Total Pageviews

Tuesday 30 August 2016

चायनिज लायटिंगला 'कोल्हापुरी'ची फाईट-BE INDIAN BUY INDIAN BOYCOTT CHINESE GOODS


चायनिज लायटिंगला 'कोल्हापुरी'ची फाईट - सुधाकर काशीद - सकाळ वृत्तसेवा मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 - 02:30 AM IST Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=yAP0PQ Tags: chinese lighting, kolhapur lighting, kolhapur कोल्हापूर - गणेशोत्सव, दीपावलीत चायनीज लाईट माळा वापरू नका, हे म्हणायला ठीक आहे. पण त्याला पर्याय फार कमी जणांकडे आहे. कोल्हापुरातील काही व्यावसायिकांनी मात्र हा पर्याय शोधून काढला आहे. "कोल्हापुरी लायटिंग‘ म्हणून या पर्यायाने बेळगाव, गोव्यापर्यंत आपला प्रकाशझोत पोहोचवला आहे. विशेष हे की, कोठे फार मोठी फॅक्‍टरी नसतानाही या कोल्हापुरी लायटिंग व्यवसायाने पाच-पंचवीस नव्हे; तर कोल्हापुरातील पाचशेहून अधिक महिलांना घरबसल्या उद्योग दिला आहे. दीपावली, गणेशोत्सवात लखलखणाऱ्या या देखण्या लाईट माळा जवाहरनगर, सुभाषनगर, गंजी माळ परिसरातील अनेक महिलांच्या कौशल्यातून तयार होत आहेत. आता तर या व्यवसायात मागणी वाढल्याने बसायला उसंत नाही, अशी परिस्थिती आहे. एलईडी बल्बचा वापर असलेल्या या लाईट माळा रोज हजारोंच्या संख्येने पार्सलद्वारे ठिकठिकाणी रवाना होत आहेत. कोल्हापुरातल्या उद्योजक, व्यावसायिकांनी जर मनावर घेतलं तर काय घडू शकते, याचे हे वेगळे उदाहरण ठरले आहे. शिक्षणाशी फारशी तोंडओळख नसलेल्या महिलाही फिटिंग, सर्किटची भाषा यानिमित्ताने बोलू लागल्या आहेत. या लाईट माळांसाठी वेगवेगळ्या रंगाची वायर वेणीसारखी गुंफली जात आहे. ही वेणी तर या माळांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. सणासुदीच्या काळात रोषणाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही मानसिकता ओळखून अगदी पंचवीस-तीस रुपये किंमत असलेल्या लाईट माळा बाजारात आणल्या गेल्या. मात्र किमतीच्या तुलनेतच त्यांचे आयुष्य कमी राहिले. किंबहुना दुकानातून बाहेर पडल्यावर या लाईट माळांची गॅरंटी नाही, असे सांगूनच त्याची विक्री होत राहिली. स्वस्तात मिळते म्हटल्यावर घरोघरी या माळा गेल्या. पण काही वेळात बंद पडू लागल्या. या माळांना असलेली मागणी, पण त्याचा खराब दर्जा याचा विचार करून कोल्हापुरातल्या पाच-सहा व्यावसायिकांनी चांगल्या दर्जाच्या माळा कोल्हापुरातच तयार करायचे ठरवले. एलईडी बल्बच्या साहाय्याने माळा तयार करताना त्यांनी हस्तकौशल्यावर भर देऊन माळा बनवण्याचे काम महिलांना दिले. अगदी थोडे प्रशिक्षण दिले की महिलाही घरबसल्या माळा करू शकतात हे त्यांच्या ध्यानात आले व "कोल्हापुरी लायटिंग‘ या व्यवसायाने मूळ धरले. बल्ब, वायर, सर्किट हा कच्चा माल महिलांना घरात दिला जाऊ लागला व त्यातून माळा तयार होऊ लागल्या. घरबसल्या हे काम करता येते, हे पाहून शेजारच्या महिला एकत्र येऊन काम करू लागल्या. आता काही महिला सामूहिकपणे या कामाची जबाबदारी घेतात व रोज शेकडो माळा तयार करतात. माळेसाठी रंगीबेरंगी वायरची खूप छान वेणी बनवतात. आता गणेशोत्सवामुळे तर त्यांनी तयार केलेल्या माळांना फार मोठी मागणी आहे. कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर बेळगाव व संपूर्ण गोव्यात कोल्हापुरी लायटिंग या नावाने या माळा पोहोचल्या आहेत. युनायटेड, कोहिनूर, इलाईड, बारी, डफळे आदी मंडळी या नव्या व्यवसायात गुंतली आहेत. कालानुरूप किंवा लोकांची गरज ओळखून एखादा नवा व्यवसाय कसा मूळ धरू शकतो. चारशे ते पाचशे कुटुंबांना आधार बनू शकतो याचे "कोल्हापुरी लायटिंग‘ हे उदाहरण ठरले आहे. कोल्हापुरात तयार होणाऱ्या या माळांनी इथल्या कष्ट व कर्तृत्वाचा प्रकाशच सर्वत्र पोहोचवला आहे. याशिवाय चार-पाचशे कुटुंबांना आधार मिळवून दिला आहे. एलईडी बल्बच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या या माळा विजेची तर बचत करतात; पण खूप वर्षे टिकतात. - अमित शिंदे, लाईट माळा उत्पादक

No comments:

Post a Comment