SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Tuesday, 2 August 2016
शरीफ यांचा बदमाश चेहरा उघड!- दिलीप धारुरकर
शरीफ यांचा बदमाश चेहरा उघड!- दिलीप धारुरकर
पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत पाकिस्तान सुरुवातीपासून करत असलेल्या बेईमानीचा बुरखा टराटरा फाटला आहे. नुकत्याच झालेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या पक्षाला विजय मिळताच, भलताच तोरा दाखवत नवाझ शरीफ यांनी आपली शराफत गहाण टाकत बडबड केली होती. या सगळ्या बडबडीचा पायाच ठिसूळ असल्याचे आता उघड झाले आहे. ज्यांनी शरीफ यांच्या पक्षाला विजय मिळवून दिला म्हणून नवाझ शरीफ शेफारल्यासारखे काश्मीर गिळंकृत करण्याचे दु:स्वप्न पाहत होते, ते पाकव्याप्त काश्मीरमधील लोक नवाझ शरीफ यांच्या पक्षाच्या विरोधात संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. शरीफ यांच्या बदमाशीचा निषेध करत त्यांनी पाकिस्तानचा झेंडाच जाळून टाकला! शरीफ यांची बदमाशी सार्यां जगासमोर उघडी पडली. पैसे देऊन काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा जाळण्याचे षडयंत्र करणार्याी पाकिस्तानवर त्यांचीच चाल अशी उलटली! नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाकव्याप्त काश्मीरमध्ये नवाज शरीफ यांच्या पक्षाने ४१ पैकी ३२ जागा, बदमाशी करूनच जिंकल्या होत्या. हे निव्वळ लोकशाहीचे ढोंग होते, हे या निदर्शनामुळे उघड झाले आहे. हेराफेरी करून मिळविलेल्या यशाने शेफारून जात नवाझ शरीफ यांनी त्या वेळी म्हटले होते की, काश्मीर पाकिस्तानचा एक भाग बनेल त्या दिवसाची ते वाट पाहत आहेत. त्यांचे हे स्वप्न खोटारडेपणाने मिळविलेल्या विजयावर आधारित होते, हे स्पष्ट झाल्याने सगळेच बिंग फुटले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील संतापाचा काल स्फोट झाला. तेथील लोक थेट रस्त्यावर उतरले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जो निवडणुकांचा फार्स करण्यात आला त्याच्या विरोधात या जनतेने जोरदार घोषणा दिल्या. मीरपूर, कोटली, चिनारी या ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले, बसेस जाळल्या, पाकिस्तान विरोधात जबरदस्त घोषणाबाजी केली. या निवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीगने आणि सरकारने मोठ्या प्रमाणावर बोगसगिरी केल्याचा लोकांचा आरोप आहे. नवाझ शरीफ यांच्या निवडणूक पोस्टर्सवर जागोजागी काळे फासण्यात आले. नीलमच्या खोर्याित पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. पाकव्याप्त काश्मीरच्या विधानभवनासमोर लोकांनी प्रचंड प्रमाणात तीव्र निदर्शने केली. वास्तविक, या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांना मतदानापासून जबरदस्तीने दूर ठेवण्यात आल्याचा या आंदोलकांचा आरोप आहे. हा असंतोष मतदानापासूनच खदखदत होता. मात्र, निमित्त झाले ते मुझफ्फराबाद येथे पाकिस्तान मुस्लिम लीगच्या एका सदस्याची मुस्लिम कॉन्फरन्सच्या समर्थकांनी हत्या केली त्याचे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुका रद्द करून पुन्हा मतदान घेण्याची निदर्शकांची मागणी आहेच. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमधील प्रशासनात काश्मिरी अधिकार्यांनची संख्या फारच कमी असल्याने ती वाढविण्याची मागणी आहे. ही मागणी लोक उघडपणे करत नाहीत, निनावी पत्र पाठवून करत आहेत. कारण, उघड मागणी करणार्यांतना जेलमध्ये टाकून तेथे ठार मारण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये महापूर आला होता, त्या वेळी पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानने वार्यारवरच सोडले होते. काश्मिरी जनतेला फूस लावून, पैसे देऊन पाकिस्तान ज्या भारतीय सैन्याच्या विरोधात कारवाया करायला भाग पाडत होते, त्या भारतीय सैन्याने मात्र या महापुराच्या जीवघेण्या संकटात काश्मिरी जनतेला जी मदत करून त्यांना संकटातून सुखरूप वाचविले त्या पराक्रमाला तोड नव्हती. तेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा देताना तेथील जनतेने, भारतामध्येच आम्हाला जायचे आहे, अशी इच्छा जाहीरपणे प्रकट केली होती. भारतात ‘इस्लाम खतरे में है’ अशी नारेबाजी करणार्या नतद्रष्ट लोकांना पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्य नागरिकांचे हे आंदोलन एक सणसणीत उत्तर आहे. पाकिस्तान आणि नवाज शरीफ यांचे काश्मीरबाबतचे वागणे, ही त्यांची शराफत नसून बदमाशी आहे, हे जगजाहीर करणारे हे आंदोलन आहे!
पाकव्याप्त काश्मीर म्हणजे आपल्या बापजाद्यांची जागीर असल्यासारखे पाकिस्तानी राज्यकर्ते, आयएसआयसारखी गुप्तचर संघटना त्यांच्याशी व्यवहार करत आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी उचकवले जाते. मात्र, आता अशी माहिती मिळते आहे की, अशा प्रकारे भारताच्या विरोधात जिहादी दहशतवादात सामील होण्यास तेथील लोक विरोध करू लागले आहेत. नकार देताच आयएसआय त्या लोकांना उचलून घेऊन जाऊन अत्याचार करत आहे. आता अशा अत्याचारांना आणि जबरदस्तीलाही तेथील लोक उघड उघड विरोध करू लागले आहेत. पाकिस्तान हा विरोधातील आवाज जेवढा दाबण्याचा प्रयत्न करत आहे तितका हा आवाज वाढतो आहे. आता तर तेथे काही महिला निदर्शनात सहभागी होताना, ‘‘आम्हाला भारतात सामील व्हायचे आहे,’’ असे बजावू लागल्या आहेत. या लोकांच्या विरोधात सैन्यदलाचा वापर करण्याचा किंवा त्यांचा आवाज बंद करण्याचा पाकिस्तानला काहीही अधिकार नाही, असेही आता हे लोक उघडपणे बोलू लागले आहेत. मात्र, पाकिस्तानमधील दूषित मानसिकता असलेली मंडळी पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचा आवाज मान्य न करता, उलट यासाठीही भारताला दोषी मानत निर्लज्जपणे बेताल आरोप करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील वातावरण बिघडविण्यास भारत जबाबदार असल्याचा आरोप या लोकांनी गेल्या वर्षी पुरानंतर झालेल्या असंतोषाच्या वेळीही केला होता.
आताही पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या फार्सबाबत ज्यांनी आवाज उठवला आणि या निवडणुकात बेईमानीने विजय मिळविल्याचा आरोप केला, त्या लोकांचे सर्रास मुडदे पाडले जात आहेत. २१ जुलै रोजी मिरपूरमध्ये तीन मृतदेह आणि २५ जुलै रोजी मुझफ्फराबाद येथे दोन मृतदेह मिळाले. या मृतदेहावर बंदुकीच्या गोळ्या घातल्याचे निदर्शनाला आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जो पाकिस्तानविरोधात बोलेल त्याची हत्या करून दहशतीचे वातावरण पाकव्याप्त काश्मीरमध्ये तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे. काश्मीरमध्ये भारताच्या विरोधात तरुणांना भडकविण्याचा जो प्रयत्न चालतो, त्या जनतेला पाकव्याप्त काश्मीरमधील काश्मिरी माणसाची ही अवस्था दाखविली पाहिजे.
पाकव्याप्त काश्मीरमधील या घटनाक्रमावर बोलताना भारतीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन ही नेहमीचीच गोष्ट आहे. पाकिस्तानातील मानवाधिकार आयोगानेही याबाबत उघडपणे आवाज उठविला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या विषयात आता दखल घेण्याची गरज आहे. एकीकडे भारतात असलेल्या काश्मीरमध्ये बेईमानीने, लोकांना पैसे देऊन भारताच्या आणि भारतीय सैन्याच्या विरोधात भडकविण्याचा धंदा करणार्याप पाकिस्तानला आपल्या पायाखाली काय जळते आहे, याची शुद्ध दिसत नाही. हाफिझ सईदसारखे पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भडकावून, तेथे दहशतवादाचे प्रशिक्षण करत भारतात दहशतवादी कारवाया करण्याचे मनसुबे सतत आखत आले आहेत. मात्र, आता पाकव्याप्त काश्मीरमधील जनता पाकिस्तानच्याच विरोधात उभी राहिली आहे. काश्मीरमधील सामान्य जनता पाकिस्तानच्या नापाक धंद्याच्या विरोधात आहे. अशा वेळी भारतातील गावागावांतील ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे’ होत असलेल्या दहशतवादी मानसिकतेत जाणार्यां मुस्लिम तरुणांनी आपली डोकी ताळ्यावर आणण्याची गरज आहे. निव्वळ राजकीय स्वार्थासाठी ढोंगी धर्मनिरपेक्षतेचे तुणतुणे वाजविणार्याह भारतातील हिंदुत्वविरोधकांनी आता देशविरोधी मानसिकतेला खतपाणी घालणे बंद केले पाहिजे. पाकव्याप्त काश्मीरमधील काश्मिरी जनता जे भोगत आहे आणि त्या भोगत असलेल्या दु:खाच्या अनुभवानंतर भारतात सामील होण्याची आपली इच्छा जाहीर निदर्शनातून, पाकविरोधी घोषणांतून, पाकिस्तानचा झेंडा जाळण्यातून व्यक्त करत आहे, याची दखल जगाने तसेच भारतातील दहशतवादी जिहादी मानसिकता बाळगणार्या् नतद्रष्ट लोकांनी घेतली पाहिजे. मानवतेला पावन करील असे जीवनदर्शन ज्या भारतात आहे, तेथून सतत राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी एकमेकांचे गळे चिरण्याची कृती या वातावरणात जाऊन हाती काय लागणार, याचा विचार लोकांनी केला पाहिजे. पाकिस्तानचा ढोंगी चेहरा पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी जगासमोर आणला आहे. यांचे काश्मीरबाबतचे ढोंग पुरते उघडे पडले आहे. काश्मीर भारतापासून बळकावण्याचे नवाझ शरीफ यांचे स्वप्न ही शुद्ध बदमाशी आहे, हे आता लपून राहणार नाही...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment