Total Pageviews

Friday, 12 September 2014

PAKISTAN YOUNGER BROTHER-MULAYAMSINGHS VOTEBANK POLITICS

केवळ मुस्लिम हिताचेच राजकारण करण्याच्या अतिरेकामुळेच लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंगांच्या पक्षाचा उत्तर प्रदेशात ‘सुपडा साफ’ झाला. एवढे होऊनही मुस्लिम मतांसाठी पाकिस्तानला छोटा भाऊ ठरवण्याची बांग मुलायमसिंगांनी ठोकावी याचेच आश्‍चर्य वाटते. छोट्या भावाचे मुके घ्या... मुलायममियांची बांग! मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्यात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचा हात कोणीच धरू शकत नाही. पुन्हा निवडणुका तोंडावर असतील तर मुलायमसिंगांचा हात दाढ्या कुरवाळण्यासाठी अधिकच शिवशिवतो. मुस्लिमांना खूश करण्याच्या नादात आपण काय बोलतो याचेही त्यांना भान राहत नाही. आताही तसेच झाले आहे. मुस्लिमांच्या व्होट बँकेला गुदगुल्या करण्यासाठी मुलायममियांनी पाकिस्तानला हिंदुस्थानचा छोटा भाऊ ठरवले आहे. पाकड्यांना केवळ छोटा भाऊ ठरवूनच ते गप्प बसले नाहीत, तर काही लोक आपल्या छोट्या भावाला म्हणजे पाकिस्तानला उगाचच त्रास देतात, अशी बांगही त्यांनी ठोकली. उत्तर प्रदेशात सध्या १२ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा धूमधडाका सुरू आहे. शिवाय मुलायमसिंगांनी लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या आझमगड आणि मैनपुरी या दोन मतदारसंघांपैकी मैनपुरीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे तिथेही पोटनिवडणूक होत आहे. आझमगडचा राजीनामा दिला तर उत्तर प्रदेशातील मुसलमान नाराज होतील या भयाने मुस्लिमांच्या या स्वयंघोषित ‘मसिहा’ने मैनपुरीची जागा सोडली. मैनपुरीच्याच प्रचार सभेत बोलताना मुलायमसिंगांना पाकिस्तान प्रेमाचे भरते आले. पाकिस्तानबद्दल चांगले बोलले की हिंदुस्थानातील मुसलमान खूश होतात यावर मुलायमसिंगांचा ठाम विश्‍वास असावा. त्यामुळेच भाषणात मुलायमसिंगांनी सांगितले की, ‘दो भाईयों में एकता होनी चाहिए. पाकिस्तान हमारे छोटे भाई जैसा है. छोटे भाई को बडे भाई का सम्मान करना चाहिए, और बडे भाई को छोटे को प्यार करना चाहिए’. थोडक्यात काय तर पाकिस्तानवर प्रेम करा, असा दिव्य संदेश मुलायममियांनी हिंदुस्थानी जनतेला दिला आहे. खरे तर पाकड्यांच्या जन्मापासून आपण त्यांचे लाडच करत आलो आहोत. पाकिस्तानने हिंदुस्थानात इस्लामी दहशतवादाचे जहर फैलावले तरी आमचे राज्यकर्ते गप्प राहिले. पाकिस्तानने हिंदुस्थानवर लादलेल्या छुप्या युद्धात हिंदुस्थानचे ५० हजारांहून अधिक सैनिक निष्कारण मारले गेले तरी हिंदुस्थानने या ‘छोट्या भावा’विरुद्ध काही कारवाई केली नाही. आपण वारंवार मैत्रीचा हात पुढे करूनही पाकिस्तानने प्रत्येक वेळी ‘कारगिल’सारखी दगाबाजी करून पाठीत खंजीरच खुपसला. तरी आपले राज्यकर्ते शांततेची कबुतरेच उडवीत राहिले. आताही युद्धबंदी मोडून रोजच हा छोटा भाऊ हिंदुस्थानी चौक्यांवर गोळीबार करीत आहे; तरीही आपण या छोट्या भावाचे मुके घ्यावेत असे मुलायमसिंगांना म्हणायचे आहे काय? संसदेवरचा हल्ला असो, मुंबईवरील ‘२६/११’चा हल्ला असो किंवा हिंदुस्थानात ठिकठिकाणी घडवून आणले जाणारे बॉम्बस्फोट... या प्रत्येक हल्ल्यामागे याच छोट्या भावाचा हात आहे हे काय मुलायममियांना ठाऊक नाही! छोटा भाऊ म्हणून ज्या पाकिस्तानसाठी मुलायमसिंग हंबरडा फोडत आहेत त्याच पाकड्या सैनिकांनी आमच्या दोन जवानांचा शिरच्छेद केला. छोटा भाऊ मोठ्या भावाचे असे मुंडके छाटतो काय, असा सवाल आता उत्तर प्रदेशातील जनतेनेच मुल्ला मुलायमच्या धोतराचा सोगा ओढून विचारायला हवा. पुन्हा ही सगळी थेरं कशासाठी तर फक्त मुस्लिम व्होट बँकेसाठी! व्होट बँकेच्या या गलिच्छ राजकारणानेच आजवर हिंदुस्थानचे अतोनात नुकसान झाले. केवळ मुस्लिम हिताचेच राजकारण करण्याच्या अतिरेकामुळेच लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंगांच्या पक्षाचा उत्तर प्रदेशात ‘सुपडा साफ’ झाला. एवढे होऊनही मुस्लिम मतांसाठी पाकिस्तानला छोटा भाऊ ठरवण्याची बांग मुलायमसिंगांनी ठोकावी याचेच आश्‍चर्य वाटते. याउपरही मियां मुलायमना ‘पाकिस्तानचा एवढाच पुळका आला असेल तर त्यांनी खुशाल तिकडे चालते व्हावे. मग बघू छोटा भाऊ ‘बडे मियां’ला कसे सांभाळतो ते

No comments:

Post a Comment