीज, रस्ता, पाणी अशा पायाभूत सुविधा नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय सैन्य सीमेवर आपल्या रक्षणासाठी तैनात आहे. सियाचीन हे सर्वात उंच ठिकाण असून येथे आॅक्सिजन कमी आहे, तसेच तेथील तापमान -३५ एवढं असतं, अशा स्थितीत या वातावरणाचा सामना करत जवान जिवाची बाजी लावत आहेत. जम्मू-काश्मीर, लेह लडाख येथील परिस्थितीही काही वेगळी नाही. अशा दुर्गम ठिकाणी रस्ता नसल्याने सैनिकांना इमर्जन्सीमध्ये मैलोन्मैल पायपीट करावी लागते. तर अनेक उपयुक्त सामान पोहोचविण्यासाठी प्राण्यांचा आधार घ्यावा लागतो. येथे दोन-तीन महिने वास्तव्य करताना फ्रोजन फूडचा आधार घ्यावा लागतो. कोणत्याही सुविधेशिवाय हे सैनिक केवळ देशप्रेमाखातर येथे राहतात.जम्मू, काश्मीर आदी ठिकाणी नोव्हेंबरपासून बर्फवृष्टी सुरु होते. अगदी जानेवारी, फेब्रुवारीपर्यत बर्फ पडत असतो. अनेक सैनिकांना या वातावरणाचा फटका बसतो. काही जणांना प्राणालाही मुकावे लागते. या बर्फाच्या वादळामध्ये अनेक सैनिकांचे मृतदेहही सापडत नाहीत. १९७२ साली बेपत्ता झालेल्या सैनिकाचा मृतदेह मागील वर्षी सापडला होता, हे उदाहरण तसं ताजंच आहे.
हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र
उत्तर काश्मीरच्या १३ हजार फूट उंचीवरील बर्फाच्छादित हिमालयावर झडलेल्या भीषण चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा करून गंभीर जखमी अवस्थेतही लढणारे आणि प्राणाहुती देणारे लष्करातील हवालदार हंगपन दादा यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर आज रविवारी अशोक चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
दादा अशीच ओळख असलेले हंगपन दादा यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर सरकारतर्फे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
याच वर्षीच्या २७ मे रोजी उत्तर काश्मीरच्या शामसबारी रेंजमधील बर्फाच्छदित हिमालयावर दादा यांनी पाकव्याप्त काश्मिरातून घुसखोरी करणार्या् चार अतिरेक्यांना यमसदनी धाडले होते. अतिरेक्यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी आपली जागा न सोडता अद्भूत शौर्याचे दर्शन घडविले होते.
अरुणाचल प्रदेशच्या बोदुरिया या दुर्गम गावातून लष्करात आलेले दादा गेल्या वर्षी या हिमालयावर भारत मातेच्या रक्षणासाठी तैनात झाले होते. १९९७ मध्ये लष्कराच्या आसाम रेजिमेंटमध्ये ते भरती झाले होते. ते ३५ राष्ट्रीय रायफल्सचे सदस्य होते. दहशतवादविरोधी मोहिमेकरिताच या दलाची स्थापना करण्यात आली आहे. २७ मे रोजी ते आपल्या तुकडीसह गस्त घालत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. क्षणातच त्यांनी व तुकडीतल अन्य जवानांनी अतिरेक्यांना घेरले. यावेळी झडलेली चकमक तब्बल २४ तासपर्यंत सुरू होती. त्यांनी अतिरेक्यांसोबत समोरासमोर मुकाबला केला. आपल्या सहकार्यां चे रक्षण करताना दोन अतिरेक्यांना ठार मारल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. अशा अवस्थेतही त्यांनी तिसर्याे अतिरेक्याचा खात्मा केला. या अतिरेक्यावर ते अक्षरश: तुटून पडले होते. यावेळी दोघांच्याही हातात बंदुका नव्हत्या. त्यानंतर त्यांनी बंदूक उचलून नियंत्रण रेषेकडे जाणार्याो चौथ्या अतिरेक्यालाही ठार केले होते. त्यांच्या मागे पत्नी, दहा वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे
No comments:
Post a Comment