मुसलमानांच्या नव्या पिढीने मदरशांच्या जोखडातून बाहेर पडावे व राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे. कारण शाईस्ते खान हा तर संतच होता व औरंगजेबसारखा देवतुल्य माणूस या भूतलावर झाला नसेल अशा हिरव्या इतिहासात मदरसे अडकले आहेत व त्यांनी मुसलमानांची एक पिढी अज्ञान व अंधकाराच्या डबक्यातच ठेवली आहे.
मदरशांतला अंधकार!
भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी एक परखड विधान केले आहे. ‘मदरशांमध्ये दहशतवादाचे शिक्षण दिले जाते. मदरसे मुसलमान मुलांना दहशतवादी आणि जिहादी बनवीत आहेत. हे काही राष्ट्राच्या हिताचे नाही’, असे ते म्हणाले. साक्षी महाराजांच्या या विधानात वादग्रस्त असे काय आहे व खळबळ माजावी असे तरी काय आहे? पण मुसलमानांतील धर्मांधतेवर टीका केल्यामुळे खळबळ माजवायचीच असा धंदा वर्षानुवर्षे चालू आहे. मदरसे हे जिहादी बनविण्याचे कारखाने बनले आहेत ही काही आजची टीका नाही. अनेकदा त्याबाबतचे पुरावे समोर आले आहेत. मदरशांतून धार्मिक शिक्षण दिले जाते व त्या शिक्षणाचा सध्याच्या स्पर्धात्मक युगात काही फायदा आहे काय? तर अजिबात नाही. डोक्यात तिरस्कार, मत्सराचा दारूगोळा भरण्याचाच प्रकार तिकडे चालतो. राष्ट्रीय विचारांचे कोणते धडे तिकडे दिले जातात? मातृभूमीवरील प्रेमाचे कोणते गीत तेथे गायले जाते? याचा खुलासा मुल्लामौलवींनी करावा. भाजप खासदारांचे असे म्हणणे आहे की, ‘‘विद्यार्थ्यांना धार्मिक शाळांमधून राष्ट्रवादाचे शिक्षण दिले जात नाही. असा एक मदरसा मला दाखवा की, जेथे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंगा फडकविला जातो. राष्ट्रवादाशी काही देणेघेणे नसणार्या मदरशांना सरकारी मदत दिली जात आहे. आमच्या बहुतांश शाळांना मात्र कोणतीही मदत मिळत नाही.’’ साक्षी महाराजांनी हे जे सांगितले ते तर या देशातले कटू सत्य आहे. तेव्हा त्यांच्या या विधानात समाजात फूट पाडण्यासाखे काय आहे? पण बेगडी निधर्मीवाद्यांनी यावर आपले ज्ञान पाजळायला सुरुवात केली आहे. मदरशांमध्ये अनेकदा अतिरेकी सापडले आहेत, शस्त्रसाठे सापडले आहेत. पाकिस्तानी नागरिक पकडले गेले आहेत. तरीही अशा मदरशांवर काय कारवाई झाली, हा प्रश्नच आहे. मुसलमानांच्या नव्या पिढीने मदरशांच्या जोखडातून बाहेर पडावे व राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे. धार्मिक शिक्षणाऐवजी राष्ट्रीय बाण्याचे व्यवहारी शिक्षण घ्यावे, पण राष्ट्रीय प्रवाहात शिकवला जाणारा इतिहास त्यांना मान्य नाही. शिवाजीने अफझलखानाचा कोथळा कसा काढला, शाईस्ते खान हा तर संतच होता व औरंगजेबसारखा देवतुल्य माणूस या भूतलावर झाला नसेल अशा हिरव्या इतिहासात मदरसे अडकले आहेत व त्यांनी मुसलमानांची एक पिढी अज्ञान व अंधकाराच्या डबक्यातच ठेवली आहे. हे दुर्दैव नाही तर काय?
चीनच्या माकडउड्या!
चिनी सैन्याची हल्ली हिंदुस्थानी सरहद्दीवर भलतीच फडफड सुरू आहे. वाटेल तेव्हा चिनी सैनिक हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करतात, चीनचा राष्ट्रध्वज आपल्या भूमीवर येऊन फडकवतात, इतकेच काय हिंदुस्थानच्या भूभागावर येऊन तंबूही टाकतात. आताही चीनच्या लाल माकडांनी तीच आगळीक केली आहे. हिंदुस्थानची सरहद्द ओलांडून तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तंबू ठोकले आहेत. घुसखोर चिन्यांना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या हिंदुस्थानच्या १०० जवानांभोवती चीनच्या ३०० सैनिकांनी वेढा टाकल्याचे वृत्त आहे. म्हणजे आमच्याच सीमेत घुसून आमच्याच सैनिकांना ओलिस ठेवण्याचा हा भयंकर प्रकार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष झी चिनपिंग हे ४८ तासांनंतर हिंदुस्थानच्या दौर्यावर येणार आहेत. हिंदुस्थानचे केंद्रीय सरकार चिनी राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करीत असतानाच चीनच्या सैन्याने सीमेवर असे उपद्व्याप करावेत, हे षड्यंत्रच आहे. यामागे निश्चित काही तरी डावपेच असावेत. एकीकडे पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या हिंदुस्थानच्या शेजारी देशांना आपल्या पंखाखाली घेऊन चिनी ड्रॅगन हिंदुस्थानभोवती विळखा टाकत आहे आणि दुसरीकडे अरुणाचल प्रदेश व लडाखमध्ये वारंवार घुसखोरी करून हिंदुस्थानला ललकारतो आहे. एका वर्षात थोडीथोडकी नव्हे तब्बल ३३४ वेळा चिनी माकडांनी हिंदुस्थानी सरहद्द ओलांडून घुसखोरी केली. आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर जपान, तैवान आणि व्हिएतनाम या देशांवरही चीन सतत गुरगुरत असतो. चीनच्या या आक्रमक विस्तारवादी परराष्ट्र धोरणाचे धोके ओळखून त्याला लगाम घालणे आता आवश्यक झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेदेखील चीनच्या या कारवायांची नोंद घ्यायला हवी. राष्ट्राध्यक्ष झी चिनपिंग हिंदुस्थानच्या दौर्यावर येतच आहेत तर चिनी सैनिकांच्या सीमेवरील माकडउड्यांचा जाब हिंदुस्थान सरकारनेही विचारायलाच हवा!
No comments:
Post a Comment